शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषद
शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषद

शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषद

कोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर मागणीकरिता शिवसेनेच्या वतीने तुरंबे (ता. राधानगरी) येथे गुरुवारी (ता. २१) ऊस परिषद होणार आहे. दुपारी चार वाजता ही परिषद होईल. यंदाच्या गाळप हंगामातील ऊस दराबरोबर दोन वर्षांच्या थकीत एफआरपीप्रश्नी आंदोलनाची पुढील दिशा परिषदेत ठरवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील व संभाजीराव भोकरे यांनी दिली.

श्री. पाटील आणि श्री. भोकरे यांनी शनिवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली.  शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. आमदार प्रकाश अबिटकर, ज्येष्ठ शेतकरी नेते मारुतराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांकडे २०१८-१९ हंगामातील एफआरपीची रक्कम थकीत आहे. उत्पादकांची देणी प्रलंबित असताना दराचा तिढा न सोडवता गाळप हंगामाला सुरुवात केली आहे. कारखाना सुरू करताना सर्वच कारखान्यांचे पदाधिकारी एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याचे जाहीर करत आहेत. पण रक्कम मात्र कोणीच जाहीर करत नाही. त्यामुळे दर जाहीर केल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली असल्याचे श्री. पाटील व श्री. भोकरे यांनी सांगितले एफआरपीसोबत पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान, शेतकरी व शेतमजुरांचे निवृत्तिवेतन, पीक विमा व केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान आदी बाबींवर परिषदेत चर्चा करून ठराव करण्यात येणार आहेत.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com