agriculture news in marathi, shivsena will organize sugarcane council, kolhapur, maharashtra | Agrowon

शिवसेनेची गुरुवारी तुरंबे येथे ऊस परिषद

टीम अॅग्रोवन
रविवार, 17 नोव्हेंबर 2019

कोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर मागणीकरिता शिवसेनेच्या वतीने तुरंबे (ता. राधानगरी) येथे गुरुवारी (ता. २१) ऊस परिषद होणार आहे. दुपारी चार वाजता ही परिषद होईल. यंदाच्या गाळप हंगामातील ऊस दराबरोबर दोन वर्षांच्या थकीत एफआरपीप्रश्नी आंदोलनाची पुढील दिशा परिषदेत ठरवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील व संभाजीराव भोकरे यांनी दिली.

कोल्हापूर  : येत्या गळीत हंगामासाठी ऊस दर मागणीकरिता शिवसेनेच्या वतीने तुरंबे (ता. राधानगरी) येथे गुरुवारी (ता. २१) ऊस परिषद होणार आहे. दुपारी चार वाजता ही परिषद होईल. यंदाच्या गाळप हंगामातील ऊस दराबरोबर दोन वर्षांच्या थकीत एफआरपीप्रश्नी आंदोलनाची पुढील दिशा परिषदेत ठरवण्यात येईल, अशी माहिती जिल्हा उपप्रमुख प्रकाश पाटील व संभाजीराव भोकरे यांनी दिली.

श्री. पाटील आणि श्री. भोकरे यांनी शनिवारी (ता. १६) पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. 
शिवसेनेचे जिल्हा प्रमुख विजय देवणे या परिषदेच्या अध्यक्षस्थानी असतील. आमदार प्रकाश अबिटकर, ज्येष्ठ शेतकरी नेते मारुतराव जाधव यांच्या प्रमुख उपस्थितीत ही परिषद होणार आहे.

कोल्हापूर जिल्ह्यातील अनेक कारखान्यांकडे २०१८-१९ हंगामातील एफआरपीची रक्कम थकीत आहे. उत्पादकांची देणी प्रलंबित असताना दराचा तिढा न सोडवता गाळप हंगामाला सुरुवात केली आहे. कारखाना सुरू करताना सर्वच कारखान्यांचे पदाधिकारी एफआरपीपेक्षा अधिक दर देण्याचे जाहीर करत आहेत. पण रक्कम मात्र कोणीच जाहीर करत नाही. त्यामुळे दर जाहीर केल्याशिवाय कारखाना सुरू करू देणार नाही, अशी भूमिका शिवसेनेने घेतली असल्याचे श्री. पाटील व श्री. भोकरे यांनी सांगितले
एफआरपीसोबत पावसामुळे शेतीचे झालेले नुकसान, शेतकरी व शेतमजुरांचे निवृत्तिवेतन, पीक विमा व केंद्र सरकारकडून मिळणारे अनुदान आदी बाबींवर परिषदेत चर्चा करून ठराव करण्यात येणार आहेत.


इतर बातम्या
'तीन लाखांपर्यंतचे पीककर्ज माफ व्हावे...गेल्या पाच-दहा वर्षांपासून अस्मानी आणि सुलतानी...
कर्जमाफीची पहिली यादी आज होणार जाहीर :...मुंबई : आमचे सरकार हे केवळ घोषणा करणारे नाही तर...
जळगाव जिल्ह्यातील विद्यार्थी वर्गात...जळगाव : जिल्हा परिषद शाळांमधील...
पुणे विभागात चारा पिकांच्या पेरणीवर भरपुणे ः उन्हाळ्यात जनावरांना चाऱ्याची अडचण येऊ नये...
सांगली जिल्ह्यात द्यापही तूर खरेदी सुरू...सांगली : शासनाने हमीभावाने तूर खरेदी करण्यासाठी...
आटपाडीत डाळिंब उत्पादकांना विमा भरपाईची...आटपाडी, जि. सांगली : यावर्षी पावसातील सुरुवातीचा...
मक्यावरील अळीमुळे शेतकरी चिंतातुरअकोला ः जिल्ह्यात या रब्बीत लागवड झालेल्या...
राज्यात गोंधळलेले सरकार: देवेेंद्र...मुंबई ः दिशा ठरत नाही आणि त्यांना सूरही गवसत...
कर्जमाफीच्या मुद्द्यावर राज्य सरकारची...मुंबई : आजपासून (ता. २४) सुरू होणारे अर्थसंकल्पी...
अकरा लाख टन रिफाइंड पामतेल आयातीला...नवी दिल्ली: केंद्र सरकारने रिफाइंड पामतेलाची...
कर्जमाफी बिनकामाची, तकलादू : राजू...नगर: पंतप्रधान पीकविमा योजना सरकारी...
पूर्व विदर्भात पावसाचा अंदाजपुणे  : पावसासाठी पोषक हवामान असल्याने पूर्व...
‘ठिबक’च्या ऑनलाइन अर्जासाठी मुदतवाढपुणे ः ठिबक सिंचन योजनेचा लाभ घेण्यासाठी ऑनलाइन...
अधिकाऱ्यांच्या खेळात नाचणी उत्पादक वेठीसकोल्हापूर: उन्हाळ्यात नाचणी घेऊन पन्हाळा पश्‍चिम...
चार हजार शेतकऱ्यांना र्दृष्टीदोष दूर...गोंडपिपरी, जि. चंद्रपूर : व्यवसाय करताना बेरीज-...
रेशीम उद्योगासाठी शेतकऱ्यांनी पुढे यावे...औसा, जि. लातूर :  ‘‘रेशीम उद्योगाकडे...
औरंगाबाद जिल्ह्यात विजेअभावी सिंचनाची...औरंगाबाद : पंधरवडा रात्री तर पंधरवडा दिवसा...
जीआय टॅगिंगयुक्त हापूसला दीड लाखापर्यंत...रत्नागिरी : ‘‘निर्यातीत हापूसचा टक्के घसरत असून...
कावपिंप्रीत चार वर्षांनंतर बहरली पिकेकावपिंप्री, जि. जळगाव : यंदा कावपिंप्रीसह...
नीरा-देवघरच्या पाणीवाटपावरुन पिलीवमध्ये...सोलापूर : राज्य सरकारने नीरा- देवघर धरणातील...