दिल्लीच्या सीमारेषेवर पाच ठिकाणी गेले ९२ दिवस शेतकऱ्यांचे नवीन तीन कृषी कायद्यांच्या विरोधात आंदो
ताज्या घडामोडी
नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्का
जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पार पडले. बिनविरोध ग्रामपंचायती वगळता एकूण ५६५ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू झाली.
नाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पार पडले. बिनविरोध ग्रामपंचायती वगळता एकूण ५६५ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू झाली. दुपारी १.३० वाजेपर्यंत २०४ ग्रामपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. या निकालामध्ये जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतींचे निकाल आल्यानंतर प्रस्थापितांना धक्का तर तरुणाईचा वरचष्मा पाहायला मिळाला. मात्र, दुपारी ४ वाजेपर्यंत अनेक ठिकाणचे निकाल हाती नसल्याने ते सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहेत.
जिल्ह्यात निवडणुका असलेल्या तालुक्यांपैकी नाशिक-२२, त्र्यंबक-३, दिंडोरी-५३, इगतपुरी-७, चांदवड-५२, कळवण-२७, बागलाण-३१ व देवळा-९ या ८ तालुक्यातील एकूण २०४ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले होते. तर उर्वरित निफाड, येवला, मालेगाव, सिन्नर व नांदगांव या ५ तालुक्यांतील निकाल हाती येणे बाकी होते.
पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तेची उलथापालथ झाली. येथील मतदारांनी स्थानिक पातळीवरील दिग्गज नेत्यांना नाकारल्याचे चित्र आहे. मोठी गावे असलेल्या नगरसुल, अंदरसुल, राजापूर तर साताळी, निमगाव या गावांमध्ये सत्ताधाऱ्यांना नाकारले. तर तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांच्या पॅनेलला ७ जागांवर बहुमत मिळाले.तर सत्ताधारी विठ्ठल आठशेरे यांना मोठा धक्का दिल्याने अंगणगाव येथे बदल झाला आहे.
अंदरसूल ग्रामपंचायतीत धनगे-देशमुख यांच्या पॅनेलने नऊ जागांवर विजय मिळविला. त्यामुळे राजकीय प्रतिस्पर्धी मकरंद सोनवणे यांच्या गटाला ६ जागा मिळाल्याने सत्ता संपुष्टात आली आहे. नगरसुल येथे समता पॅनेलने महाविकास आघाडी प्रणीत पॅनेलला धक्का दिला. काही गावांमध्ये सत्ता राखण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले आहे. तालुक्यातील धुळगाव येथे प्रहार पक्षाने खाते उघडले असून रामदास इंगळे हे विजयी झाले आहेत. नाशिक, दिंडोरी तालुक्यात अनेक गावांत ज्येष्ठ नेत्यांच्या राजकीय भूमिका थांबवून तरुणांनी यशस्वी प्रवेश केला आहे.
आमदार कोकटे यांना गावातच धोबीपछाड
सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या राजकारणाला गावातच धक्का बसला आहे. सोमठाणे ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार कोकाटे यांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू भरत शिवाजीराव कोकाटे यांच्या पॅनेलचे आव्हान होते. झालेल्या मतमोजणीत भरत कोकाटे यांच्या पॅनेलला अकरा पैकी सात जागा मिळाल्या. आमदार कोकाटे यांच्या पॅनेलला फक्त चार जागा मिळाल्या. हा कोकाटे यांना त्यांच्या घरातूनच बसलेला मोठा राजकीय धक्का मानला जातो.
- 1 of 1054
- ››