Agriculture news in Marathi Shock to the established in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात प्रस्थापितांना धक्का

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 19 जानेवारी 2021

जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पार पडले. बिनविरोध ग्रामपंचायती वगळता एकूण ५६५ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू झाली.

नाशिक : जिल्ह्यात एकूण ६२१ ग्रामपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी मतदान पार पडले. बिनविरोध ग्रामपंचायती वगळता एकूण ५६५ ग्रामपंचायतींसाठी झालेल्या मतदानाची मतमोजणी प्रक्रिया सकाळी १० वाजता सुरू झाली. दुपारी १.३० वाजेपर्यंत २०४ ग्रामपंचायतींची मतमोजणी प्रक्रिया शांततेत पार पडली आहे. या निकालामध्ये जिल्ह्यातील प्रमुख ग्रामपंचायतींचे निकाल आल्यानंतर प्रस्थापितांना धक्का तर तरुणाईचा वरचष्मा पाहायला मिळाला. मात्र, दुपारी ४ वाजेपर्यंत अनेक ठिकाणचे निकाल हाती नसल्याने ते सायंकाळपर्यंत स्पष्ट होणार आहेत.

जिल्ह्यात निवडणुका असलेल्या तालुक्यांपैकी नाशिक-२२, त्र्यंबक-३, दिंडोरी-५३, इगतपुरी-७, चांदवड-५२, कळवण-२७, बागलाण-३१ व देवळा-९ या ८ तालुक्यातील एकूण २०४ ग्रामपंचायतीचे निकाल हाती आले होते. तर उर्वरित निफाड, येवला, मालेगाव, सिन्नर व नांदगांव या ५ तालुक्यांतील निकाल हाती येणे बाकी होते.

पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या मतदार संघातील ग्रामपंचायत निवडणुकीत सत्तेची उलथापालथ झाली. येथील मतदारांनी स्थानिक पातळीवरील दिग्गज नेत्यांना नाकारल्याचे चित्र आहे. मोठी गावे असलेल्या नगरसुल, अंदरसुल, राजापूर तर साताळी, निमगाव या  गावांमध्ये सत्ताधाऱ्यांना नाकारले. तर तालुक्यातील राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते अंबादास बनकर, जिल्हा परिषदेचे कृषी सभापती संजय बनकर यांच्या पॅनेलला ७ जागांवर बहुमत मिळाले.तर सत्ताधारी विठ्ठल आठशेरे यांना मोठा धक्का दिल्याने अंगणगाव येथे बदल झाला आहे.

अंदरसूल ग्रामपंचायतीत धनगे-देशमुख यांच्या पॅनेलने नऊ जागांवर विजय मिळविला. त्यामुळे राजकीय प्रतिस्पर्धी मकरंद सोनवणे यांच्या गटाला ६ जागा मिळाल्याने सत्ता संपुष्टात आली आहे. नगरसुल येथे समता पॅनेलने महाविकास आघाडी प्रणीत पॅनेलला धक्का दिला. काही गावांमध्ये सत्ता राखण्यात सत्ताधाऱ्यांना यश आले आहे. तालुक्यातील धुळगाव येथे प्रहार पक्षाने खाते उघडले असून रामदास इंगळे हे विजयी झाले आहेत. नाशिक, दिंडोरी तालुक्यात अनेक गावांत ज्येष्ठ नेत्यांच्या  राजकीय भूमिका थांबवून तरुणांनी यशस्वी प्रवेश केला आहे.

आमदार कोकटे यांना गावातच धोबीपछाड
सिन्नर तालुक्याचे आमदार माणिकराव कोकाटे यांच्या राजकारणाला गावातच धक्का बसला आहे. सोमठाणे ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार कोकाटे यांच्या विरोधात त्यांचे सख्खे बंधू भरत शिवाजीराव कोकाटे यांच्या पॅनेलचे आव्हान होते. झालेल्या मतमोजणीत भरत कोकाटे यांच्या पॅनेलला अकरा पैकी सात जागा मिळाल्या. आमदार कोकाटे यांच्या पॅनेलला फक्त चार जागा मिळाल्या. हा कोकाटे यांना त्यांच्या घरातूनच बसलेला मोठा राजकीय धक्का मानला जातो.


इतर ताज्या घडामोडी
निफाडच्या दोन शेतकऱ्यांची ७४ हजारांची...नाशिक : जिल्ह्यात द्राक्ष, कांदा या शेतीमालाबाबत...
`कृषी`च्या असहकार्यामुळे समिती...नगर  : जलयुक्‍त शिवार योजनेतून केलेल्या...
सांगलीच्या पशुसंवर्धन विभागात ५१ पदे...सांगली : जिल्हा परिषदेकडील पशुसंवर्धन विभागात ८६...
खानदेशात तुरीच्या खरेदीला शून्य प्रतिसादजळगाव ः खानदेशात तूर खरेदीसाठी यंदा खरेदी...
अवैध बोअरवेलप्रकरणी प्रशासनाकडून कारवाईअमरावती ः ड्रायझोन जाहीर करण्यात आल्याने मोर्शी,...
खानदेशात कांद्याच्या दरातील घसरण सुरूचजळगाव ः खानदेशात लाल कांद्याच्या दरात गेल्या...
काजू बी १५० रुपये हमीभावाने खरेदी करावीरत्नागिरी ः काजू बी ला महाराष्ट्र सरकारने १५०...
जळगाव जिल्ह्यात गहू, हरभरा काढणीस वेगतांदलवाडी, जि. जळगाव :  सध्या गहू व हरभरा...
‘गोकुळ’बाबत मुंबईत खलबतेकोल्हापूर : जिल्हा दूध उत्पादक संघाच्या (गोकुळ)...
जवस पिकाकडे वळा : डॉ. झाडे औरंगाबाद : ‘‘एकरी लागवड खर्च ५ ते ६ हजार करून २५-...
वाशीममध्ये कोरोना रोखण्यासाठी सरपंच...वाशीम : जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोना विषाणूचा...
‘विष्णुपुरी’च्या पाण्याबाबत कार्यवाही...नांदेड : ‘‘विष्णुपुरी प्रकल्पाच्या लाभ...
कलंबरमध्ये महिला शेतीशाळेस प्रतिसादनांदेड : लोहा तालुका कृषी विभागाच्या कृषी...
‘पीएम किसान’ योजनेच्या कामास तलाठ्यांचा...नाशिक : पंतप्रधान किसान सन्मान योजनेशी संबंधित...
चाऱ्यासाठी वनशेतीमध्ये अंजन, निवडुंगदीर्घकाळ दुष्काळ सहन करण्याची अंजन या चारा...
शेतकरी उत्पादक कंपन्यांचे बळकटीकरण महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ आणि नाबार्डच्या...
केसर आंबा व्यवस्थापनया वर्षी आंबा झाडांना मोहोर आला. सध्या...
फ्लॉवर ‌जांभळा-गुलाबी‌ होण्याची समस्याआनुवांशिकदृष्ट्या‌,‌ फ्लॉवर ‌पांढऱ्या,‌ ‌जांभळ्या...
पुणे जिल्ह्यात उन्हामुळे धरणांतील...पुणे ः उन्हाचा चटका वाढल्याने धरणांतील पाण्याचा...
म्हसवड येथे शेतकरी आंदोलन सुरूचम्हसवड, जि. सातारा : शेतजमीन कब्जे वहिवाटीत...