Agriculture news in Marathi, Shocking defeat of Pankaja Munde | Agrowon

पंकजाताईंचा पराभव; धनूभाऊ विजयी...

टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 25 ऑक्टोबर 2019

बीड : गत विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत २५ हजार मतांच्या फरकाने विजयी झालेल्या मंत्री पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव झाला. यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांची स्थानिक घटकांशी तुटलेली नाळ. तर कायम लोकांत मिसळून राहण्याने धनंजय मुंडेंच्या माथी विजयाचा गुलाल लागला आहे.

बीड : गत विधानसभेच्या पंचवार्षिक निवडणुकीत २५ हजार मतांच्या फरकाने विजयी झालेल्या मंत्री पंकजा मुंडे यांचा धक्कादायक पराभव झाला. यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांची स्थानिक घटकांशी तुटलेली नाळ. तर कायम लोकांत मिसळून राहण्याने धनंजय मुंडेंच्या माथी विजयाचा गुलाल लागला आहे.

जिल्ह्यात स्वत: पालकमंत्री आणि पक्षाचे इतर चार आमदार, बहीण खासदार अशी सत्तापदे आहेत. तर जिल्हा बँक, कारखाना, जिल्हा परिषद या जिल्ह्यातील महत्त्वाच्या संस्थांसह राज्य आणि केंद्रात सत्ता होती. परंतु त्या कायम विशिष्ट कोंडाळ्यात अडकून पडल्याने त्यांच्यापर्यंत पोचणे सामान्यांना शक्य झाले नाही आणि त्यांनाही त्याची गरज वाटली नाही. 

एखाद्या चुकीची सुधारणा करण्याचा सल्लाही त्यांना कधी आवडला नाही. विकासकामांची यादी भलीमोठी असली तरी त्यांच्या ग्रामविकास खात्याच्या २५/१५ शीर्षातून दिलेला निधी गाव विकासासाठी की आपल्या समर्थकांसाठी हादेखील कळीचा मुद्दा आहे. त्यांनी विकासाला भावनिक राजकारणाची जोड दिली असली तरी वरील कारणांनी त्यांचा पराभव झाला. 

मागच्या पराभवापासून धनंजय मुंडे कायम लोकांत मिसळून राहिले. नाथ प्रतिष्ठानच्या माध्यमातून सामाजिक कामे आणि धनंजय मुंडे यांनी कार्यकर्त्यांना अडचणीत कधी एकटे सोडले नाही. पंकजा मुंडेंना विरोध नाही तर लोकहितासाठी राजकारण ही प्रतिमा करण्यात धनंजय मुंडेंना यश आले आहे.


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबादमध्ये आज रानभाज्या महोत्सवऔरंगाबाद  ः ‘‘वसंतराव नाईक मराठवाडा कृषी...
सांगलीत ६८ हजार शेतकऱ्यांनी उतरवला...सांगली  ः जिल्ह्यातील ६८ हजार ०१८...
रिसोडमध्ये पावसाची उघडीपवाशीम  ः राज्यात बऱ्याच भागात पाऊस धुमाकूळ...
वाशीम जिल्ह्यात एक लाख ४२ हजार हेक्टर...वाशीम ः पंतप्रधान पीकविमा योजनेत जिल्ह्यातील...
खानदेशात ताग लागवडीला पसंतीजळगाव  ः कमी पाण्यात व उशिरा लागवड करूनही...
पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत घटकोल्हापूर : पश्चिम भागात पावसाचा जोर घटल्याने...
परभणी विभागात बिजोत्पादन होणार २७ हजार...परभणी : यंदा महाबीजच्या परभणी विभागातील परभणी,...
अकोल्यात पाऊस सुरुचनगर  ः अकोले तालुक्याच्या पश्चिम आदिवासी...
विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांचे...अमरावती : विदर्भातील पोल्ट्री व्यावसायिकांना...
इगतपुरी, नाशिक तालुक्यात वाऱ्यामुळे...नाशिक : जिल्ह्याच्या पश्चिम पट्ट्यात झालेल्या...
विक्रीअभावी मालवंडीत लिंबू उत्पादकांना...मालवंडी, जि. सोलापूर ः बार्शी तालुक्यातील मालवंडी...
सफेद चिप्पी कांदळवन वृक्ष घोषितमुंबई: सफेद चिप्पी (sonneratia alba) या कांदळवन...
यंदा बैल पोळा उत्साहात साजरा होणार रोपळे बुद्रूक , ता.पंढरपूर , जि . सोलापूर...
हलक्‍या ते मध्यम स्वरूपात पावसाची शक्‍...महाराष्ट्रावरील हवेच्या दाबात बदल होत असून,...
औरंगाबादमध्ये बटाटे २००० ते २४०० रुपये...औरंगाबाद  : येथील कृषी उत्पन्न बाजार...
औसा तालुक्यात उडीद, मूग व्हायरसच्या...औसा, जि. लातूर : तालुक्यातील उडीद आणि मूग ही पिके...
शेतमजुरांसाठी कौशल्याधारीत प्रशिक्षण...नाशिक: बदलत्या पीक पद्धतीमध्ये कीडनाशक फवारणी,...
कोल्हापूर जिल्ह्यात वादळ, पुराचा उसाला...कोल्हापूर: जोरदार वाऱ्यासह सुरु असलेल्या पावसाने...
पुणे जिल्ह्यात पावसामुळे भात लागवडीला...पुणे ः गेल्या चार ते पाच दिवसांपासून पुणे...
पाथरूडच्या बंधाऱ्यांत मुबलक पाणीपाथरूड, जि. उस्मानाबाद : येथील दुधना नदीवर...