agriculture news in Marathi, shocking defeat of raju shetty, Maharashtra | Agrowon

राजू शेट्टींच्या पराभवाने शेतकरी चळवळीला धक्का
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 24 मे 2019

माझा पराभव झाला असला, तरी मी काम करतच राहणार आहे. गोरगरीब, दीनदलित, कष्टकरी यांच्यासाठी मी झटणार आहे. एका पराभवाने मला फारसा फरक पडणार नाही, मी लढतच राहीन.
- राजू शेट्टी

कोल्हापूर ः शेतीविषयक विविध प्रश्‍नांबाबत देश पातळीवर आंदोलने करणाऱ्या खासदार राजू शेट्टी यांचा धक्कादायक पराभव शेतकरी चळवळीतील कार्यकर्त्यांना जिव्हारी लागला आहे. खासदारकीच्या कालावधीत गेल्या दहा वर्षांत विशेष करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांना आधार ठरणाऱ्या शेट्टींच्या पराभवाने ऊस पट्टा हादरून गेला आहे. त्यांच्या पराभवाने स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या चळवळीलाच दणका बसला आहे. श्री. शेट्टींचा पराभव कार्यकर्त्यांच्या जिव्हारी लागणारा ठरला आहे. हातकणंगले लोकसभा मतदारसंघातील या उलथापालथीने आता दक्षिण महाराष्ट्रातील राजकारणच बदलून जाणार आहे. 

गेल्या दहा वर्षांपासून खासदार शेट्टी यांनी शेतकरी प्रश्‍नावर विविध ठिकाणी आंदोलने करून देशभर शेतकरी संघटनांचे जाळे निर्माण केले. उसासहित कर्जमाफी व अन्य शेतकरी प्रश्‍नाबाबत सातत्याने लढणारा खासदार म्हणून देशभरातील शेतकरी संघटनांमध्ये एक दबदबा निर्माण केला. संघटनांची एकजूट बांधली; पण या निवडणुकीत मतदारांमध्ये याची छाप सोडण्यात मात्र ते अपयशी ठरले. लोकसभेच्या निवडणुकीत त्यांच्या विरोधात लढणार कोण असाच प्रश्‍न होता. त्यांचा विजय ही औपचारिकता होती. परंतु निवडणुका लागल्यानंतर मात्र चित्र पालटले. भाजपचा पाठिंबा काढून घेतल्यानंतर त्यांनी कॉँग्रेस राष्ट्रवादीची सलगी वाढविली. इथेच नाराजीला सुरवात झाली. निवडणुका जाहीर झाल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना लक्ष्य करीत त्यानी भाजपवर टीकास्त्र सोडले. कॉँग्रेस राष्ट्रवादीलाही उमेदवार मिळत नसल्याने त्यांनी शेट्टींच्या बरोबर आघाडी करीत त्यांना हातकणंगलेची उमेदवारी दिली. 

दोन्ही कॉँग्रेसवर टीका करून पदे मिळविलेल्या शेट्टींनी याच कॉँग्रेसच्या वळचणीला जावे ही बाब मतदारांना पचनी पडली नाही. त्यांनी स्वतंत्र लढावे, अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली; पण त्यांनी आघाडीतून लढण्याचा अंतिम निर्णय घेतला. ही बाब नापसंतीला कारणीभूत ठरली. याच बरोबर जातीयवाद हा फॅक्‍टर ही त्यांच्या पराभवातील एक महत्त्वाचा बाब ठरली. ते स्वत:च्याच जातीतील कार्यकर्त्यांना बळ देतात या भावनेतून बहुजन समाज त्यांच्या विरोधात गेला. त्यांच्यासोबत एकेकाळी काम करणारे मंत्री सदाभाऊ खोत, आमदार उल्हास पाटील या नेत्यांनी बहुजनांची मोट बांधून नवखे उमेदवार धैर्यशील माने यांना बळ दिले. जागा शिवसेनेची असली तरी, भाजपनेही ही जागा प्रतिष्ठेची केली. 

महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी कोणत्याही परिस्थितीत शेट्टी निवडून येऊ नयेत यासाठी शिवसेनेला रसद पुरविली. तरुण मतदाराही स्वाभिभानीच्या विरोधात गेल्याचे चित्र या निकालाच्या निमित्ताने दिसले. निकालाच्या संपूर्ण फेऱ्यात शेट्टी कधीच आघाडी मिळवू शकले नाहीत याचे दु:ख स्वाभिमानीच्या कार्यकर्त्याला नक्कीच बोचले असेल. स्वाभिमानीचे दैवत समजल्या जाणाऱ्या शेट्टींचा पराभव हा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांचे खच्चीकरण करणारा ठरला आहे. भविष्यात संघटना शेतकरी प्रश्‍नांबाबत किती जोराने लढते, या पराभवाचा त्यांच्या उमेदीवर परिणाम होईल का, याचे उत्तर येणारा काळच देऊ शकणार आहे. सध्या मात्र हा धक्का अनेक दिवस ऊस पट्ट्यात चांगलाच जाणवणार आहे.

सांगलीतही पराभव
हातकणंगले नजीकच्या सांगली लोकसभा मतदारसंघातही शेवटपर्यत उमेदवारीचा घोळ राहिला. कॉंग्रेसची जागा असलेल्या या मतदारसंघात कॉंग्रेसला उमेदवार मिळत नसल्याने ही जागा स्वाभिमानीला देऊ केली. अनेक प्रयत्न करुन माजी मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांचे नातू विशाल पाटील यांना स्वभिमानीकडून उमेदवारी दिली. ऐनवेळी स्वाभिमानीत दाखल झालेल्या विशाल पाटील यांना प्रचाराचे सूत्र अखेरपर्यंत सापडले नाही. विद्यमान खासदार संजय पाटील यांच्याबाबत नाराजी असूनही त्याचा फायदा विशाल पाटील यांना घेता आला नाही. कॉंग्रेस आघाडीनेही प्रचारास एकसंधपणा दाखविला नाही. परिणामी प्रचाराचा भार ‘स्वाभिमानी’वर आला. बहुजन आघाडीचे उमेदवार गोपीचंद पडळकर यांनीही निवडणूक लढवून विशाल पाटील यांच्या विजयाच्या शक्‍यतेवर पाणी फेरले. अखेर विद्यमान खासदार संजय पाटील यांनीच बाजी मारुन स्वाभिमानीच्या आशा संपुष्टात आणल्या. यामुळे सांगली जिल्ह्यातील स्वाभिमानींचे अस्तित्व टिकवण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.

इतर अॅग्रो विशेष
पापड उद्योगातून मिळाले शेतीला आर्थिक बळकहाटूळ (ता. शहादा, जि. नंदुरबार) येथील आशा व...
बाजारपेठेनुसारच पीक लागवडीचे नियोजनआष्टा (ता. वाळवा, जि. सांगली) येथील सौ. मृदुला...
अमेरिकन लष्करी अळीची कपाशीवरही चाल ! (...नगर : अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
महाराष्ट्रात २१ ऑक्टोबरला मतदान, २४ ला...नवी दिल्ली : महाराष्ट्रासह हरियाना राज्य...
नावीन्यपूर्ण संकल्पना रुजवीत यशस्वी...लासलगाव (जि. नाशिक) येथील शंतनू नानासाहेब पाटील...
औरंगाबाद रेशीम उपसंचालक कार्यालयाला...औरंगाबाद : मराठवाड्याची राजधानी औरंगाबाद येथे...
कोकण कृषी विद्याठाकडून बांबूच्या २६...दाभोळ, जि. रत्नागिरी  : कोकणात व्यावसायिक...
नगर जिल्ह्यात तागावर स्पोडोप्टेरा अळीचा...नगर ः मक्यावर अमेरिकन लष्करी अळीने (स्पोडोप्टेरा...
पावसामुळे खानदेशात उडदाचे नुकसानजळगाव  ः सततच्या पावसामुळे खानदेशात उडदाचे...
नागपूर विभागात तीन गावे लष्करी अळीच्या...नागपूर ः राज्यभरात मक्‍यावरील अमेरिकन लष्करी...
राज्यात अनेक ठिकाणी हलक्या ते मध्यम सरीपुणे ः  कमी दाबाच्या क्षेत्रामुळे राज्यातील...
श्रमशक्तीच्या जागरातून घडवूया समृद्ध...कितीही प्रगती झाली तरी मानवी जीवन, निसर्ग आणि...
शेतकऱ्यांच्या ‘महारोषा’चे काय?मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील...
खानदेशात लष्करी अळीकडून ४० टक्के मका...जळगाव  ः खानदेशात मका पिकावर अमेरिकन लष्करी...
नाशिक जिल्ह्यात मका लष्करी अळीच्या...नाशिक  : जिल्ह्यात यंदा अमेरिकन लष्करी अळीचा...
शेतकऱ्यांसाठी 'इर्मा' लागू करण्याचा...पुणे : राज्यात शेतकऱ्यांसाठी इर्मा अर्थात ‘‘इनकम...
दसरा-दिवाळीपर्यंत अभूतपूर्व 'कांदाटंचाई'पुणे : राज्यातील बाजार समित्यांत दोन दिवसांत...
कोकण, मध्य महाराष्ट्रात जोरदार पावसाची...पुणे : कर्नाटक, गोवा, अरबी समुद्र, कोकण आणि...
ठिकठिकाणी पावसाची हजेरीपुणे ः कमी दाबाचे क्षेत्र सक्रिय झाल्याने...
पाच कीटकनाशकांवर अमरावती विभागात दोन...मुंबई : कीटकनाशकांच्या वापरामुळे शेतकरी व...