सोलापुरात मेथी, शेपूला उठाव, दरात सुधारणा

सोलापुरात मेथी, शेपूला उठाव, दरात सुधारणा
सोलापुरात मेथी, शेपूला उठाव, दरात सुधारणा

सोलापूर  : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. ७) मेथी, शेपू, कोथिंबिरीला पुन्हा उठाव राहिला. त्यांच्या दरातील सुधारणाही कायम राहिल्याचे बाजार समितीच्या सूत्रांकडून सांगण्यात आले.

बाजार समितीच्या आवारात मंगळवारी (ता. ७) मेथीची सहा हजार पेंढ्या, शेपूची ४ हजार पेंढ्या आणि कोथिंबिरीची सात हजार पेंढ्यांपर्यंत आवक राहिली. गेल्या काही दिवसांपासून भाज्यांच्या आवकेत सातत्याने चढ-उतार होतो आहे. मंगळवारी पुन्हा तो तसाच राहिला. भाज्यांची आवक मुख्यतः स्थानिक भागातून झाली. पण भाज्यांना मागणी राहिल्याने दर टिकून राहिले. 

मेथीला शंभर पेंढ्यांसाठी किमान ८०० रुपये, सरासरी १००० रुपये, सर्वाधिक १२०० रुपये, शेपूला किमान ७०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक १३०० रुपये असा दर राहिला. आवक आणि मागणीतील तफावतीमुळे दरात सुधारणा राहिली. त्याशिवाय वांगी, हिरवी मिरची आणि टोमॅटोचे दर काहीसे स्थिर राहिले. वांग्याची २० ते ३० क्विंटल, हिरव्या मिरचीची १०० क्विंटल आणि टोमॅटोची १५० ते २०० क्विंटलंपर्यंत आवक राहिली. हिरव्या मिरचीला प्रतिक्विंटलला किमान १००० रुपये, सरासरी १६०० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये, वांग्याला किमान ३०० रुपये, सरासरी ९०० रुपये, सर्वाधिक २००० रुपये, तर टोमॅटोला किमान ३५० रुपये, सरासरी ८०० रुपये आणि सर्वाधिक १६०० रुपये असा दर मिळाला. 

कांद्याच्या दरात मात्र अद्याप सुधारणा झाली नाही. कांद्याची आवक स्थानिक भागाच्या तुलनेत सर्वाधिक जिल्ह्याबाहेरूनच झाली. कांद्याला प्रतिक्विंटलला किमान २०० रुपये, सरासरी ६५० रुपये आणि सर्वाधिक १२०० रुपये असा दर मिळाला.

काकडीला उठाव

सध्या उन्हाची तीव्रता वाढते आहे. त्यामुळे काकडीला मागणी वाढली आहे; पण काकडीची आवक अगदीच कमी आहे. गेल्या महिनाभरापासून काकडीचे दर किंचित चढ-उतार वगळता टिकून आहेत. मंगळवारीही काकडीची फक्त एक गाडीपर्यंत आवक राहिली. तिला प्रतिक्विंटलला किमान ३०० रुपये, सरासरी १००० रुपये आणि सर्वाधिक २००० रुपये असा दर मिळाला.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com