in shopping center gram spree at the Parbhani
in shopping center gram spree at the Parbhani

परभणीत केंद्रावर खरेदीचा हरभरा पडून

परभणी : वखार महामंडळाच्या गोदामात साठवणुकीसाठी जागा नसल्यामुळे जिंतूर तालुक्यासह अन्य तालुक्यातील शेतकरी उत्पादक कंपन्याच्या खरेदी केंद्रावर खरेदी केलेला हरभरा पडून आहे. तो ठेवण्यासाठी जागा नसल्याने खरेदी बंद ठेवावी लागत आहे.

जिंतूर तालुक्यात वर्णा, बोरी, भोगाव आदी ठिकाणच्या शेतकरी उत्पादक कंपन्यासह जिल्ह्यात आठ शेतकरी उत्पादक कंपन्या महाएफपीतर्फे हमीभावाने हरभरा खरेदी करत आहेत. वर्णा येथील वर्णेश्वर शेतकरी उत्पादक कंपनीतर्फे मंगळवार (ता.१९) पर्यंत नोंदणी केलेल्या ६८१ पैकी २३१ शेतकऱ्यांचा २ हजार ७३२ क्विंटल हरभरा खरेदी करण्यात आला. त्यापैकी २ हजार १४६ क्विंटल हरभरा वखार महामंडळाच्या गोदामात साठविण्यात आला. 

जिंतूर येथील गोदामात जागा नसल्यामुळे कंपनीच्या केंद्रावर ५८६ क्विंटल हरभरा पडून आहे. त्यामुळे गेल्या तीन दिवसापासून हरभरा खरेदी बंद आहे. वखार महामंडळाने गोदाम व्यवस्था करुन खरेदी बंद असल्यामुळे होत असलेली शेतकऱ्याची गैरसोय दूर करावी, अशी मागणी शेतकरी उत्पादक कंपनीचे अध्यक्ष दिलीप अंभुरे यांनी केली.  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com