Agriculture news in marathi Shops in rural areas in Solapur, Permission for industrial enterprises | Agrowon

सोलापुरात ग्रामीण भागातील दुकाने, औद्योगिक उपक्रमांना परवानगी

टीम अॅग्रोवन
बुधवार, 6 मे 2020

सोलापूर : ग्रामीण भागातील सर्व दुकाने (मॉल वगळता) आणि औद्योगिक उपक्रमांना ठराविक वेळेत उघडण्यास परवानगी दिली आहे.

सोलापूर : ‘कोरोना’ला रोखण्यासाठी १७ मेपर्यंत लॅाकडाऊन वाढवण्यात आला आहे. सोलापूर हे रेड झोनमध्ये आहे. त्यामुळे राज्य आणि केंद्र शासनाच्या सूचनेनुसार जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर यांनी संचारबंदी आणि लॅाकडाउनच्या काळात कोणते व्यवसाय सुरु राहतील आणि कोणते बंद राहतील, यासंबंधीचे आदेश काढले आहेत. त्यात ग्रामीण भागातील सर्व दुकाने (मॉल वगळता) आणि औद्योगिक उपक्रमांना ठराविक वेळेत उघडण्यास परवानगी दिली आहे. 

नागरी क्षेत्रातील सर्व स्वतंत्र दुकाने, कॉलनी शेजारी असणारी दुकाने आणि रहिवासी संकुलात असणारी दुकाने सुरु राहतील, असे शहर पोलिसांनी सांगितले. त्यानुसारच ग्रामीण भागासाठीही जिल्हाधिकाऱ्यांनी स्वतंत्र आदेश काढले आहेत. त्यात ग्रामीण भागाच्या प्रतिबंधित व हॅाटस्पॅाट क्षेत्रातील केश कर्तनालये बंद असतील. दवाखाने, टेलिमेडिसीन सुविधा, औषधालय, वैद्यकीय प्रयोगशाळा, बँका या सुरु असतील. 

आठवडे बाजार, शाळा, शैक्षणिक संस्था, मंगल कार्यालय, पान टपरी बंद ठेवण्याचा आदेश दिला आहे. खासगी कार्यालयात त्यांच्या एकूण मनुष्यबळाच्या ३३ टक्के इतक्या मनुष्यबळाचा वापर करुन सुरु ठेवता येतील. उर्वरित कर्मचाऱ्यांना घरात राहून काम करावे लागेल. ग्रामीण भागातील सर्व औद्योगिक, महापालिका क्षेत्राच्या बाहेरील उद्योग व कारखाने सुरु ठेवण्यास परवानगी देण्यात आली आहे. पण, मद्यविक्रीची दुकाने शहर आणि जिल्ह्यात दोन्हीकडे बंद असतील, असेही या आदेशात नमूद आहे. 
 

 
 


इतर बातम्या
सोलापूर जिल्ह्यात मराठा आरक्षणासाठी...सोलापूर  : मराठा समाजाला आरक्षण...
मुक्त विद्यापीठात कृषीविषयक अभ्यासक्रम...नाशिक : ‘‘यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त...
खानदेशातील सिंचन प्रकल्प भरलेजळगाव : खानदेशात या महिन्यातील जोरदार पावसाने...
सोलापूर जिल्ह्यात दहा हजार हेक्‍टरवर...सोलापूर : जिल्ह्यात गेल्या तीन-चार दिवसांपासून...
सोलापूर जिल्हा बॅंक देणार अल्प मुदतीचे...सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी...
परभणी, हिंगोलीत ओल्या दुष्काळाचे सावटपरभणी : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील अनेक मंडळांत...
जळगाव जिल्ह्यात उडीद, मूग खरेदीची...जळगाव : शासकीय उदीद, मूग खरेदीसंबंधीची प्राथमिक...
मराठवाड्यात कपाशी काळवंडली, सोयाबीन...औरंगाबाद : सततच्या पावसाने औरंगाबाद, जालना, बीड...
खानदेशातील कांदेबाग केळी काढणीला वेगजळगाव : खानदेशात कांदेबाग केळी काढणी सुरू झाली...
परभणीत भरपाईसाठी ‘स्वाभिमानी’ची पिकांसह...परभणी : अतिवृष्टीमुळे शेती पिकांचे अतोनात नुकसान...
नाशिक जिल्ह्यात खरिपासह भाजीपाला पिके...नाशिक : जिल्ह्याच्या सर्वदूर भागात शनिवारी (...
`औरंगाबाद जिल्ह्यातील नुकासानग्रस्त...औरंगाबाद : सतत सुरू असलेल्या पावसाने कोणत्या...
ऊसतोडणी दर ठरविताना उत्पादकांवरील बोजा...पुणे : दहा लाख ऊसतोडणी कामगारांच्या वतीने विविध...
शेती विधेयकांविरोधात शुक्रवारी बंदपुणे ः केंद्र सरकारने लोकसभेत पास केलेल्या...
मराठा आरक्षणावरील अंतरिम स्थगिती उठवावीमुंबई : मराठा आरक्षणासंदर्भात सर्वोच्च...
राहुरी कृषी विद्यापीठासाठी नव्या...पुणे: महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठाच्या...
‘मुळा’तून विसर्ग बारा हजार क्युसेकवर...नगर ः नगर जिल्ह्यातील मुळा धरणाच्या पाणलोटात पाऊस...
शेतकऱ्यांना कॉर्पोरेट कंपन्यांच्या...कोल्हापूर : पाशवी बहुमताच्या बळावर भलेही तुम्ही...
कांदा बियाण्याची टंचाईनगरः गेल्यावर्षी पाऊस व बदलत्या वातावरणामुळे...
मोताळा तालुक्यात वादळी पावसाने नुकसानबुलडाणा ः जिल्ह्यात शनिवारी (ता. १९) वादळी...