Agriculture news in marathi; Short response to Government guarantee purchase in Akola district | Agrowon

अकोला जिल्ह्यात शासनाच्या हमीभाव खरेदीला अल्प प्रतिसाद
टीम अॅग्रोवन
बुधवार, 16 ऑक्टोबर 2019

अकोला ः शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळवून देण्यासाठी शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. केंद्र सुरू झाले तेव्हापासून आत्तापर्यंत मात्र केवळ ९१ क्विंटल मुगाची खरेदी झाली असून, उडीद आणि सोयाबीन खरेदीचा मुहूर्तही झालेला नाही. विदर्भ मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशन आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

अकोला ः शेतमालाला किमान आधारभूत किंमत मिळवून देण्यासाठी शासनाचे हमीभाव खरेदी केंद्र सुरू केले. केंद्र सुरू झाले तेव्हापासून आत्तापर्यंत मात्र केवळ ९१ क्विंटल मुगाची खरेदी झाली असून, उडीद आणि सोयाबीन खरेदीचा मुहूर्तही झालेला नाही. विदर्भ मार्केटिंग को-ऑपरेटिव्ह फेडरेशन आणि जिल्हा मार्केटिंग फेडरेशनच्या वतीने खरेदी प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे.

बाजारपेठेत शेतकऱ्यांच्या शेतमालाला योग्य दर मिळावा, यासाठी शासनाकडून आधारभूत किमतीने खरेदीसाठी केंद्र सुरू केले जातात. याहीहंगामात आॅऩलाइन नावनोंदणी केलेल्या शेतकऱ्यांचा शेतमाल खरेदीची प्रक्रिया राबवली जात आहे. अकोला जिल्ह्यात नाफेडअंतर्गत मूग, उडीद, सोयाबीन खरेदीसाठी जिल्हा मार्केटिंग फेडरेशन व विदर्भ को-ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशनने केंद्र उघडले. अकोला, अकोट, मूर्तिजापूर, तेल्हारा, वाडेगाव, पातूर, पारस अशी आठ केंद्रे सुरू करण्यात आली. त्यावर आतापर्यंत नोंदणी केलेल्यांपैकी फक्त १६ शेतकऱ्यांकडून केवळ ९१ क्विंटल मुगाची खरेदी करण्यात आली. यात विदर्भ मार्केटिंग फेडरेशनने १४ शेतकऱ्यांचा ८० क्विंटल मूग खरेदी केला; तर जिल्ह्यातील तेल्हारा, वाडेगाव, पातूर, पारस या चार केंद्रांवर खरेदी करीत असलेल्या जिल्हा मार्केटिंग फेडरेशनद्वारे दोन शेतकऱ्यांकडून ११.५० क्विंटल मुगाची खरेदी झाली आहे.

शासनाने या हंगामासाठी मुगाचा हमीदर ७०५०, उडदाचा ५७०० आणि सोयाबीनचा ३७१० रुपये दर जाहीर केलेला आहे. सध्या बाजारपेठेत या भावांपेक्षा कमी दर असूनही शासकीय खरेदी केंद्रावर शेतकरी विक्रीसाठी येत नसल्याचे स्पष्टपणे दिसत आहे.

नोंदणीलाही प्रतिसाद कमीच
जिल्ह्यात आठ हमीभाव केंद्रे सुरू करण्यात आली आहेत. या केंद्रांवर शेतमाल विक्रीसाठी शेतकऱ्यांना आधी आॅनलाइन नावनोंदणीची गरज आहे. आढावा घेतला असता आतापर्यंत जिल्ह्यात ३ हजारांपर्यंत शेतकऱ्यांची नोंदणी झालेली आहे. मागील काही वर्षांचा विचार करता हा अत्यंत कमी प्रतिसाद मानला जात आहे. मूग, उडदाची नोंदणी करण्याची मुदत मंगळवारी (ता.१५) संपली आहे. आता सोयाबीन विक्रीसाठी शेतकऱ्यांना ३१ आॅक्टोबरपर्यंत नोंदणी करता येईल.

इतर ताज्या घडामोडी
साताऱ्यातील प्रमुख धरणांत ९९ टक्‍क्‍...सातारा ः जिल्ह्यात झालेली अतिवृष्टी; तसेत...
परभणी जिल्ह्यातील २० मंडळांमध्ये...परभणी ः दोन वर्षांच्या खंडानंतर परभणी जिल्ह्यात...
‘स्वाभिमानी’चे ठिय्या आंदोलन सुरू  सातारा ः जिल्ह्यातील सर्व ऊस उत्पादक शेतकऱ्यांना...
परभणी जिल्ह्यात रब्बीचे सव्वापाच टक्के...परभणी ः परभणी जिल्ह्यात यंदाच्या (२०१९-२०) रब्बी...
पुणे ः नऊ हजार हेक्टरवरील भाजीपाल्याचे...पुणे ः गेल्या आठ दिवसांपूर्वी झालेल्या अवकाळी...
जालना : निर्यातक्षम द्राक्षांच्या...जालना : निर्यातक्षम द्राक्ष बागांची नोंदणी...
लडाखला उभारणार सेंद्रिय शेती संशोधन...पुणे ः विविध शैक्षणिक क्षेत्रातील संशोधनावर...
नगर जिल्ह्यामध्ये २४१ वैयक्तिक पाणी...नगर ः वीस दिवस सतत पाऊस पडल्याने पाणीपातळी वाढली...
शेतकऱ्यामुळे टळला रेल्वे अपघात ! नगर : मनमाड-दौंड रेल्वेरुळाला विळद-देहरे गावच्या...
अतिपावसाने नगरमधील शेतजमिनी चिबडल्यानगर  : अतिपावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले...
नांदेड जिल्ह्यात साडेसहा लाख हेक्टरवरील...नांदेड : नांदेड जिल्ह्यात पावसामुळे झालेल्या...
वर्धा जिल्ह्यातील ६०० हेक्‍टरवरील ...वर्धा  ः जिल्ह्यात मॉन्सूनोत्तर पावसामुळे...
दक्षिण महाराष्ट्रातील साखर...कोल्हापूर  : दक्षिण महाराष्ट्रात पावसाने...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे उन्हाळ...नाशिक  : जिल्ह्यात ऑक्टोबर महिन्यात झालेल्या...
ऊसतोड कामगारांच्या रोजगारावर होणार...नगर ः गतवर्षी दुष्काळामुळे उसाचे क्षेत्र घटले....
वऱ्हाडातील प्रकल्प तुडुंबअकोला  ः गेल्या महिन्यात सतत झालेल्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा व्यापाऱ्यांवर धाडीनाशिक  : देशभरात कांद्याचा साठा संपुष्टात...
पीक व्यवस्थापन सल्ला सध्या मोठ्या प्रमाणात झालेल्या परतीच्या पावसामुळे...
कळमणा बाजारात सोयाबीनची आवक आणि दरातही...नागपूर ः येथील कळमणा बाजार समितीत नव्या सोयाबीनची...
जळगाव बाजारात केळीची आवक रखडतजळगाव ः जिल्ह्यात केळीची आवक रखडतच सुरू असून,...