agriculture news in marathi, Short stocks in minority projects in Satpuda | Agrowon

सातपुड्यातील लघू प्रकल्पांमध्ये अल्प साठा
टीम अॅग्रोवन
मंगळवार, 25 सप्टेंबर 2018

जळगाव : खानदेशात नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांतील शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, शिरपूर, चोपडा, यावल, रावेर या तालुक्‍यांचा मोठा भाग सातपुडा पर्वतातील प्रकल्प, नद्यांवर अवलंबून आहे. परंतु सातपुड्यातील नद्यांना पूर न आल्याने अनेक प्रकल्प अल्प प्रमाणातच भरले. काही लघू प्रकल्प कोरडेच आहेत.

जळगाव : खानदेशात नंदुरबार, धुळे व जळगाव जिल्ह्यांतील शहादा, तळोदा, अक्कलकुवा, धडगाव, शिरपूर, चोपडा, यावल, रावेर या तालुक्‍यांचा मोठा भाग सातपुडा पर्वतातील प्रकल्प, नद्यांवर अवलंबून आहे. परंतु सातपुड्यातील नद्यांना पूर न आल्याने अनेक प्रकल्प अल्प प्रमाणातच भरले. काही लघू प्रकल्प कोरडेच आहेत.

यावल तालुक्‍यातील नागादेवी तलाव, हरिपुरा धरण, रावेरातील गारबर्डी लघू प्रकल्पांमध्ये अल्प साठा आहे. यावल तालुक्‍यातील मोर धरण ५४ टक्केच भरले आहे. चोपडामधील गूळ व अनेर प्रकल्प ९० टक्केही भरलेले नाहीत. शिरपूर व चोपडा तालुक्‍याला अनेर धरणाचा लाभ होतो. त्यातून रब्बीसाठी आवर्तन सोडले जाते. परंतु या धरणातून दोनदाच आवर्तन मिळू शकते. उन्हाळ्यात पिण्याचे पाणी व कूपनलिकांच्या पुनर्भरणासाठी पाणी मिळणे कठीण होईल.

शहादा तालुक्‍यात सातपुड्यातून येणाऱ्या सुसरी नदीवरील म्हसावद- ब्राह्मणपुरीनजीकच्या रस्त्यावरील लघू प्रकल्प जवळपास भरला आहे. परंतु त्यातून पुढे पाणी सोडलेले नाही. कारण, प्रकल्पात मागील महिनाभरापासून जोरदार प्रवाहच नाही.

रावेरातील अभोरा, मंगरूळ व सुकी हे मध्यम प्रकल्प १०० टक्के भरले आहेत. त्याचा थोडा दिलासा मिळणार असला तरी नद्यांना पूर न आल्याने सातपुड्याच्या पायथ्यालगतच्या गावांमधील कूपनलिका, विहिरींच्या पाण्याची पातळी कमी होईल. पुढे नदीमध्ये धरणांमधून पाणी सोडावे लागेल. यावल तालुक्‍यात जोरदार पाऊस झालाच नाही. दुष्काळी स्थिती आहे.

 

इतर बातम्या
वणव्यामुळे पतंग, वनस्पतींच्या प्रजाती...जंगलामध्ये लागणाऱ्या वणव्याचे परागीकरण करणाऱ्या...
दुष्काळी स्थितीमुळे संत्रा बागांचे...शेलूबाजार जि. वाशीम ः निसर्गाच्या दुष्टचक्रामुळे...
नांदेड, परभणी जिल्ह्यांतील अकरा मंडळांत...नांदेड :  नांदेड, परभणी जिल्ह्यांतील ११...
कोल्हापूर जिल्ह्यातील धरणे निम्मी भरली कोल्हापूर : जिल्ह्यात पावसाचा जोर कमी झाला असला...
सांगली जिल्हा दुष्काळाच्या छायेतसांगली : पावसाळ्याचा दीड महिन्याचा कालावधी लोटला...
नाशिक जिल्ह्यात पावसाचे पुनरागमननाशिक : जिल्ह्यात पावसाने उघडीप दिल्यामुळे...
वाशीम जिल्ह्यात ‘सुजलाम सुफलाम’मधून २९७...वाशीम ः सुजलाम सुफलाम दुष्काळमुक्त महाराष्ट्र...
रत्नागिरीतील आठ धरणांची होणार तपासणीरत्नागिरी : ‘‘तिवरे धरण फुटल्यानंतर जिल्ह्यातील...
साक्री तालुक्यात दुष्काळाची शक्यतासाक्री, जि. धुळे : पाण्याचे स्रोत आटत आहेत. पाऊस...
मराठवाड्यातील २६६ मंडळांमध्ये पाऊसऔरंगाबाद/नांदेड ः मराठवाड्यातील ८ जिल्ह्यांतील ६३...
पावसाच्या आगमनाने नाशिकमधील शेतकरी...नाशिक : जिल्ह्यात पावसाने दडी मारल्याने...
पशुसंवर्धन विकासासाठी ७०० कोटींचा निधी...कोल्हापूर  : राज्यातील पशुसंवर्धन विकासाला...
मराठवाड्यातील पावणेनऊ लाखांवर शेतकरी...औरंगाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील...
विद्यार्थी, शेतकरीप्रश्नी ‘स्वाभिमानी’...बुलडाणा  : जिल्ह्यातील शेतकरी अनेक समस्यांना...
बारामतीत मुसळधार पाऊसपुणे  : जिल्ह्याच्या कोरडवाहू भागात असलेल्या...
नगर जिल्ह्यातील सहा महसूल मंडळांत...नगर : जिल्ह्यातील ३५ महसूल मंडळांत शनिवारी जोरदार...
कोणत्याही तंत्रज्ञानाचा डोळस स्वीकार...औरंगाबाद   : कोणत्याही तंत्रज्ञानाचा...
विधानसभा निवडणुकीत महायुतीने  २२० जागा...मुंबई  : आगामी विधानसभा निवडणुकीत महायुतीने...
सोलापूर जिल्ह्यात १७ हजार हेक्टर...सोलापूर ः गेल्या दोन वर्षांपासून सोलापूर जिल्हा...
नाशिक जिल्ह्यातील ४१ हजार हेक्टरवरील...नाशिक : जिल्ह्यात लष्करी अळीचा प्रादुर्भाव...