कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही राहण्याची शक्यता 

कंटेनर्सची टंचाई, भाडेवाढ आणि विकसित देशांत ट्रक ड्रायव्हर्सच्या कमतरतेने वाहतूक विस्कळीत होत आहे. सध्याची स्थिती पाहता पुढील वर्षातही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे.
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही राहण्याची शक्यता 
कंटेनर्सची टंचाई पुढील वर्षीही राहण्याची शक्यता 

पुणे : चालू वर्षीत शेतीमालासह इतर वस्तूंच्या जागतिक व्यापारात कंटेनर्स आणि जहाजांच्या टंचाईने खोडा घातला. मालाची उपलब्धता असतानाही कंटेनर्सची टंचाई, भाडेवाढ आणि विकसित देशांत ट्रक ड्रायव्हर्सच्या कमतरतेने वाहतूक विस्कळीत होत आहे. सध्याची स्थिती पाहता पुढील वर्षातही स्थिती कायम राहण्याची शक्यता आहे, असा अंदाज जाणकारांनी व्यक्त केला आहे. 

चालू वर्षी, २०२१ मध्ये जागतिक पातळीवर कंटेनर टंचाईचा मोठा अडथळा निर्माण झाला. वस्तूंची आयात-निर्यात कंटेनर्सच्या कमतरतेमुळे प्रभावित झाली. त्यात शेतीमालाच्या व्यापारालाही मोठा फटका बसला. कंटेनरच्या टंचाईमुळे वाहतुक भाड्यात अव्वाच्या सव्वा वाढ झाल्याने आयात आणि निर्यात महाग झाली. देशातून अनेक शेतीमालाची निर्यात कंटेनरच्या टंचाईने प्रभावित झाली. भारतात आयात खाद्यतेल आणि कडधान्याच्या दरावर वाहतूक महागल्याचा परिणाम दिसून आला. 

चालू वर्षात कंटेनर टंचाईमुळे जागितक पातळीवरील व्यापार प्रभावित झाला असतानाच पुढील वर्षातही ही समस्या कायम राहण्याची शक्यता काही शिपिंग कंपन्यांनी व्यक्त केली आहे. जागतिक पातळीवर देशांतर्गत शेतीमालासह इतर वस्तंची वाहतूक करणाऱ्या ट्रक ड्रायव्हर्सचीही कमतरता आहे. अनेक देशांत ही समस्या आता गंभीर बनत आहे. कोरोना काळात लॉकडाउनमुळे येथील स्थलांतरित मनुष्यबळ आपपल्या देशात परतले. विशेषतः विकसित देशांत ट्रक ड्रायव्हर्स हे मोठ्या प्रमाणात स्थलांतरित मजूर असतात. त्यामुळे ही समस्या पुढे आली आहे. यामुळे जहाजांमध्ये हजारो कंटेनर्सच्या माध्यमातून बंदरांवर पोहोचणाऱ्या मालाला बाहेर काढणे अवघड होत आहे. बंदरांवरून माल काढण्यासाठी ट्रकची संख्या वाढत नाही तोपर्यंत ही जहाजे बंदारांवर थांबून राहतील. त्यामुळे बंदरांवर जागेची उपलब्धता कमी राहील, याचा थेट परिणाम व्यापाराच्या गतीवर होईल. आयात-निर्यातीची प्रक्रिया विस्कळीत आणि संथ होईल.  जहाजे बंदरात अडकून राहताहेत  एका शिपिंग कंपनीच्या अधिकाऱ्याने सांगितले, की एकीकडे कामगारांची कमतरता आणि ट्रक ड्रायव्हर्सची उपलब्धता नसणे या कारणांमुळे जहाजे रिकामी करताना अडथळे निर्माण होत आहेत. त्यामुळे जहाजांना बंदरांतून बाहेर काढता येत नाही. ब्रिटन आणि अमेरिकेत हे संकट गंभीर बनले आहे. या देशांत अवजड वाहनांना चालविण्यासाठी ड्रायव्हर्स मिळत नाहीत. त्यामुळे कंपन्यांनी ड्रायव्हर्सच्या पगारात मोठी वाढ केली आहे. येथील बंदारांबाहेर जवळपास ३०० कंटेनर जहाज रिकामे होऊन पडले आहेत, ज्यांचा वापर होत नाही.  पुरवठा विस्कळीत  कोरोनाच्या विळख्यातून जागतिक अर्थव्यवस्था बाहेर पडत असताना आंतरराष्ट्रीय व्यापार वाढत आहे. यामुळे शिपिंग कंपन्यांना मोठे व्यवहार आणि नफ्याची आशा आहे. कंटेनर्स आणि जहाजांच्या भाड्यांत मोठी वाढ झाली आहे. तसेच टंचाईसुद्धा वाढत आहे. जागतिक पातळीवर अन्नधान्यासह इतर वस्तूंचीही मागणी वाढत आहे, मात्र पुरवठा त्या प्रमाणात होताना दिसत नाही. माल वाहतुकीच्या संदर्भातील विविध करणांनी शिपमेंटला उशीर होत आहे. बंदरांवर मालाचा मोठा साठा पडून आहे, पण दुसऱ्या देशात पाठविताना विविध अडचणी येत आहेत. तसेच आय़ात वस्तूंनाही बंदरातून बाहेर काढणे कठीण होत आहे. यंदा कंटेनर्समधून आयात-निर्यात २०१९ च्या तुलनेत ४ टक्यांनी आणि २०२० च्या तुलनेत काहीशी कमी आहे. शिपिंग कंपन्यांची जहाजे विविध बंदारांवर उभी अशून त्यातून माल उतरणे शक्य होत नाही. त्यातच बंदरांवरील आधिचीच जाहजे आणि कंटेनर्स गतीने खाली होताना दिसत नाहीत. तसेच पुढील वर्षात कंटेनर्सच्या प्रमाणात २ ते ४ टक्के घट दिसून येण्याची शक्यता आहे. कारण आयात आणि निर्यातदार आता मोठ्या व्यवहाराला पसंती देत आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com