Agriculture news in marathi shortage of laborers for cotton scrutiny in Parbhani district | Page 2 ||| Agrowon

परभणी जिल्ह्यात कापूस वेचणीसाठी मजुरांची वानवा

टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 नोव्हेंबर 2019

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत कापूस वेचणीसाठी मजुरांची वाणवा आहे. त्यामुळे बोंडातून फुटलेला कापूस झाडावरच उन्हात वाळत आहे. परिणामी, वजनात घट येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. फुटलेल्या बोंडातील कापूस जमिनीवर गळून पडत आहे. मजुराअभावी वेचणीसाठी विलंब होत असल्याने एकापाठोपाठ सर्वच बोंडे फुटली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी एकाच वेचणीमध्ये कापूस हंगाम संपण्याची चिन्हे आहेत.

परभणी : जिल्ह्यात यंदाच्या हंगामात सद्य:स्थितीत कापूस वेचणीसाठी मजुरांची वाणवा आहे. त्यामुळे बोंडातून फुटलेला कापूस झाडावरच उन्हात वाळत आहे. परिणामी, वजनात घट येऊन शेतकऱ्यांचे नुकसान होत आहे. फुटलेल्या बोंडातील कापूस जमिनीवर गळून पडत आहे. मजुराअभावी वेचणीसाठी विलंब होत असल्याने एकापाठोपाठ सर्वच बोंडे फुटली आहेत. त्यामुळे अनेक ठिकाणी एकाच वेचणीमध्ये कापूस हंगाम संपण्याची चिन्हे आहेत.

यंदा जिल्ह्यात २ लाख हेक्टरवर कपाशीची लागवड झाली. सुरवातीच्या काळात वाढीयोग्य पाऊस झाल्याने कपाशीची पीक परिस्थिती समाधानकारक होती. गतवर्षीच्या तुलनेने गुलाबी बोंड अळीचा प्रादुर्भावदेखील कमी होता. परंतु, सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांतील सततचा पाऊस आणि अतिवृष्टीमुळे कपाशीच्या पहिल्या बहाराच्या बोंडाचे अतोनात नुकसान झाले.

पाणी साचून राहिलेल्या शेतातील बोंडे सडली. फुटलेल्या कापसाची वेचणी न करता आल्यामुळे पावसात भिजून सरकीला कोंब फुटले. पावसाने उघडीप दिल्यानंतर सोयाबीनची सुगी, रब्बीची पेरणी यासोबतच कापूस वेचणीची कामे एकाच वेळी सुरू झाली. त्यात कापूस वेचणीसाठी मजुरांची कमतरता आहे.गतवर्षी सुरुवातीला कापूस वेचणीसाठी मजुरीचे दर प्रतिकिलोला ४ ते ५ रुपये होते. यंदा वेचणीचे दर ६ ते ८ रुपये प्रतिकिलो पर्यंत वाढले आहेत.

काही भागांत त्यापेक्षाही जास्त दर आहेत. नुकसान टाळण्यासाठी मजुरीचे दर वाढवून देण्यास अनेक शेतकरी तयार आहेत. परंतु, एकाचवेळी अनेक शेतीकामे सुरू असल्याने कापूस वेचणीसाठी मजूर मिळेना झालेत. त्यामुळे बोंडातून फुटलेला कापूस झाडावरच उन्हात वाळत आहे. जमिनीवर गळून पडत आहे. त्यामुळे वजनात घट येत आहे. 


इतर ताज्या घडामोडी
औरंगाबाद ‘केव्हीके’चे शेतकरी जोडो अभियानऔरंगाबाद : शेतकऱ्यांना जोडण्याच्या कामाला गती...
वऱ्हाडात यंदा पांढरे सोने ठरले...अकोला ः यंदाच्या खरिपात लागवड केलेले कपाशीचे पीक...
चक्रिवादळाचा थंडीवर परिणामकोल्हापूर, सांगली, पुणे, सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे...
औरंगाबादमध्ये गाजर सरासरी १८०० रूपयेऔरंगाबाद : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
गिरणारे मजूर बाजारामुळे मिळाला...गिरणारे, जि. नाशिक : पेठ, त्र्यंबकेश्‍वरसह...
वीजबिलांचा विषय मंत्रिमंडळाने सोडलेला...मुंबई : जे अंगावर येतील त्यांच्या हात धुवून मागे...
नामपूर बाजार समिती संचालक मंडळाला...नाशिक : सटाणा तालुक्यातील नामपूर कृषी उत्पन्न...
आंदोलक शेतकरी दिल्लीत दाखलचंडीगड/ नवी दिल्ली  : केंद्राच्या कृषी...
महाराष्ट्राचा विकास हेच समान सूत्र : ...मुंबई ः ‘‘मुंबई महापालिकेसह महाराष्ट्रातील...
मावा, तुडतुड्यांनी नुकसान केले पाच...भंडारा  : लाखनी तालुक्यात तुडतुडा, खोडकिडी,...
निर्यातवृद्धीसाठी पायाभूत सुविधा...रत्नागिरी  : जिल्ह्यात उत्पादित होणाऱ्या...
भाताला प्रति क्विंटलला ७०० रुपये बोनस सिंधुदुर्ग : शासनाने भाताला प्रतिक्विंटलला...
लाळ्या खुरकूतच्या लसींची गरजसांगली :  जिल्ह्यात सुमारे १३ लाख १६...
साताऱ्यात अकरा लाख टन ऊसाचे गाळप सातारा : जिल्ह्यात ऊस गाळप हंगामास गती आली...
पदवीधरची निवडणूक प्रक्रिया सतर्कतेने...औरंगाबाद : ‘‘पदवीधर मतदारसंघाच्या निवडणूक...
केकत जळगावात बिबट्याची दहशतऔरंगाबाद : पैठण तालुक्यातील केकत जळगावात...
किनवटमध्ये किसान सभेचा रास्ता रोको नांदेड : कामगारांच्या राष्ट्रव्यापी संप तसेच...
खानदेशात ‘रब्बी’तील पीक कर्जवाटप सुरूजळगाव : खानदेशात खरिपातील पीक कर्ज वितरण ६०...
नांदेड जिल्ह्यात अतिवृष्टीग्रस्तांच्या...नांदेड : जिल्ह्यातील नुकसानग्रस्तांच्या...
नाशिक जिल्ह्यात कांदा लागवडीसाठी धडपड नाशिक : बियाण्यांची टंचाई, तसेच अतिवृष्टीमुळे...