अनुदानित बियाण्यांचा यवतमाळमध्ये तुटवडा

रब्बी क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. त्याची दखल घेत यावर्षी जिल्ह्यात सुरवातीला १८ हजार त्यानंतर ९ हजार क्‍विंटल याप्रमाणे बियाणे पुरवठा करण्यात आला. आता मागणी वाढल्याने आंध्रप्रदेशातून पुन्हा २ हजार क्‍विंटल आणखी बियाणेपुरवठा यवतमाळ जिल्ह्यात करण्याचे प्रस्तावित आहे. या वर्षी राज्यात सर्वाधिक बियाणेपुरवठा यवतमाळ जिल्ह्यात करण्यात आला आहे. - के. एन. ठाकरे, जिल्हा व्यवस्थापक, महाबीज, यवतमाळ जॅकी ९२१८ हे वाण उत्पादनक्षम असल्याने त्याला शेतकऱ्यांची मागणी आहे. परंतु, दुकानातून हे बियाणेच गायब झाले आहे. कृषी विभाग आणि तत्सम यंत्रणांची उदासिनता यामागे कारणीभूत आहे. त्यांनी बियाणे उपलब्धता आणि विक्री याची माहिती घेणे गरजेचे आहे. - मनीष जाधव, शेतकरी, वागद, ता. महागाव, यवतमाळ
Shortage of subsidized seeds in Yavatmal
Shortage of subsidized seeds in Yavatmal

यवतमाळ : जमिनीत ओलाव्याच्या परिणामी यावर्षी जिल्ह्यात रब्बीखालील क्षेत्रात दुपटीने वाढ झाली आहे. परिणामी, जिल्ह्यात बियाण्यांचे नियोजन बिघडले आहे. शेतकऱ्यांकडून महाबीज त्यातही अनुदानित बियाण्यांना मागणी वाढल्याने त्याचा मोठा तुटवडा जिल्ह्यात निर्माण झाला आहे. तर दुसरीकडे खासगी बाजारपेठेत बियाण्यांचा तुटवडा असल्याचे सांगत दुप्पट दराने महाबीज बियाण्यांची विक्री केली जात आहे.  

यावर्षीच्या हंगामात पावसाळा वाढला. परिणामी, शेतात ओलावा असल्याने शेतकऱ्यांनी रब्बी क्षेत्रात वाढीचा निर्णय घेतला. त्यानुसार कृषी विभागाने देखील रब्बी लागवड क्षेत्र दुपटीने वाढीच्या अपेक्षेने त्यानुसार नियोजन केले आहे. जिल्ह्यात रब्बी हरभरा लागवड क्षेत्र ९९ हजार हेक्‍टरचे आहे. यावर्षी मात्र ते दुपटीने वाढत १ लाख ९१ हजार हेक्‍टरवर पोचण्याचा कृषी विभागाचा अंदाज आहे. त्यानुसार बियाणे, खते व इतर निविष्ठांचे नियोजन करण्यात आले. 

महाबीज, राष्ट्रीय बियाणे महामंडळ तसेच खासगी कंपन्यांच्या माध्यमातून जिल्ह्यात बियाणे पुरवठा केला जात आहे. यातील महाबीजचे राजविजय २०३ तसेच जॅकी ९२१८ हे दोन वाण दहा वर्ष कालखंडातील आहेत. त्यामुळे त्यांच्यासाठी अनुदानाची तरतूद करण्यात आली आहे. बाजारात विना अनुदानित बियाणे (तीस किलो बॅग) २१०० रुपयांना विकल्या जात आहे. 

अनुदानित बियाण्यांसाठी शेतकऱ्यांना अवघे १३५० रुपये प्रती ३० किलो बॅगसाठी द्यावे लागतात. बियाणे खर्चात मोठी बचत होत असल्याने शेतकऱ्यांकडून महाबीज त्यातही अनुदानित बियाण्यांना मागणी वाढल्याने त्याचा मोठा तुटवडा जिल्ह्यात निर्माण झाला आहे. एका शेतकऱ्याला एका सातबाऱ्यावर एक बॅग याप्रमाणे अनुदानित बियाणे मिळते. परंतु, बाजारातून हे बियाणेच गायब झाल्याने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com