सोयाबीन उत्पादकांना मदत द्यावी ः अनिल देशमुख

सोयाबीन उत्पादकांना मदत द्यावी :अनिल देशमुख
सोयाबीन उत्पादकांना मदत द्यावी :अनिल देशमुख

नागपूर : ‘‘काटोल आणि नरखेड तालुक्‍यात सोयाबीनवर मोठ्या प्रमाणावर येलो मोझॅक आणि रुटरॉट(खोडकिडा)चा प्रादुर्भाव आहे. कीडरोगाच्या परिणामी पीक उद्ध्वस्त झाल्याने शासनाने सर्वेक्षण व पंचनामे करून सोयाबीन उत्पादकांना मदत द्यावी, अशी मागणी माजी मंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

देशमुख यांनी उपविभागीय कृषी अधिकारी निमजे, कृषी विद्यापीठाचे तज्ज्ञ डॉ. नंदनवार, बाजार समिती सभपती तारकेश्‍वर शेळके यांच्यासह पिकाची पाहणी केली. खंडाळा, कलंभा, पेठमुक्‍तापूर, जलालखेडा या शिवाराला त्यांनी भेटी दिल्या.

गेल्या हंगामात कापसावर बोंड अळीचा प्रादुर्भाव झाला. कपाशी उत्पादकांचे मोठे नुकसान झाले. परंतू राज्य सरकारने काटोल व नरखेड तालुक्‍यातील शेतकऱ्यांना बोंड अळीच्या भरपाईपासून वंचित ठेवले. यावर्षी सोयाबीनवर येलो मोझॅक आणि खोडकिड्यांचा प्रादुर्भाव वाढीस लागला आहे. शेंगा पक्‍व होण्यापूर्वीच सोयाबीनची झाडे पिवळी पडून सुकायला सुरवात झाली आहे. हातचे पीक जाणार असल्याने शेतकऱ्यांची चिंता वाढली आहे, अशी माहिती देशमुख यांनी दिली.

या रोगाचा प्रादुर्भाव कसा होतो, त्याचे नियंत्रण कशाप्रकारे करावे, याविषयी मार्गदर्शन करण्यासाठी अद्यापही कृषी विभागाचे अधिकारी शिवारात पोचलेले नाहीत, असा आरोपही देशमुख यांनी केला. एकीकडे प्रतिकूल वातावरणामुळे पिकांवर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. दुसरीकडे शासन शेतकरी विरोधी धोरण अवलंबून शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडत आहे, असेही ते म्हणाले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com