आज महाराष्ट्रातील कोरडवाहू शेतीतील समस्या वाढत आहेत.
बातम्या
बुलडाणा ः चारा छावणी दाखवा आणि हजार रुपये मिळवा, 'स्वाभिमानी'चे आवाहन
बुलडाणा ः जिल्हा दौऱ्यावर आलेले पालकमंत्री मदन येरावार यांनी माध्यम प्रतिनिधीसोबत बोलताना जिल्ह्यात चारा छावण्या सुरू केल्याचे सांगितले. पत्रकारांनी किती छावण्या उघडल्या, असे विचारले असता त्यांच्याकडे याचे उत्तर नव्हते. जिल्ह्यात अद्याप एकही छावणी उघडलेली नसताना त्यांनी उघडल्याचे सांगितल्याने नंतर स्वतःच्या वक्तव्याची सारवासारव करावी लागली होती. या प्रकरणात आता 'स्वाभिमानी'ने पालकमंत्र्यांना चारा छावणी दाखवा व हजार रुपये मिळवा, असे आवाहन केले.

याबाबत संघटनेचे जिल्हाध्यक्ष कैलास फाटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, जिल्ह्यात शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहेत. अनेकांनी दुष्काळामुळे स्थलांतर केले. असे असताना पालकमंत्र्यांना जिल्ह्याचे सोयरसुतक नाही. दुष्काळाची दाहकता पाहता पालकमंत्र्यांनी काही ठरावीक गावांचा दुष्काळी दौरा केला. त्या वेळी त्यांना जिल्ह्यात सुरू असलेल्या उपाययोजनांची माहिती नव्हती. एकही चारा छावणी जिल्ह्यात सुरू दाखवा आणि हजार रुपये मिळवा, असे आवाहन करण्यात येत असल्याचे कैलास फाटे यांनी म्हटले आहे.
- 1 of 1543
- ››