आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक 

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे, भाजीपाल्याच्या आवक प्रत्यक्षापेक्षा कमी नोंदवून बाजार समितीची फसवणूक करून शुल्क बुडविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा प्रशासनाने उगारला आहे.
आवक कमी दाखवून  बाजार समितीची फसवणूक  Showing low income Market committee fraud
आवक कमी दाखवून  बाजार समितीची फसवणूक  Showing low income Market committee fraud

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे, भाजीपाल्याच्या आवक प्रत्यक्षापेक्षा कमी नोंदवून बाजार समितीची फसवणूक करून शुल्क बुडविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा प्रशासनाने उगारला आहे. शेतीमाल घेऊन येणाऱ्या आणि आवक कमी दाखविणाऱ्या १५७ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.  बाजार समितीमधील आवकेवर नजर ठेवण्यासाठी प्रशासनाने सुरक्षा रक्षकांद्वारा प्रत्येक गाळ्यावर आवक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत माजी सैनिकांच्या मदतीने शेतीमाल उतरवल्यानंतर गेटवरील आवक आणि गाळ्यावर प्रत्यक्ष उतरवलेली आवक तपासणी करून फरक आढळून आल्यास अशा टेम्पो चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे. अशा १५७ टेम्पो चालकांवर आतापर्यंत कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे एक लाख नऊ हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे, अशी माहिती बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली.  दरम्यान, बाजार समितीमध्ये बाजार शुल्क चोरीचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. यामधील मोठे मासे मोकाट असल्याची चर्चा बाजार आवारात आहे. अनेक मोठे आडते कमी आवक दाखवून बाजार समितीचे बाजार शुल्क चुकवत असल्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन होत असल्याचे वास्तव असून, वर्षांनुवर्ष हा प्रकार सुरू आहे. याकडे प्रशासक लक्ष देऊन, बाजार समितीचे उत्पन्न वाढविणार का? हा प्रश्‍न आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com