Agriculture news in marathi Showing low income Market committee fraud | Page 3 ||| Agrowon

आवक कमी दाखवून बाजार समितीची फसवणूक 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 26 जुलै 2021

पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे, भाजीपाल्याच्या आवक प्रत्यक्षापेक्षा कमी नोंदवून बाजार समितीची फसवणूक करून शुल्क बुडविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा प्रशासनाने उगारला आहे.

पुणे : पुणे कृषी उत्पन्न बाजार समितीमधील फळे, भाजीपाल्याच्या आवक प्रत्यक्षापेक्षा कमी नोंदवून बाजार समितीची फसवणूक करून शुल्क बुडविणाऱ्यांवर कारवाईचा बडगा प्रशासनाने उगारला आहे. शेतीमाल घेऊन येणाऱ्या आणि आवक कमी दाखविणाऱ्या १५७ वाहन चालकांवर दंडात्मक कारवाई करून १ लाख ९ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. 

बाजार समितीमधील आवकेवर नजर ठेवण्यासाठी प्रशासनाने सुरक्षा रक्षकांद्वारा प्रत्येक गाळ्यावर आवक तपासणी मोहीम हाती घेतली आहे. या मोहिमे अंतर्गत माजी सैनिकांच्या मदतीने शेतीमाल उतरवल्यानंतर गेटवरील आवक आणि गाळ्यावर प्रत्यक्ष उतरवलेली आवक तपासणी करून फरक आढळून आल्यास अशा टेम्पो चालकांवर दंडात्मक कारवाई सुरू केलेली आहे. अशा १५७ टेम्पो चालकांवर आतापर्यंत कारवाई करून त्यांच्याकडून सुमारे एक लाख नऊ हजार रुपये दंड वसूल करण्यात आलेला आहे, अशी माहिती बाजार समिती प्रशासक मधुकांत गरड यांनी दिली. 

दरम्यान, बाजार समितीमध्ये बाजार शुल्क चोरीचे मोठे रॅकेट सक्रिय आहे. यामधील मोठे मासे मोकाट असल्याची चर्चा बाजार आवारात आहे. अनेक मोठे आडते कमी आवक दाखवून बाजार समितीचे बाजार शुल्क चुकवत असल्याचे प्रकार सुरू आहेत. हे प्रकार बाजार समितीच्या कर्मचाऱ्यांना हाताशी धरुन होत असल्याचे वास्तव असून, वर्षांनुवर्ष हा प्रकार सुरू आहे. याकडे प्रशासक लक्ष देऊन, बाजार समितीचे उत्पन्न वाढविणार का? हा प्रश्‍न आहे. 


इतर ताज्या घडामोडी
पीकविमा योजना शासनाने चालवावी : भारत...अकोला : हजारो कोटी रुपये कमाई करणाऱ्या...
खानदेशात केळी दरांवर दबावजळगाव : खानदेशात केळीची आवक गेल्या पाच-सहा...
कृषी कायद्यांबाबतचा अहवाल खुला करावा :...अकोला : केंद्र सरकारच्या कृषिविषयक कायद्यांना...
सागर खोतकडून ‘स्वाभिमानी’च्या...नेर्ले, जि. सांगली : आमदार सदाभाऊ खोत यांचा मुलगा...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
खडसे, महाजन यांना सहकारात एकत्र...जळगाव : राज्याच्या राजकारणात माजी मंत्री एकनाथ...
फुंडकर फळबाग योजनेत शेतकऱ्यांचे ७५ लाख...नांदेड : रोजगार हमी योजनेत पात्र ठरु शकत नाहीत...
नाशिक बाजार समिती गैरव्यवहार प्रकरणी...नाशिक : लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने २६ ऑक्टोबर...
जमनालाल बजाज पुरस्कार बी. बी. ठोंबरे...लातूर : कौन्सिल फॉर फेअर बिझनेस प्रॅक्टिसकडून...
अज्ञाताने फवारले कांद्यावर तणनाशक; ...भुसावळ, जि. जळगाव : तळवेल (ता. भुसावळ) येथील...
पंजशीरवर तालिबानचा ताबा; गर्व्हनर...काबूल : अफगाणिस्तानातील सर्वात कठिण मानला...
शेतकरी संघटना शेतकऱ्यांच्या संपूर्ण...अकोला : शरद जोशी यांनी शेतकऱ्यांच्या पायातील सर्व...
काथ्या उद्योगवृद्धीसाठी सर्वतोपरी...सिंधुदुर्गनगरी ः जिल्ह्यात काथ्या उद्योग...
चांदूर बाजार तालुक्यात ४२ टक्‍क्‍यांनी...अमरावती : शेती कामाकरिता बैलांचा वापर होत...
शेतकऱ्यांची लूट थांबली पाहिजे : शरद पवारजुन्नर, जि. पुणे ः शेतीमालाला चांगला भाव देण्याची...
पाच मंगळवार शेती कामांना ब्रेक;...आर्णी, जि. यवतमाळ : ८५ वर्षांपूर्वी आलेल्या...
संत्रा उत्पादकांना शासनाने वाऱ्यावर...अमरावती : विदर्भातील मुख्य पीक असलेल्या संत्रा...
नागपूर जिल्हा परिषदेत ‘फाइल ट्रॅकर’नागपूर : ‘सरकारी काम आणि महिनाभर थांब’, असाच...
आंबा, काजू विम्यासाठी जुने निकष लागू...सिंधुदुर्गनगरी ः फळपीक विमा योजनेचे बदललेले निकष...
कृषी पदविका अभ्यासक्रम प्रवेश प्रक्रिया...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठांतर्गत...