पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढ
पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढ

पावसाची सर्वदूर संततधार; धरणसाठ्यात वाढ

गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी भागात जोर वाढला आहे. सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत महाबळेश्वर येथे सर्वाधिक १६९.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

पुणे : गेल्या दोन दिवसापासून राज्यातील बहुतांशी भागात जोर वाढला आहे. सर्वदूर पावसाची संततधार सुरू आहे. शुक्रवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यंत साताऱ्यातील महाबळेश्वर येथे सर्वाधिक १६९.६ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. धरणातील पाणीपातळीत वाढ होत आहे. ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या काही भागात पावसाचा जोर असून उर्वरित ठिकाणी मात्र पावसाने उघडीप दिली आहे. सह्याद्री पट्टयातील काही गावांना मुसळधार पावसाने झोडपून काढले. दोडामार्ग तालुक्यात पावसाने विश्रांती घेतली आहे. त्यामुळे तिलारीच्या नदीच्या पाणीपातळीत घट होऊ लागली आहे.  रत्नागिरी जिल्ह्यात श्रावणधारा पडत आहे. दापोली तालुक्यातील दाभोळ येथील नरेश महादेव साळवी, चिपळूण तालुक्यात देवपाट येथे श्रीमती पार्वती रामचंद्र दुर्गुळे व  शंकर भिकाजी जोगले यांच्या घराला पावसामुळे भेगा पडल्याने अंशत:  नुकसान झाले आहे. संगमेश्वर तालुक्यात सरंद येथील भागुराम रामजी जाधव यांच्या घराचे पावसामुळे नुकसान झाले. मध्य महाराष्ट्राच्या पश्चिम पट्ट्यातील पावसाचा जोर कायम आहे. पुणे जिल्ह्यातील बहुतांशी भागात पावसाचा जोर कायम आहे. मुळशी धरणाच्या पाणलोट क्षेत्रात ११४ मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. त्यामुळे धरणातील पाणीसाठा हळूहळू वाढ होत आहे. जिल्ह्यातील २६ धरणांमध्ये जवळपास ८.२२ टीएमसी पाणीसाठा उपलब्ध झाला. तर कळमोडी, खडकवासला, वीर धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. सातारा जिल्ह्यातील सर्वच तालुक्यात पाऊस सुरू असून पश्चिम भागात पावसाचा जोर अधिक आहे. यामुळे अनेक ठिकाणी शेतात पाणी साचले आहे. दुष्काळी तालुक्यात दडी मारलेल्या पावसाने पुन्हा एकदा हजेरी लावली आहे. या भागात झालेल्या जलसंधारणाच्या कामात पाणी भरून वाहू लागले आहे. सांगलीतील चांदोली धरण क्षेत्रात पावसाचा जोर असल्याने धरणातून पाण्याचा विसर्ग वाढविण्यात आला आहे. या धरणातून ८३०१ क्युसेक्सने पाण्याची विसर्ग सुरू आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाण्याच्या पातळीत वाढ होऊ लागली आहे. चांदोली धरणात ३०.१२ टीएमसी. पाणीसाठा झाला आहे. कोल्हापुरातील सहा प्रकल्पामध्ये शंभर टक्के तर इतर प्रकल्पामध्ये ९० टक्के पाणी साठा झाला आहे. धरणक्षेत्रात पावसाचा जोर कमी असल्याने पूर्वस्थितीत आहे. पंचगंगा नदीवरील सात, भोगावती नदीवरील चार बंधारे पाण्याखाली आहेत. नगरमधील मुळा, भंडारदरा, निळवंडे धरणाच्या पाणलोट क्षेत्रात गेल्या दोन दिवसापासून पावसाची जोरदार बॅटिंग सुरूच आहे. मुळा धरणाकडे कमी झालेली पाण्याची आवक पुन्हा वाढून चार मीटरला १६ हजार ३७५ क्यूसेकने सुरू होती. धरणाचा पाणीसाठा साडे पंधरा टीएमसीपर्यंत पोहोचला आहे. गेल्या दोन दिवसात या धरणात जवळपास पाऊण टीएमसी पाण्याची आवक झाली. पाणीसाठा सोळा टीएमसीचा टप्पा पार करेल. नाशिकमध्येही भावली, दारणा धरणाच्या पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस असल्याने ९९९६ व ९४८ क्सुसेकने विसर्ग सोडण्यात आला आहे. नांदुरमध्यमेश्वर येथून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग सुरु गोदावरी, नांदूरमध्यमेश्वर मधून वीस हजार क्युसेकने विसर्ग सुरू आहे. मराठवाड्यातील बहुतांश मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला. काही मंडळात मध्यम ते दमदार तर काही मंडळात पावसाची रिमझिम रिपरिप सुरूच होती. औरंगाबाद जिल्ह्यातील जवळपास ६४ मंडळात पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील भावसिंगपुरा, विहामांडवा, वेरूळ, बोरगाव बाजार, भराडी, बोरगाव, सोयगाव, सावळदबारा मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला. हिंगोली जिल्ह्यातील २४ मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला.   जालना जिल्ह्यातील ४९ मंडळात पावसाची हजेरी लागली. जिल्ह्यातील पिंपळगाव मंडळात सर्वाधिक पावसाची नोंद झाली. बीड जिल्ह्यातील ५४ मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला. परभणी जिल्ह्यातील ३५ मंडळातही पावसाची हजेरी तुरळक ते हलकीच होती. उस्मानाबाद जिल्ह्यातील जवळपास ३५ मंडळात तुरळक, हलका, मध्यम पाऊस झाला. नांदेड जिल्ह्यातील जवळपास ७४ मंडळात तुरळक ते हलका पाऊस झाला. लातूर जिल्ह्यातील ४९ मंडळात तुरळक ते हलक्‍या पावसाची नोंद झाली. त्यामुळे पिकांना दिलासा मिळाला. मागील दोन दिवसांपासून वऱ्हाडातील अकोला, बुलडाणा, वाशीम जिल्ह्यासह, पूर्व विदर्भातील नागपूर, चंद्रपूर, गोंदिया, भंडारा, वर्धा, यवतमाळ संततधार पाऊस होत असून यामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. सततच्या पावसामुळे अकोल्यातील काटेपूर्णा, खडकपूर्णा प्रकल्पातील साठा वाढत असल्याने या दोन्ही प्रकल्पांच्या काही गेटमधून पाण्याचा विसर्ग केल्या जात आहे. या भागात दोन दिवसांपासून संततधार पाऊस होत आहे. या पावसामुळे सध्या शेतीतील संपूर्ण कामे ठप्प झालेले आहेत. बुलडाणा जिल्ह्यातही बहुतांश ठिकाणी पाऊस होत आहे. शुक्रवारी (ता.१४) सकाळी आठ वाजेपर्यत झालेला पाऊस, मिलिमीटरमध्ये ः कोकण : सांताक्रुझ ४१.४, डहाणू ४६.८, जव्हार ८३, मोखेडा ७४.२, पालघर ४९.४, तलासरी ४१, विक्रमगड ८१, वाडा ७१, कर्जत ८१.२, महाड ९४, माणगाव ७६, म्हसळा ५०, पनवेल ५४.४, पेण ४०, रोहा ६८, सुधागडपाली ८०, तळा ७८, चिपळूण ७७, हर्णे ६९.४, खेड ७७, मंडणगड ८१, अंबरनाथ ५०, भिवंडी ६०, कल्याण ६५, शहापूर ६०, ठाणे ४७, उल्हासनगर ४७. मध्य महाराष्ट्र : अकोले ५९, धुळे ८२, गिधाडे ६९.२, शिरपूर ७९, शिंदखेडा ५८, अंमळनेर ६१, चोपडा ५६, धरणगाव ६३, एरंडोल ५०, जळगाव ४३.५, पारोळा ५७, यावल ४५.२, पन्हाळा ४४, राधानगरी ८७, शाहूवाडी ३८, अक्रणी ५८, नंदुरबार ५९, नवापूर ८० शहादा ६१, तळोदा ६८, हर्सूल ५१.८,ओझरखेडा ४७.२, पिंपळगाव बसंवत ५३.२, सुरगाणा ६२.२,  घोडेगाव ४७, लोणावळा कृषी ८८, पौड ६६, जावळीमेढा ५७.२, कोरेगाव ५५, पाडेगाव ५१,सातारा ७६.७ विदर्भ : चांदूरबाजार ३१.५, मोर्शी ३३.९, मातोळा ३२.१, अहेरी ७१.८, भामरागड ३०.४ सिरोंचा ८५.२, आमगाव ३८, कळमेश्वर ३२.३, कामठी ३३.२, नरखेडा ३१.५, पारशिवणी ३४.१, सावनेर ४८.८, खारंघा ३३.६ राज्यात १०० मिलिमीटरपेक्षा अधिक पाऊस झालेली ठिकाणे  :   खालापूर १६०, माथेरान ११४.६, पोलादपूर १०६, अक्कलकुवा १३८, इगतपुरी १२०, त्र्यंबकेश्वर ११०, वेल्हे १३३

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com