Agriculture news in marathi Shraddha's milk business inspires the younger generation | Page 3 ||| Agrowon

‘श्रद्धा’चा दूध व्यवसाय युवा पिढीला प्रेरणादाई 

टीम अॅग्रोवन
सोमवार, 19 एप्रिल 2021

श्रद्धा नवीन पिढीला दूध व्यवसायात प्रेरणा देणारी आहे. तिच्या पेरणेतून ग्रामीण भागात या व्यवसायाला अधिक प्रेरणा मिळणार आहे. तिची यशोगाथा महाराष्ट्राच्या समोर नेण्यासाठी सरकार काम करणार असल्याचे स्पष्ट करत राज्याचे दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार श्रद्धा ढवण या तरुणीच्या दूध व्यवसायातील प्रगती पाहून भारावले. 

नगर ः श्रद्धा नवीन पिढीला दूध व्यवसायात प्रेरणा देणारी आहे. तिच्या पेरणेतून ग्रामीण भागात या व्यवसायाला अधिक प्रेरणा मिळणार आहे. तिची यशोगाथा महाराष्ट्राच्या समोर नेण्यासाठी सरकार काम करणार असल्याचे स्पष्ट करत राज्याचे दुग्ध व्यवसाय मंत्री सुनील केदार श्रद्धा ढवण या तरुणीच्या दूध व्यवसायातील प्रगती पाहून भारावले. 

निघोज (ता. पारनेर) येथील श्रद्धा ढवण या पदवीचे शिक्षण घेत असलेल्या तरुणीने तिच्या वडिलांनी सुरू केलेला दूध व्यवसाय पुढे नेटाने सुरू ठेवला आहे. उलट म्हशीच्या संख्येत वाढ करुन ६० म्हशींचा ती संभाळ करतेय. वडील अपंग असल्याने या व्यवसायातील बहुतेक कामे श्रद्धाच करत आहे. हे पाहून राज्याचे दुग्धविकास मंत्री सुनील केदार ही भारावले. 

एखाद्या दूध व्यवसायात प्रगती करणाऱ्या शेतकऱ्यांच्या घरी भेट देण्यासाठी पारनेर तालुक्यात पहिल्यांदाच दुग्धविकासमंत्री आले होते. श्री. केदार यांनी शनिवारी (ता. १८) भेट देऊन पाहणी केली. दूध काढण्यापासून गोठा व्यवस्थापनासह अन्य बाबी एक महाविद्यालयीव तरुणी काही वर्षांपासून सक्षमपणे करतेय हे पाहून केदार यांनी कौतुक केले. 

विचारानंतर माणूस सिद्ध करुन शकतो हे श्रद्धांने दाखवून दिले आहे. स्वयंरोजगार उभा करून तरुणांनी उभे राहावे. दुधाचे, पशुखाद्याचे दर वाढले. दूध व्यवसाय मागणी व पुरवठा यावर अवलंबून आहे. मात्र दुधाचा व्यवसाय शेती आणि तरुण शेतकऱ्यांना बळ देणारा असल्याचे सांगतानाच श्रद्धा नवीन पिढीला दूध व्यवसायात प्रेरणा देणारी आहे. तिच्या पेरणेतून ग्रामीण भागात या व्यवसायाला अधिक प्रेरणा मिळणार आहे. तिची यशोगाथा महाराष्ट्राच्या समोर नेण्यासाठी सरकार काम करणार असल्याचे श्रद्धा ढवण हिच्या प्रेरणादायी कामाचे यावेळी गावांतील प्रमुख नेत्यांनीही कौतुक केले. 

या भागातील दुग्ध व्यावसायिकांसाठी पशुवैद्यकीयचा फिरता दावाखाना तातडीने सुरू करणार असल्याचेही यावेळी केदार यांनी जाहीर केले. राज्याचे सहायक दुग्धआयुक्त श्रीकांत शिरपुरकर, कन्हैया दूध उद्योग समूहाचे मच्छिंद्र लंके, पशुसंवर्धन उपायुक्त बी. एन. शेळके, मच्छिंद्र ढवण, नवनाथ ढवण, कल्याण थोरात, संतोष ढवण, नवनाथ गाडगे, राजेंद्र मस्के आदी गावकरीही उपस्थित होते. 

दूध व्यवसाय कोरोनामुळे संकटात आहे. गेल्या वर्षीही हा व्यवसाय संकटात होता. गेल्या वर्षी चारशे कोटी रुपये खर्च करून शासनाने अतिरिक्त दूध खरेदी केले होते. तीच भूमिका पुढे शासन ठेवणार आहे. कष्टकऱ्यांच्या मागे शासन उभे राहणार आहे. युवा पिढीने असे दूध व्यवसायात पुढे आले पाहिजे. 
- सुनील केदार, मंत्री दुग्धविकास 

मी करत असलेल्या दूध व्यवसायाला कोणी भेट दिली तर कामाला अधिकपणे चालना मिळते. आता आमच्या भागाला फिरता दवाखाना मिळणार असल्याने अन्य पशुपालकांनाही फायदा होईल. वडिलांचा व्यवसाय मी संभाळते. त्याचा मला आनंद होत आहे. 
- श्रद्धा ढवण, दूध व्यावसायिक, निघोज ता. पारनेर 


इतर ताज्या घडामोडी
सोलापूरच्या कृषी विभागात कोरोनाचा शिरकावसोलापूर ः जिल्ह्यात कोरोना संसर्गाचा विळखा वरचेवर...
पंढरपूरला आणखी २०० बेड वाढवणार ः भरणेसोलापूर : ‘‘पंढरपुरातील वाढत्या कोरोना...
केहाळ येथे भुईमुगाची उन्हाळी हंगामात...परभणी ः जिल्ह्यातील केहाळ (ता. जिंतूर) येथील...
नाशिकच्या उत्तरपूर्व भागात टँकर सुरूनाशिक : जिल्ह्याच्या अनेक भागात समाधानकारक पाऊस...
लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत...लातूर : लातूर कृषी विभागातील पाच जिल्ह्यांत...
परभणीत कपाशी क्षेत्र घटण्याची शक्यतापरभणी ः ‘‘जिल्ह्यात यंदाच्या खरीप हंगामात...
सोलापुरात माल उतरण्यासाठी भुसार बाजारात...सोलापूर ः सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या...
सातारा : कांदा बी सदोष निघाल्याने...विसापूर, जि. सातारा : खासगी कृषी फार्म, व्यापारी...
विमा कंपनी विरोधात शेतकऱ्यांमध्ये रोषगोंदिया : खरीप हंगामात अतिवृष्टी, संततधार पाऊस व...
सोयाबीन बियाण्यांची खरिपासाठी जुळवाजुळवअकोला : येत्या हंगामासाठी शेतकरी घरगुती सोयाबीन...
‘कुरनूर’मधून पाण्याचे दुसरे आवर्तन सोडलेसोलापूर ः अक्कलकोट तालुक्यातील कुरनूर धरणातून...
पंढरपुरातील दोन्ही भक्त निवासे कोरोना...सोलापूर ः पंढरपूर शहर आणि तालुक्यातील कोरोना...
कोरोना सुपरस्प्रेडर रोखण्यासाठी पुणे...पुणे : कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ग्रामीण भागात...
सांगलीत साखरेचे उत्पादन १३ लाख...सांगली जिल्ह्यातील साखर कारखान्यांच्या गळीत...
‘पंदेकृवि’चा दीक्षान्त समारंभ अखेर पुढे...अकोला ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...
ऑक्सिजन, रेमडेसिव्हिरचा पुरवठा करा ः...मुंबई ः महाराष्ट्राला अधिक ऑक्सिजनची गरज असून,...
बाजार समिती कर्मचाऱ्यांना विम्यासाठी ‘...पुणे ः कोरोना संकटात बाजार समिती कर्मचाऱ्यांचा ५०...
डाळिंब प्रक्रिया, मुल्यवर्धन तंत्रज्ञान...औरंगाबाद : डाळिंब पिकापासून जास्त आर्थिक नफा...
वन्यप्राण्यांपासून पीक वाचवण्यासाठी...मंडणगड, जि. रत्नागिरी ः वन्य प्राण्यांच्या...
यंदा कर्तव्य असणाऱ्यांसाठी ६४ मुहूर्त नागपूर : कोरोनामुळे वेळेवर तारखांत बदल करावा लागत...