श्री गजानन महाराज पालखीचे सोलापुरात उत्साहात स्वागत

श्री गजानन महाराज पालखीचे सोलापुरात उत्साहात स्वागत
श्री गजानन महाराज पालखीचे सोलापुरात उत्साहात स्वागत

सोलापूर  : विठुनामाचा अखंड जयघोष करीत शेगावच्या श्री गजानन महाराजांच्या पालखीचे शुक्रवारी (ता. ५) सकाळी सोलापूर शहरात आगमन झाले. पालखीचे यंदा ५२ वे वर्ष आहे. आज (ता. ६) पालखीचा मुक्काम असून, उद्या (ता. ७)) पालखी पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहे. 

महापौर शोभा बनशेट्टी यांनी सोलापूरवासीयांच्या वतीने पालखीचे स्वागत केले. पालखीचा दोन दिवस सोलापुरात मुक्काम राहणार आहे. या वेळी उपमहापौर शशिकला बत्तुल, सभागृह नेते संजय कोळी, महापालिका आयुक्त दीपक तावरे, पोलिस आयुक्त अंकुश शिंदे, नगरसेविका श्रीदेवी फुलारे, सुरेखा काकडे, गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेवक अविनाश पाटील, गुरुशांत धुत्तरगावकर, गणेश पुजारी, अग्निशमनदल अधीक्षक केदार आवटे उपस्थित होते. 

उळे येथून पहाटे सहाच्या सुमारास श्री गजानन महाराजांची पालखी सोलापूरच्या दिशेने निघाली. सकाळी साडेनऊच्या सुमारास तिचे पाणी गिरणी चौकात आगमन झाले. भजन गात भगव्या पतका हातामध्ये घेतलेले वारकरी लक्ष वेधून घेत होते.

या ठिकाणी पालखीच्या दर्शनासाठी भाविकांनी गर्दी केली. आज सकाळी सात वाजता कुचन प्रशालेतून पालखी निघेल. दुपारी ती उपलप मंगल कार्यालयात मुक्कामासाठी येईल. तेथून रविवारी सकाळी पालखी पंढरपूरसाठी निघेल. दुपारी देगाव येथे भोजन घेऊन पालखी पुढे मार्गस्थ होईल.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com