agriculture news in Marathi shrimp export got setback due to Corona in china Maharashtra | Agrowon

चीनला होणाऱ्या कोळंबी निर्यातीला फटका

कोजेन्सिस वृत्तसेवा
मंगळवार, 18 फेब्रुवारी 2020

नवी दिल्ली: चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे येथील महत्वाचे बाजार बंद आहेत. त्यामुळे देशातून चीनला होणाऱ्या कोळंबी निर्यातीला फटका बसला आहे. चीनमधून असणारी मागणी घटणार आहे, अशी माहिती ‘आयसीआरए’ने दिली.  

भारत हा समुद्री उत्पादन निर्यात करणारा महत्त्वाचा देश आहे. विशेषतः कोळंबी निर्यात मोठ्या प्रमाणात होते. अमेरिकेनंतर चीन हा भारतीय कोळंबीचा सर्वांत मोठा ग्राहक आहे. २०१९ मध्ये अमेरिकेने ६ लाख ९८ हजार टन आयात केली होती, तर चीनने ६ लाख ५० हजार टन समुद्री उत्पादनांची आयात केली होती. 

नवी दिल्ली: चीनमध्ये कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. त्यामुळे येथील महत्वाचे बाजार बंद आहेत. त्यामुळे देशातून चीनला होणाऱ्या कोळंबी निर्यातीला फटका बसला आहे. चीनमधून असणारी मागणी घटणार आहे, अशी माहिती ‘आयसीआरए’ने दिली.  

भारत हा समुद्री उत्पादन निर्यात करणारा महत्त्वाचा देश आहे. विशेषतः कोळंबी निर्यात मोठ्या प्रमाणात होते. अमेरिकेनंतर चीन हा भारतीय कोळंबीचा सर्वांत मोठा ग्राहक आहे. २०१९ मध्ये अमेरिकेने ६ लाख ९८ हजार टन आयात केली होती, तर चीनने ६ लाख ५० हजार टन समुद्री उत्पादनांची आयात केली होती. 

‘आयसीआरए’ने प्रसिध्द केलेल्या अहवालात म्हटले आहे, की कोळंबी निर्यात करणाऱ्या ज्या कंपन्या चीनच्या निर्यातीवर सर्वाधिक अवलंबून असतात त्यांना लगेच मोठा फटका बसत आहे आणि भविष्यात आणखी फटका बसेल. चीनमधून कोळंबीला उठाव न मिळाल्यास जागतिक बाजारात मालाचा पुरवठा वाढून दरावर परिणाम होईल. अतिरिक्त कोळंबी पुरवठ्यामुळे निर्यातदारांचे अधीक नुकसान होईल. 

‘‘जागतिक बाजारात कोळंबील पुरवठा येणाऱ्या काळात वाढण्याची शक्यता आहे. पुरवठा वाढल्यानंतर सध्या मिळत असलेल्या दरात मोठी घसरण होईल. चीनमध्ये कोरोना विषाणुचा कहर सुरु झाल्यानंतर इक्वेडॉरमध्यून आयात झालेल्या कोळंबीचे दर कमी होण्यास प्रारंभ झाला आहे. इक्वेडॉर हे समुद्रीउत्पादन निर्यात करणारा महत्त्वाचे देश आहे. 

चीनमधील वितरण साखळी प्रभावित
चीनमध्ये कोरोना पसरल्याने निर्यात झालेल्या मालाची वितरण साखळी प्रभावित झाली आहे. तसेच मागणीही कमी झाली आहे. आयात झालेला माल उतरविणे, साठवणूक, हाताळणी आणि प्रक्रिया आदी कामे प्रभावित झाली आहेत. ही कामे समुद्री उत्पादनाच्या वितरणात महत्त्वाची असतात. परंतु ही कामेच प्रभावित झाल्याने मूल्यसाखळीवर परिणाम झाला आहे. सध्याच्या वातावरणात निर्यात झालेला माल कंटेनरमधून उतरविणे खूपच अवघड होऊन बसले आहे. त्यामुळे सध्या येथील पुरवठा कमी केला जात आहे, असे  ‘आयसीआरए’ने म्हटले आहे.


इतर अॅग्रो विशेष
राज्यात दिवसभरात १५० नवीन रुग्ण, १२...पुणे : राज्यात कोरोनाचा संसर्ग झालेल्या...
शेतीमाल थेट विक्रीचा समन्वय भक्कम केला...नगर ः ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर संचारबंदी...
राज्यात शुक्रवारपासून वादळी पावसाचा...पुणे  : राज्यात उन्हाचा ताप वाढत असल्याने...
कृषी रसायन कंपन्यांचा कच्चा माल अडकलापुणे  : ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लागू...
व्यावसायिक चातुर्यातून ४० टन कलिंगडाची...कोरोना संकटामुळे शेतमाल विक्री व्यवस्था अडचणीत...
गोदामांत ९० लाख टन साखर पडून; बंदरात...सोलापूर : अडचणीत सापडलेला साखर उद्योग २०१४-१५...
‘डिपिंग ऑईल’ची चढ्यादराने अनाधिकृत...नाशिक/सोलापूर : जिल्ह्यात द्राक्ष मालाला उठाव...
राज्यात दिवसभरात वाढले १२० रुग्ण;...पुणे : राज्यात सोमवारी १२० नवीन रुग्णांची...
मराठवाड्यात १०० वर लघु मध्यम प्रकल्प...औरंगाबाद : मराठवाड्यातील ८७३ लघु, मध्यम, मोठ्या...
रब्बी कांदा उत्पादन २५ लाख टनांनी वाढणारपुणे : देशाच्या कांदा बाजारपेठांमध्ये यंदाच्या...
भाजीपाल्याच्या नव्या लागवडीबाबत संभ्रम...कोल्हापूर : ‘कोराना’च्या संकटामुळे गेल्या काही...
अर्धबंदिस्त शेळीपालनाने वाढवले शेतीचे...कृषी विषयात पदवीचे शिक्षण पूर्ण झाल्यावर...
पूर्व विदर्भात पावसाला पोषक हवामानपुणे  : राज्यात तापमानाचा पारा सातत्याने...
`अमूल`कडून शेतकऱ्यांना मंदीतही २००...पुणे : राज्यातील डेअरी उद्योग सध्या अतिशय बिकट...
राज्यात कोरोना रुग्णसंख्या ७४८;...मुंबई : राज्यातील कोरोनाचा विळखा वाढत चालला...
केंद्र सरकारकडून रासायनिक खत अनुदानात...पुणे: ऐन लॉकडाऊनच्या गोंधळात केंद्र सरकारने...
शेतकरी कंपन्यांची संकलन केंद्रे...पुणे:  ‘ई-नाम’ प्रणालीत गेल्या दोन...
कोरोनामुळे हापूस अडचणीत; मुंबई बाजार...मुंबई : मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वाशी...
कोरोनामुळे ‘टोमॅटो बेल्ट’ लॉकडाऊन; पुणे...पुणेः गेल्या काही वर्षात जिल्‍ह्यातील जुन्नर, खेड...
कोल्हापूर कृषी महाविद्यालयाकडून...कोल्हापूर : येथील कोल्हापूर कृषी महाविद्यालयाच्या...