श्रीराम साखर कारखान्याच्या १५ जागा बिनविरोध

Shriram sugar factory 15 seats unopposed
Shriram sugar factory 15 seats unopposed

फलटण शहर, जि. सातारा : येथील श्रीराम सहकारी साखर कारखान्याच्या २१ जागांपैकी १५ जागा बिनविरोध झाल्या आहेत. सलग चौथ्यांदा या कारखान्याची सत्ता विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राजे गटाने कायम राखली आहे. 

येथील श्रीराम कारखान्याच्या २१ जागांसाठी ७८ अर्ज दाखल झाले होते. अर्ज दाखल करण्याच्या अंतिम दिवसापर्यंत ५४ उमेदवारांनी अर्ज माघारी घेतल्याने निवडणूक रिंगणात आता नऊ उमेदवार राहिले आहेत. व्यक्ती उत्पादक मतदारसंघातील पाच गटांतून प्रत्येकी तीन उमेदवार निवडून द्यायचे होते.

यातील व्यक्ती उत्पादक गट क्रमांक एकच्या होळ-गिरवी मतदारसंघातून कारखान्याचे उपाध्यक्ष नितीन भोसले, शिवराज कदम, यशवंत सूर्यवंशी, व्यक्ती उत्पादक गट क्रमांक दोनच्या फलटण-विडणी मतदारसंघातून जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष संजीवराजे नाईक- निंबाळकर, हनुमंत अभंग, उत्तम चौधरी, व्यक्ती उत्पादक गट क्रमांक पाचच्या आसू- शिंदेवाडी या मतदारसंघातून नितीन शिंदे, स्वामीनाथ  साबळे, महादेव माने हे बिनविरोध निवडून आले आहेत. 

व्यक्ती उत्पादक गट क्रमांक दोनच्या जिंती-राजाळे मतदारसंघातून निवडून देण्याच्या तीन जागांसाठी विनायक शिंदे, पोपट जाधव, सुखदेव बेलदार, शरद रणवरे या चौघांचे अर्ज राहिले. व्यक्ती उत्पादक गट क्रमांक चारच्या गुणवरे-निंबळक या मतदारसंघातून तीन जागांसाठी संतोष खटके, दत्तात्रय शिंदे, विठ्ठल गौड, बजरंग गावडे, रमेश गावडे यांचे अर्ज राहिले.

‘ब'' वर्ग मतदारसंघातून चंद्रकांत पवार, अनुसूचित जाती-जमाती प्रतिनिधी मतदारसंघातून अशोक सोनवणे, महिलांच्या प्रतिनिधी मतदारसंघातून द्रौपदा नरुटे, आशा गावडे, इतर मागासवर्गीय जातीचा प्रतिनिधी मतदारसंघातून कारखान्याचे विद्यमान अध्यक्ष बाळासाहेब शेंडे, भटक्‍या विमुक्त जाती-जमाती विशेष मागास प्रवर्गातून मारुती सांगळे हे बिनविरोध निवडून आले. 

कारखान्यावर मागील पंधरा वर्षांपासून रामराजे नाईक- निंबाळकर यांच्या नेतृत्वाखालील राजे गटाच्या श्रीराम पॅनेलचे वर्चस्व आहे. व्यक्ती उत्पादकच्या दोन मतदारसंघासाठी १६ फेब्रुवारी रोजी मतदान आणि १७ रोजी मतमोजणी होणार आहे, अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी प्रकाश अष्टेकर, सहायक निबंधक सुनील धायगुडे यांनी दिली.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com