agriculture news in Marathi Shubham made easy calf puller for cattle delivery Maharashtra | Agrowon

गाई, म्हशीच्या सुलभ प्रसूतीसाठी ‘शुभम’ने बनविला इझी काफ पुलर

कल्याण पाचांगणे
गुरुवार, 12 डिसेंबर 2019

माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरतो. यासाठी संशोधन करून, नवीन यंत्रांच्या निर्मितीचे काम प्रयोगशील विद्यार्थी करताहेत. या पैकीच एक आहे, बारामती येथील पशुसंवर्धन महाविद्यालयातील शुभम जाधव. या विद्यार्थ्याने अडलेल्या गाई, म्हशींची प्रसूती सुलभ होण्यासाठी ‘इझी काफ पुलर’ हे वैशिष्ट्यपूर्ण यंत्र विकसित केले आहे. 

माळेगाव, जि. पुणे ः शेती, पशुपालन करताना येणाऱ्या अडचणींवर मात करण्यासाठी नवीन तंत्रज्ञानाचा वापर फायदेशीर ठरतो. यासाठी संशोधन करून, नवीन यंत्रांच्या निर्मितीचे काम प्रयोगशील विद्यार्थी करताहेत. या पैकीच एक आहे, बारामती येथील पशुसंवर्धन महाविद्यालयातील शुभम जाधव. या विद्यार्थ्याने अडलेल्या गाई, म्हशींची प्रसूती सुलभ होण्यासाठी ‘इझी काफ पुलर’ हे वैशिष्ट्यपूर्ण यंत्र विकसित केले आहे. 

 आजकाल बहुतांश पशुपालकांकडे संकरित गाई आणि म्हशी आहेत. यांच्या प्रसूतीदरम्यान वासरे अडकण्याचा प्रकार पाहायला मिळतो. या वेळी पशुतज्ज्ञ तात्काळ उपलब्ध झाला नाही तर गाय, म्हैस किंवा त्यांची वासरे मृत होण्याची शक्यता असते. सशक्त गाई, म्हशी आपोआप वितात. परंतु, अशक्त गाय किंवा संकरित गाई विताना वासरू अडकणे (डिस्टोकिया) या जननप्रक्रियेतील अडचणीला पशुपालकाला नेहमी सामोरे जावे लागते. साधारणपणे अशा परिस्थितीत गाईची प्रसूती करण्यासाठी जास्त माणसांची गरज भासते.

 गर्भाशयाच्या तोंडातून वासरू आपोआप बाहेर येत नसेल, तर चार लोकांच्या मदतीने ओढून काढावे लागते. अशा वेळी जास्त जोर लावून वासरू ओढून काढल्यास गर्भाशय फाटण्याची शक्यता असते. या प्रकारात वासरू आणि गाय, म्हशींच्या जिवाला धोका होऊ शकतो. जर गर्भाशयाला इजा झाली तर गाय, म्हैस पुन्हा गाभण राहू शकत नाही. काही वेळा गाई, म्हशी लवकर माजावर येत नाहीत.

असे आहे इझी काफ पुलर 

  • यंत्र वापरून पशुपालक आणि पशुवैद्यकाला एक ते दोन व्यक्तींची मदत घेऊन अडलेल्या गाय, म्हशींची प्रसूती करता येणे शक्य.
  • यंत्र वापरण्यास सोपे. गर्भाशयाच्या तोंडातून यंत्राने वासरू बाहेर ओढताना एकसारखे ओढले जाते. गर्भाशयाला कोणतीही इजा होत नाही. एक व्यक्तीदेखील पशुतज्ज्ञाच्या मार्गदर्शनानुसार अडलेली गाय, म्हशीची प्रसूती करू शकतो.
  • यंत्र वापरताना वासराच्या पायाला दोरी बांधून यंत्रावर बसवलेल्या पुलाद्वारे एकसारखा दाब देऊन खटका मागे ओढला असता वासरू गर्भाशयाच्या तोंडातून व्यवस्थित बाहेर येते. 

यंत्राच्या झाल्या चाचण्या 

  • बारामती येथील कृषी विज्ञान केंद्राच्या गोठ्यामध्ये इझी काफ पुलर यंत्राचा वापर करून दहा गायींची प्रसूती करण्यात आली. या यंत्राच्या सर्व तपासण्या नियमानुसार झाल्या आहेत. हे यंत्र वापरासाठी पूर्णपणे सुरक्षित आहे. यंत्राद्वारे अवघ्या दोन मिनिटांत गर्भाशयाच्या तोंडातून वासरू ओढून बाहेर काढले जाते. गाई, म्हशींना इजा होत नाही. 
  • शुभम जाधव याने या यंत्राचे पेटंट दाखल केले आहे. सध्या शुभम हे यंत्र किफायतशीर किमतीला विकत असून, भविष्यात मोठ्या प्रमाणात यंत्राच्या उत्पादनाचे नियोजन आहे.  
  • इझी काफ पुलर यंत्र विकसित करण्यासाठी शुभम जाधव याला पशुसंवर्धन महाविद्यालयातील डॉ. धनंजय भोईटे, कृषी विज्ञान केंद्रातील पशुतज्ज्ञांची मदत झाली. अटल इन्क्युबेशन सेंटरमधील तज्ज्ञ शुभमला यंत्राचे पेटंट मिळविणे, तसेच यंत्र निर्मितीसाठी बीज भांडवल उभारण्यासाठी मदत करीत आहेत. 

इतर अॅग्रो विशेष
पोपटराव पवार, राहिबाई पोपेरे यांना...नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून शनिवारी (ता. २५)...
कोयना धरणाच्या पोटात होणार आणखी एक धरणकोयनानगर, जि. सातारा ः येथील कोयना धरणाची...
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत केवळ १४...औरंगाबाद : संकटांशी दोन हात करून आपली शेती जिवंत...
खानदेशात रब्बीत अत्यल्प पीक कर्जवाटपजळगाव ः खानदेशात रब्बी हंगामातील पेरण्या जवळपास...
वटवाघळांचा मोर्चा आता द्राक्ष बागांकडेपुणे: वटवाघळांची वस्तीस्थाने आणि अधिवास...
गटाने तयार केला `कोकणरत्न' ब्रॅंडकुर्धे (जि. रत्नागिरी) गावातील श्री नवलाई देवी...
रासायनिक अवशेषमुक्त शेती हेच भवितव्य:...नाशिक : रासायनिक खते व कीटकनाशकांच्या...
विदर्भ, कोकणात उद्यापासून पावसाचा अंदाजपुणे : राज्याच्या किमान तापमानात चढ-उतार सुरूच...
कौशल्य, कृषी, उद्योग विभाग देतील...परभणी: पंतप्रधान कौशल्य विकास योजना आणि...
शेतकरीविरोधी कायद्यांबाबत सहा महिन्यांत...पुणे : शेतकरी आत्महत्यांना पूरक ठरणारे कायदे रद्द...
राज्यातील बाजार समित्या निवडणुका पुढे...पुणे: ज्या बाजार समित्यांच्या निवडणुका...
अण्णासाहेब पाटील महामंडळाने १०००...नगर : अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास...
शेती, जलसंधारण अन् शिक्षणाचा घेतला वसामांडाखळी (जि. परभणी) येथील मातोश्री जिजाऊ ग्राम...
रेशीम संजीवनीरेशीम उद्योगाचा विस्तार व विकास करण्याच्या...
ऑनलाइन बॅंकिंग करताय, सावधान!आधुनिक युगात विज्ञानामुळे नवनवीन शोधांमुळे मानव...
‘पोकरा’मध्ये अखेर जबाबदाऱ्यांचे विभाजनअकोला ः पोकरा प्रकल्पाच्या अंमलबजावणीत कृषी...
कृत्रिम रेतन नियंत्रण कायदा कधी? पुणे: पशुधनाच्या आरोग्याला घातक असलेली सध्याची...
किमान तापमानात होतेय घटपुणे : गेल्या काही दिवसांपासून गायब झालेली थंडी...
सात-बारा कोरा करण्याची सुबुद्धी सरकारला...पंढरपूर, जि. सोलापूर: विधानसभा...
सरकारी पीकविमा कंपनी हवी : शेतकरी...नागपूर ः खासगी कंपन्या तयार नसतील तर केंद्राने...