agriculture news in Marathi, SIAM will help to flood affected farmers, Maharashtra | Agrowon

अतिवृष्टी, पूरग्रस्त शेतकऱ्यांना ‘सियाम’चा मदतीचा हात
टीम अॅग्रोवन
शुक्रवार, 13 सप्टेंबर 2019

औरंगाबाद : अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना रब्‍बी हंगामासाठी लागणारे जवळपास २ कोटी ३८ रुपये किमतीचे बियाणे पुरविण्याचा निर्णय सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(सियाम)ने घेतला आहे. त्यासंबंधीचे पत्र सियामच्या वतीने सोमवारी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना देण्यात आले. 

औरंगाबाद : अतिवृष्टी व पुरामुळे नुकसान झालेल्या राज्यातील शेतकऱ्यांना रब्‍बी हंगामासाठी लागणारे जवळपास २ कोटी ३८ रुपये किमतीचे बियाणे पुरविण्याचा निर्णय सीड इंडस्ट्रीज असोसिएशन ऑफ महाराष्ट्र(सियाम)ने घेतला आहे. त्यासंबंधीचे पत्र सियामच्या वतीने सोमवारी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना देण्यात आले. 

‘सियाम' ही महाराष्ट्रात कार्यरत असणाऱ्या मुख्य बियाणे कंपन्यांची अधिकृत नोंदणीकृत संघटना आहे. अतिवृष्टी व पुरामुळे राज्यातील काही भागात शेती व शेतकऱ्यांचे आतोनात नुकसान झाले आहे. सामाजिक दायित्वाचे भान ठेवताना कर्तव्य म्हणून सियामच्या जवळपास १५ सभासद कंपन्यांनी रब्बी हंगामात लागणाऱ्या पिकाचे बियाणे स्वरूपात मदत करण्याचा निर्णय घेतला आहे.  

यामध्ये अजित सीड्‌स प्रा. लि, अंकुर सीड्‌स प्रा. लि., वसंत ॲग्रोटेक इंडिया लि., एलोरा नचरल सीड्‌स प्रा. लि., ग्रीन गोल्ड सीड्‌स प्रा. लि., कलश सीड्‌स प्रा. लि., नोन यू. सीड्‌स (इ) प्रा. लि., महिको, नामदेव उमाजी ॲग्रोटेक प्रा. लि., नाथ बायोजिन्स इंडिया लि., रासी सिड्‌स प्रा. लि., सफल सीड्‌स अँड बायोटेक प्रा. लि., तुलसी सीड्‌स प्रा. लि., नोव्हागोल्ड सीड्‌स प्रा. लि., निर्मल सीड्‌स प्रा. लि. आदी कंपन्या सहभागी आहेत. 

जवळपास २ कोटी ३८ लाख रुपयांचे बियाणे पुरविण्याची तयारी या कंपन्यांनी दर्शविली आहे. यामध्ये गहू, मक्‍का, हरभरा, वाटाणा, रब्बी ज्वारी, चारा पिके तसेच भाजीपाला पिकांच्या बियाण्यांचा समावेश आहे. यासंबंधीचे पत्र सियामच्या प्रतिनिधींनी राज्याचे कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांना सोमवारी (ता. ९) सियामचे अध्यक्ष अजित मुळे, वैभव काशिकर, संतोष थावरे, सियामचे कार्यकारी संचालक डॉ. शालिग्राम वानखेडे यांनी सुपूर्त केले.

या वेळी कृषी विभागाचे निविष्ठा व गुणनियंत्रण संचालक विजय घावटे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती. कृषी आयुक्‍तालयाच्या मार्गदर्शनाखाली बियाणे पुरविण्याची कार्यवाही केली जाणार असल्याचे सियामचे कार्यकारी संचालक डॉ. वानखेडे यांनी कळविले आहे. 

इतर ताज्या घडामोडी
नाशिकमध्ये उद्या द्राक्ष ऑक्टोबर छाटणी...नाशिक : महाराष्ट्र राज्य द्राक्ष बागायतदार संघ,...
सीताफळ कोरडवाहू क्षेत्रासाठी लाभदायी ः...अमरावती ः सीताफळ हे कोरडवाहू क्षेत्राला तारून...
वर्धा ः पांदण रस्ते विकासाकरिता दहा...वर्धा ः निविष्ठा व शेतमालाच्या वाहतुकीत पांदण...
अतिवृष्टीबाधितांना प्रशासनाकडून आर्थिक...गडचिरोली ः अतिवृष्टी व पुरामुळे बाधित झालेल्या...
नुकसानग्रस्त मका उत्पादकांना एकरी २५...परभणी : लष्करी अळीच्या प्रादुर्भावाने मका पिकाचे...
शिक्षक, ग्रामसेवकांना नोकरीच्या ठिकाणी...पुणे  : जिल्हा परिषदेकडून नियुक्त करण्यात...
हिंगोली जिल्ह्यात हळदीच्या क्षेत्रात...हिंगोली  ः यंदा (२०१९-२०) हिंगोली जिल्ह्यात...
नगर जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही...नगर ः जिल्ह्यातील सहा तालुक्यांत अजूनही कमीच...
कर्जमुक्तीच्या मागणीसाठी चार गावांमध्ये...परभणी  ः शासनाने केलेली कर्जमाफी फसवी आहे....
सरकारने शेतकऱ्यांना  ५० हजार कोटींची...सातारा   : गेल्या पाच वर्षांत राज्य...
पितृपंधरवाड्यामुळे पुण्यात भाज्यांना...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार...
दुष्काळमुक्त महाराष्ट्रासाठी...सिंधुदुर्ग  ः कर्जमुक्त आणि दुष्काळमुक्त असा...
मागण्या मंजूर झाल्याने ग्रामसेवकांचे...अकोला  ः विविध मागण्यांसाठी राज्यात २२...
उदयनराजे भोसले यांचा अखेर भाजपमध्ये...नवी दिल्ली  : राष्ट्रवादी काँग्रेसचे...
औषधी गुणधर्म लक्षात घेता, पेरू, शेवगा...सोलापूर ः ‘‘पेरू आणि शेवगा ही तशी दुर्लक्षित पिके...
वंचित, कष्टकरी संघटना विधानसभा लढविणार...पुणे  : राज्य आणि केंद्र सरकारच्या विरोधात...
भंडारा जिल्‍ह्यात पावसामुळे शेकडो हेक्‍...भंडारा ः मध्य प्रदेशातील संततधारेमुळे जिल्ह्यात...
सांगली येथे गूळ ३२०० ते ३८७५ रुपये...सांगली  : येथील बाजार समितीत शनिवारी (ता. १४...
`कांदा आयातीचे धोरण शेतकऱ्यांना...पुणे  : कांदा आयात करण्याचे केंद्र सरकारचे...
स्मार्ट ग्रामअंतर्गत सायखेडा, गिरोली,...वाशीम ः जिल्हा परिषद पंचायत विभागातर्फे...