agriculture news in marathi, siddheshwar yatra starts tomorrow, solapur, maharashtra | Agrowon

सिद्धेश्‍वर यात्रेला आजपासून प्रारंभ
टीम अॅग्रोवन
रविवार, 13 जानेवारी 2019

सोलापूर  : ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेला रविवारपासून (ता. १३) प्रारंभ होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेतील सिद्धेश्‍वरांचा मुख्य अक्षता सोहळा सोमवारी (ता. १४) होत आहे. यंदा यात्रेत जवळपास २५० स्टॉल उभारण्यात येत आहेत. यात्रेच्या निमित्ताने कृषी प्रदर्शन आणि जनावर बाजारही भरवला जाणार आहे. त्याचीही तयारी पूर्ण होत आली आहे.

सोलापूर  : ग्रामदैवत सिद्धेश्‍वर यात्रेला रविवारपासून (ता. १३) प्रारंभ होत आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही पाच दिवस विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. यात्रेतील सिद्धेश्‍वरांचा मुख्य अक्षता सोहळा सोमवारी (ता. १४) होत आहे. यंदा यात्रेत जवळपास २५० स्टॉल उभारण्यात येत आहेत. यात्रेच्या निमित्ताने कृषी प्रदर्शन आणि जनावर बाजारही भरवला जाणार आहे. त्याचीही तयारी पूर्ण होत आली आहे.

यात्रेच्या निमित्ताने सिद्धेश्‍वर मंदिर, मल्लिकार्जुन मंदिर, गुरुभेट व सोन्नलगी सिद्धेश्‍वर मंदिर तसेच सिद्धेश्‍वर महाराज यांनी स्थापन केलेल्या ६८ लिंगांच्या ठिकाणीही विद्युतरोषणाई करण्यात आली आहे. यात्रेच्या निमित्ताने सिद्धेश्‍वर महाराज यांच्या योगदंडाचे प्रतीक असलेल्या नंदीध्वजांची मिरवणूक पारंपरिक पद्धतीने निघेल.

सिद्धेश्‍वर पालखीची मिरवणूक रविवार (ता. १३) ते गुरुवार (ता. १७) या कालावधीत निघेल. १३ जानेवारीला सकाळी आठ वाजता मल्लिकार्जुन मंदिराजवळील हिरेहब्बू मठातून मिरवणुकीला सुरवात होईल. ती ठरलेल्या मार्गाने सिद्धेश्‍वर मंदिरात जाईल. तेथून एक वाजता काठ्यांची मिरवणूक निघेल. ती ६८ लिंगांना तैलाभिषेक करून प्रदक्षिणा घालून रात्री आठ वाजता हिरेहब्बू मठात परत येईल.

संस्कार भारती व कला फाउंडेशनच्या वतीने यंदाही मिरवणूक मार्गावर रांगोळीच्या पायघड्या घालण्यात येणार आहेत. कसबा पेठेतील हिरेहब्बू मठापासून ते सिद्धेश्‍वर मंदिर परिसरातील संमती कट्ट्यापर्यंत पायघड्या असतील. गेल्या १९ वर्षांपासून हा उपक्रम राबविला जात आहे.

भारताच्या विविध भागांतील विक्रेते सिद्धेश्‍वर यात्रेत स्टॉल उभारणार आहेत. यात्रेच्या निमित्ताने गेल्या ४९ वर्षांपासून रेवणसिद्धेश्‍वर मंदिराच्या परिसरात जनावर बाजार आणि होम मैदावर भव्य असे कृषी प्रदर्शनाचे आयोजन केले जाते. यंदा बुधवार (ता. १६) ते रविवार (ता. २०) या कालावधीत कृषी प्रदर्शन भरविले जाणार आहे. प्रदर्शनात नावीन्यपूर्ण कृषी अवजारे, उत्पादनांच्या दालनांचा समावेश आहे. जनावर बाजाराची जागा यंदा बदलण्याच्या हालचाली आहेत. त्याबाबतही दोन दिवसांत निर्णय होईल. पण कृषी प्रदर्शन आणि जनावर बाजार हे यात्रेचे मोठे आकर्षण असते.

यात्रेतील धार्मिक कार्यक्रम  

  •  १३ जानेवारी     यण्णीमज्जन : ६८ लिंगांना तैलाभिषेक 
  •  १४ जानेवारी    संमतीभोगी : संमती कट्ट्यावर अक्षता समारंभ 
  •  १५ जानेवारी    मकरसंक्रांत : होमप्रदीपन समारंभ 
  •  १६ जानेवारी    किंक्रांत : होम मैदानावर शोभेचे दारूकाम 
  •  १७ जानेवारी    कप्पडकळ्ळी : नंदीध्वजांचे वस्त्रविसर्जन 

इतर ताज्या घडामोडी
खानदेशात शेतीकामात मजूरटंचाईजळगाव : खानदेशात जुलैमधील अखेरचे १० दिवस व...
पोल्ट्रीधारकांना सवलतीच्या दरात धान्यविटा, जि. सांगली : पोल्ट्रीधारकांना...
नाशिक जिल्ह्यात पावसामुळे पूर्वहंगामी...नाशिक : संततधार सुरू असलेल्या पावसामुळे...
नांदेड जिल्ह्यात पीककर्जाचे ७३ हजारांवर...नांदेड : चालू आर्थिक वर्षाच्या (२०१९-२०) पहिल्या...
कर्जमाफीबाबत धोरण सुस्पष्ट नाही : एकनाथ...जळगाव  : शासनाने शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली....
पुणे विभागात खरिपाची नऊ लाख ८० हजार...पुणे  ः पावसाअभावी खरीप पेरण्या उशिराने...
कुठे गेला कृत्रिम पाऊस ; सरकारने...बदनापूर / भोकरदन, जि. जालना ः अर्धे राज्य...
रासप ५७ जागांची मागणी करणार : महादेव...हिंगोली  : आगामी विधानसभा निवडणुकीत...
मुंबई बाजार समितीच्या निवडणुकीची ‘...पुणे  ः चटई निर्देशाकांसह कोट्यवधी...
अकोला जिल्ह्यात ‘आत्मा’चा कारभार...अकोला  ः राज्याच्या कृषी विभागात कधीकाळी...
कऱ्हाडमधील ९९ शाळांना बसला महापुराचा...कऱ्हाड, जि. सातारा  : महापुरामुळे...
गडचिरोली जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे १७९७...गडचिरोली  ः या वर्षी अतिवृष्टीमुळे...
जळगावात गवार २५०० ते ४६०० रुपये...जळगाव : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी (...
तणनाशकांची कार्यपद्धती, निवडकता पिकातील तणनियंत्रण हे अत्यंत महत्त्‍वाचे आणि...
नगर जिल्ह्यातील ४३ हेक्टर जमीन गेली...नगर  ः जिल्ह्यात पंधरा दिवसांपूर्वी गोदावरी...
पूरबाधित क्षेत्रातील उसाचे व्यवस्थापन पुराच्या पाण्याचा कालावधी, पाण्याचा गढूळपणा आणि...
संत्रा फळपिकावरील तपकिरी कुज व्यवस्थापन लिंबू वर्गीय फळझाडास वर्षातून तीनदा बहार येतो....
नत्राच्या दुहेरी समस्यांवर मात...जागतिक पातळीवर नत्राचे प्रदूषण आणि शेतीसाठी...
डाळिंबाच्या मार्केटिंग, प्रक्रिया...सोलापूर  : ‘‘जिल्ह्यात उत्पादन होणारे डाळिंब...
जळगाव जिल्हा सहकारी दूध संघाला तीन...जळगाव  ः जळगाव जिल्हा सहकारी दूध उत्पादक...