Agriculture news in Marathi, Siddhewadi and Anjani lake dry | Page 3 ||| Agrowon

सिद्धेवाडी आणि अंजनी तलाव कोरडे
टीम अॅग्रोवन
रविवार, 14 जुलै 2019

सांगली ः पावसाळा सुरू होऊन एक महिना संपला. तरीदेखील दुष्काळी पट्ट्यातील तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस बरसला नाही. ऐन पावसाळ्यात तासगाव पूर्व भागात पाणीटंचाई उभी आहे. या भागात असलेले सिद्धेवाडी आणि अंजनी तलाव कोरडे आहेत. त्यातही म्हैसाळ आणि विसापूर-पुनदी योजना बंद झाल्याने पाण्याची समस्या अधिकच तीव्र होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

सांगली ः पावसाळा सुरू होऊन एक महिना संपला. तरीदेखील दुष्काळी पट्ट्यातील तासगाव तालुक्याच्या पूर्व भागात पाऊस बरसला नाही. ऐन पावसाळ्यात तासगाव पूर्व भागात पाणीटंचाई उभी आहे. या भागात असलेले सिद्धेवाडी आणि अंजनी तलाव कोरडे आहेत. त्यातही म्हैसाळ आणि विसापूर-पुनदी योजना बंद झाल्याने पाण्याची समस्या अधिकच तीव्र होणार असल्याने शेतकरी चिंतातूर झाले आहेत.

तासगाव तालुक्याचा पूर्व भाग तसा दुष्काळी आहे. या भागात उन्हाळी पाऊस झाला नाही, तर जून महिना संपला, जुलै महिन्या निम्मा झाला तरीदेखील या भागात पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी शेतकरी अडचणीत सापडला आहे. या भागात सिद्धेवाडी आणि अंजनी हे दोन तलाव मोठे आहेत. याच तलावातील पाण्यावर शेती आणि पिण्याच्या पाण्याची सोय आहे. या दोन्ही तलावावरील सुमारे १५ ते २० गावांच्या पाण्याची प्रश्न गंभीर झाला आहे. तर परंतु पाऊस नसल्याने हे दोन्ही तलाव कोरडे पडले आहेत.

म्हैसाळ उपसा सिंचन योजना सुरू होती. याच योजनेवर तासगाव तालुक्यातील विसापूर-पुनदी ही योजना सुरू राहते. परतु ही योजना सुरू करण्यासाठी पाटबंधारे विभागाने पुढाकार घेतला नाही. त्यातच योजना सुरू असताना दुष्काळी भागातील तलाव भरून द्यावे, असे आदेश जिल्हाधिकारी यांनी दिले होते. परंतु पाटबंधारे विभागाने या भागातील तलावात पाणी सोडले नाही. अर्थात हे दोन्ही तलाव भरून दिले असते तर पाणीटंचाई कमी झाली असती. मात्र, जिल्हाधिकारी यांनी दिलेल्या आदेशाकडे पाटबंधारे विभागाने जाणीवपूर्वक दुर्लक्ष केले असल्याचे शेतकरी सांगत होते. दरम्यान, टेंभू उपसा सिंचन योजनचे पाणी खानापूर तालुक्यातून तासगावच्या पूर्व भागात पाणी देता येणे शक्य आहे. त्यासाठी अग्रणी नदी बारमाही करणे आवश्यक आहे. परंतु अग्रणी नदी बारमाही करण्यासाठीदेखील जिल्हा प्रशासनाने लक्ष दिले नाही. त्यामुळे पाणीटंचाईची दाहकता अधिक वाढली आहे. 

सिद्धेवाडी तलावावर सावळज, सिद्धेवाडी, दहिवडी, जरडी, वायफळे, मांजर्डे, गौरगाव, बस्तवडे, गावे अवलंबून आहेत. परंतु तलावात पाणी नसल्याने या गावांना आठ-आठ दिवस पाणीपुरवठा होत नाही. सर्व प्रादेशिक योजना ठप्प आहेत. प्रशासनाकडून पुरेसे टॅंकर सुरू केले, अशीच अवस्था अंजनी तलावावरील गावांची आहे.

इतर बातम्या
परभणी जिल्ह्यात रब्बी ज्वारीवर अमेरिकन...परभणी : जिल्ह्यातील पेडगाव (ता. परभणी) येथील दोन...
सोलापूर जिल्ह्यात रब्बीची उरकली ३१...सोलापूर : खरिपामध्ये पावसाने हुलकावणी दिली. पण,...
सातारा जिल्ह्यात आले पिकावर ‘करपा’चा...सातारा  ः अतिपावसाचा फटका इतर पिकांप्रमाणे...
पावसामुळे स्ट्रॉबेरीचा हंगाम लांबणीवरपुणे : मॉन्सूनचा लांबलेला मुक्काम आणि...
केंद्राच्या निधीविना रखडली आंतरजातीय...पुणे  : समाजामध्ये समतेची भावना रुजावी,...
नगर जिल्हा परिषदेला रस्ते  दुरुस्तीसाठी...नगर  ः नुकत्याच झालेल्या पावसाने जिल्ह्यातील...
मेटगुताड परिसरात रानगव्यांकडून...भिलार, जि. सातारा  : लांबलेल्या पावसाने...
हमाली दरवाढीवरून कोल्हापुरात गूळ सौदे...कोल्हापूर : खरेदीदार व माथाडी कामगारांच्या हमाली...
सांगली जिल्ह्यात ऊसदर आंदोलनाची पहिली...सांगली  : जिल्ह्यात ऊसदरासाठी आंदोलनाची...
सात-बारा कोरा करणार असाल तरच पाठिंबा :...पुणे ः राज्यात सत्ता स्थापनेसाठी सुरू...
पीकविमा कंपन्या या सरकारपुरस्कृत माफिया...पुणे ः पीकविमा कंपन्या या सरकारपुरस्कृत...
कुजलेल्या तुराट्यांच्या झाडण्याही होणार...परभणी ः यंदा तुरीचं पीक लई जोरात आलं होतं. चांगली...
सांगली जिल्ह्यातील अंडी उत्पादकांना...सांगली ः एप्रिल ते ऑक्टोबर या सात महिन्यांत...
इथेनॉल उत्पादन घटणारपुणे:  देशाच्या इथेनॉलनिर्मितीत मोठी घट...
अकोला जिल्ह्यात कपाशीवर बोंड अळीअकोला ः परतीच्या पावसाने कापूस पिकाचे मोठ्या...
पुण्यामध्ये जागतिक देशी गोवंश परिषदपुणे ः विविध राज्यांतील पशुपालक देशी गोवंश...
पीकविम्यासाठी शासकीय पातळीवर धावपळपुणे: अतिपावसामुळे नुकसान झाल्यानंतर शेतकऱ्यांना...
देशात मागणीच्या तुलनेत ४० टक्केच कांदा...पुणे: देशभरात ऑगस्ट महिन्यातील खरीप कांद्याच्या...
किमान तापमानात घटपुणे: राज्यात होत असलेले ढगाळ हवामान निवळल्यानंतर...
राज्यातील सव्वानऊ हजार गावांत पाणीपातळी...पुणे ः चालू वर्षी राज्यातील अनेक भागांत जोरदार...