नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची लागवड पूर्ण होण्याची चिन्हे

नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची लागवड पूर्ण होण्याची चिन्हे
नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची लागवड पूर्ण होण्याची चिन्हे

नाशिक  : महाराष्ट्रात होणारी खरीप कांद्याची लागवड जुलै व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच होते; परंतु नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरीस पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील लाल कांद्याच्या लागवडी लांबणीवर पडल्या. मात्र, पुन्हा पाऊस झाल्याने मध्यंतरीच्या कालावधीत लागवडी पुन्हा सुरू होऊन त्या मंदावल्या आहेत, त्यामुळे एकंदरीत नाशिक जिल्ह्यातील असलेली प्रस्तावित कांदा लागवड पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. लागवड जरी वाढली तरी त्यामुळे कांद्याची काढणी लांबणीवर जाणार आहे.  चालू हंगामातील लाल कांद्याच्या लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र २०,५८४ हेक्टर होते, त्यापैकी १९,३४१ हेक्टरवर लागवडी पूर्ण झाल्या आहेत. येवला तालुक्यातील लागवडीखालील क्षेत्र कमालीचे घटले आहे. त्याखालोखाल देवळा व चांदवड तालुका आहे, तर दुसरीकडे मालेगाव तालुक्यात चित्र समाधानकारक आहे. सटाणा, नांदगाव व मालेगावमध्ये लागवड वाढली आहे; तर सुरगाणा, इगतपुरी, पेठमध्ये लागवड निरंक आहे. नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या लागवडीसाठी सुमारे ३५४० हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्यात आली होती. पाऊस उशिरा झाल्यामुळे कांद्याच्या रोपवाटिका उशिरा तयार झाल्या असून, जुलैअखेरीस पुन्हा पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रोपे वाया गेली. लाल कांदा लागवड हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना कांदा लागवडीला म्हणावा तसा वेग मिळालेला नाही. त्याचा प्रमुख फटका कळवण व देवळा तालुक्याला बसला आहे. त्यामुळे नशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उशिरा कांदा लागवड होण्याची शक्यता आहे.

काढणी जाणार लांबणीवर  लाल कांदा लागवड उशिरा झाल्याने कांदा उशिरा बाजारात दाखल होईल, त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारपेठेवर होणार आहे. बाजारपेठेत सध्या असलेला कांद्याचा वाढलेला दर त्याचेच कारण आहे. मात्र, पावसामुळे काही लागवडी खराब झाल्याने उत्पादनात परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काढणी लांबण्यासह उत्पादनावर परिणाम होणार हे नक्की आहे. त्यामुळे कांद्याला चांगले दर मिळण्याची अपेक्षा कांदा उत्पादकांनी व्यक्त केली आहे. 

कांदा लागवडीची स्थिती

तालुका  सर्वसाधारण क्षेत्र  लागवड झालेले क्षेत्र
मालेगाव  २४३० ३६९२
सटाणा  १२०० ३८५५
नांदगाव  ५४० ४३९८
कळवण  ३७५ ८८ 
देवळा  १५१५ ४८५
दिंडोरी  १९५ ००
सुरगाणा  १० ००
नाशिक  १३५ ००
त्रंबकेश्वर  ०० ००
इगतपुरी  ५६ ००
पेठ  ०० ००
नाशिक  ४५० ००
सिन्नर  ५१८   ४७२
येवला  ८३००   १७१२ 
चांदवड  ४८६०  ४४०७  

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com