Agriculture news in marathi; Signs of completion of cultivation of red onion in Nashik district | Agrowon

नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याची लागवड पूर्ण होण्याची चिन्हे

टीम अॅग्रोवन
सोमवार, 23 सप्टेंबर 2019

नाशिक  : महाराष्ट्रात होणारी खरीप कांद्याची लागवड जुलै व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच होते; परंतु नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरीस पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील लाल कांद्याच्या लागवडी लांबणीवर पडल्या. मात्र, पुन्हा पाऊस झाल्याने मध्यंतरीच्या कालावधीत लागवडी पुन्हा सुरू होऊन त्या मंदावल्या आहेत, त्यामुळे एकंदरीत नाशिक जिल्ह्यातील असलेली प्रस्तावित कांदा लागवड पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. लागवड जरी वाढली तरी त्यामुळे कांद्याची काढणी लांबणीवर जाणार आहे. 

नाशिक  : महाराष्ट्रात होणारी खरीप कांद्याची लागवड जुलै व आॅगस्टच्या पहिल्या आठवड्यातच होते; परंतु नाशिक जिल्ह्यात जुलैच्या अखेरीस पावसाने ओढ दिल्याने खरीप हंगामातील लाल कांद्याच्या लागवडी लांबणीवर पडल्या. मात्र, पुन्हा पाऊस झाल्याने मध्यंतरीच्या कालावधीत लागवडी पुन्हा सुरू होऊन त्या मंदावल्या आहेत, त्यामुळे एकंदरीत नाशिक जिल्ह्यातील असलेली प्रस्तावित कांदा लागवड पूर्ण होण्याची चिन्हे आहेत. लागवड जरी वाढली तरी त्यामुळे कांद्याची काढणी लांबणीवर जाणार आहे. 

चालू हंगामातील लाल कांद्याच्या लागवडीचे सर्वसाधारण क्षेत्र २०,५८४ हेक्टर होते, त्यापैकी १९,३४१ हेक्टरवर लागवडी पूर्ण झाल्या आहेत. येवला तालुक्यातील लागवडीखालील क्षेत्र कमालीचे घटले आहे. त्याखालोखाल देवळा व चांदवड तालुका आहे, तर दुसरीकडे मालेगाव तालुक्यात चित्र समाधानकारक आहे. सटाणा, नांदगाव व मालेगावमध्ये लागवड वाढली आहे; तर सुरगाणा, इगतपुरी, पेठमध्ये लागवड निरंक आहे. नाशिक जिल्ह्यात लाल कांद्याच्या लागवडीसाठी सुमारे ३५४० हेक्टर क्षेत्रावर रोपवाटिका तयार करण्यात आली होती.

पाऊस उशिरा झाल्यामुळे कांद्याच्या रोपवाटिका उशिरा तयार झाल्या असून, जुलैअखेरीस पुन्हा पावसाने पाठ फिरवली होती. मात्र, ऑगस्टच्या पहिल्या आठवड्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक रोपे वाया गेली. लाल कांदा लागवड हंगाम शेवटच्या टप्प्यात असताना कांदा लागवडीला म्हणावा तसा वेग मिळालेला नाही. त्याचा प्रमुख फटका कळवण व देवळा तालुक्याला बसला आहे. त्यामुळे नशिक जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात उशिरा कांदा लागवड होण्याची शक्यता आहे.

काढणी जाणार लांबणीवर 
लाल कांदा लागवड उशिरा झाल्याने कांदा उशिरा बाजारात दाखल होईल, त्याचा थेट परिणाम कांद्याच्या बाजारपेठेवर होणार आहे. बाजारपेठेत सध्या असलेला कांद्याचा वाढलेला दर त्याचेच कारण आहे. मात्र, पावसामुळे काही लागवडी खराब झाल्याने उत्पादनात परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे काढणी लांबण्यासह उत्पादनावर परिणाम होणार हे नक्की आहे. त्यामुळे कांद्याला चांगले दर मिळण्याची अपेक्षा कांदा उत्पादकांनी व्यक्त केली आहे. 

कांदा लागवडीची स्थिती

तालुका  सर्वसाधारण क्षेत्र  लागवड झालेले क्षेत्र
मालेगाव  २४३० ३६९२
सटाणा  १२०० ३८५५
नांदगाव  ५४० ४३९८
कळवण  ३७५ ८८ 
देवळा  १५१५ ४८५
दिंडोरी  १९५ ००
सुरगाणा  १० ००
नाशिक  १३५ ००
त्रंबकेश्वर  ०० ००
इगतपुरी  ५६ ००
पेठ  ०० ००
नाशिक  ४५० ००
सिन्नर  ५१८   ४७२
येवला  ८३००   १७१२ 
चांदवड  ४८६०  ४४०७
 

 


इतर ताज्या घडामोडी
रत्नागिरी, संगमेश्‍वरसाठी भात खरेदी सुरूरत्नागिरी  : रत्नागिरी व संगमेश्‍वर...
खानदेशात यात्रांअभावी अनेकांवर...सोनगीर, जि. धुळे  : खानदेशात पावसाळा वगळता...
नाशिक जिल्ह्यात रब्बीच्या पेरणीसाठी...गिरणारे, जि. नाशिक : खरीप हंगामातील भात, भुईमूग,...
खांबाळे, पडवणे येथील आंबा, काजूची ६००...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील खांबाळे (ता....
बोडखा येथे ‘स्वाभिमानी’चे झाडावर...बुलडाणा : केंद्र सरकारने पारित केलेले शेतकरी...
औरंगाबादमध्ये केंद्राच्या कृषी...औरंगाबाद : केंद्र सरकारने पारित केलेले तीन कृषी...
खानदेशात सव्वा लाख हेक्टरवर पेरणीजळगाव : खानदेशात मक्याची लागवड सुरूच आहे. रब्बी...
परभणी जिल्ह्यात कापूस विक्रीच्या...परभणी : ‘‘राज्य सहकारी कापूस उत्पादक पणन...
नाशिक विभागात रोज एक लाख टन उसाचे गाळपनगर  ः नाशिक विभागातील ३२ पैकी २५ साखऱ...
औरंगाबाद, नगर जिल्ह्यात कापसाची ३४ हजार...औरंगाबाद : राज्य कापूस उत्पादक पणन महासंघाच्या...
कृषी कायद्यांविरोधात साताऱ्यात धरणेसातारा : शेतकरी विरोधी कायदे मागे घेण्यासाठी...
जालना जिल्ह्यात दहा हजार क्‍विंटलवर...जालना : ‘‘जिल्ह्यात मक्याची किमान आधारभूत...
महिनाभर जमीन आरोग्य सुधार अभियानऔरंगाबाद : जमिनीच्या सुपीकतेवर भर देण्याची गरज...
गहू, ज्वारी पिकांवरील खोडमाशीचे...बहुतांश ठिकाणी गहू व ज्वारी पिकाची पेरणी झाली आहे...
पिकाच्या संवेदनशील अवस्थेनुसार पाणी...रब्बी हंगामामध्ये घेतल्या जाणाऱ्या पिकांसाठी...
राज्यात लसूण ५००० ते १३००० रुपयेनाशिकमध्ये ६२०० ते ११५०० रुपये  नाशिक :...
उत्तम भाजीपाला उत्पादनासाठी पोषक हवामानवाटाणा वाटाणा हे थंड हवामानातील पीक असून या...
बहिरम यात्रा अखेर रद्दअमरावती : लाखो भाविकांचे कुलदैवत आणि विदर्भात...
महाद्वार काल्याने कार्तिकी यात्रेची...सोलापूर : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पंढरपुरात...
विधान परिषदेच्या सहा जागांचा आज निकालमुंबई : महाराष्ट्र विधान परिषदेच्या तीन पदवीधर,...