Agriculture news in marathi; Signs of the cotton growers' mistake | Page 2 ||| Agrowon

कापूस उत्पादकांचा दसऱ्याचा मुहूर्त चुकण्याची चिन्हे
टीम अॅग्रोवन
शनिवार, 21 सप्टेंबर 2019

अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून वऱ्हाडातील कापूस पट्ट्यात सातत्याने पाऊस होत असल्याचा फटका प्री-मॉन्सून कपाशीला जोरदार बसला आहे. कपीशीची पातेगळ मोठ्या प्रमाणात झाली असून आता परिपक्व बोंड्यांवर किडीचा प्रादुर्भाव तसेच बुरशीची वाढ झाल्याने दरवर्षी दसऱ्याला साधला जाणारा पहिल्या वेचणीचा मुहूर्त यंदा लांबण्याची चिन्हे आहेत.
   

अकोला  ः ऑगस्टच्या शेवटच्या आठवड्यापासून वऱ्हाडातील कापूस पट्ट्यात सातत्याने पाऊस होत असल्याचा फटका प्री-मॉन्सून कपाशीला जोरदार बसला आहे. कपीशीची पातेगळ मोठ्या प्रमाणात झाली असून आता परिपक्व बोंड्यांवर किडीचा प्रादुर्भाव तसेच बुरशीची वाढ झाल्याने दरवर्षी दसऱ्याला साधला जाणारा पहिल्या वेचणीचा मुहूर्त यंदा लांबण्याची चिन्हे आहेत.
   
मागील दोन हंगामापासून कापसाला चांगला दर मिळत असल्याने यंदा या पिकाचे सरासरी लागवड क्षेत्र वाढले आहे. अकोला, बुलडाणा या दोन्ही जिल्ह्यांत कापसाचे क्षेत्र मोठे आहे. प्रामुख्याने जूनच्या पहिल्या आठवड्यात पेरणी केलेल्यांना दसऱ्याला दरवर्षी पहिली वेचणी करण्याची संधी उपलब्ध होत असते. 

यावर्षी तशी परिस्थिती नाही. मागील २० ते २५ दिवसांपासून सतत पाऊस, तसेच पावसाळी वातावरण राहत असल्याने कपाशीचे अतोनात नुकसान झाले आहे. लागलेल्या पात्यांची दोन ते तीन वेळा गळ झाली. ज्या बोंड्या पक्व झाल्या त्यावरही अळी तसेच बुरशी आहे. सलग पावसामुळे जमिनीतील ओलाव्याने काही ठिकाणी मुळकूजसुद्धा दिसून येत आहे.
या सर्वच बाबी कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी मारक ठरलेल्या आहे. प्रामुख्याने अकोट, तेल्हारा, जळगाव जामोद, संग्रामपूर, नांदुरा, मलकापूर या कापूस पट्ट्यात पावसाचा यंदा अधिक जोर आहे. गेल्या काही दिवसांत सतत पाऊस होत आहे. या पावसामुळे शेतांमध्ये सलग ओल बनलेली आहे. स्वच्छ सूर्यप्रकाशाअभावी पिके पिवळे पडण्याचेही प्रकार दिसून येत आहेत. 

या कापूस पट्ट्यात दरवर्षी दसऱ्यापासून वेचणीला सुरवात होते. दिवाळीपर्यंत असंख्य शेतकऱ्यांकडे चांगला कापूस आलेला राहतो. सप्टेंबर-ऑक्टोबर महिन्यांत सुरवातीच्या काळात लागवड झालेल्या कापसाचे क्षेत्र परिपक्व बोंड्यांनी लदबदलेले असते. यावर्षी हा मुहूर्त टळण्याचीच दाट शक्यता आहे. वातावरण खुलल्यानंतर पुन्हा कपाशीला पाते लागण्याची प्रक्रिया कधी सुरू होते यावर पुढील उत्पादन अवलंबून आहे.        
 

या भागात काही शेतकऱ्यांच्या शेतात सततच्या पावसामुळे कापूस उत्पादन घटीची शक्यता दिसते. माझे वैयक्तिक पीक चांगले आहे. मात्र, आता पाऊस उघडण्याची नितांत गरज आहे. असे न झाल्यास हाताशी आलेले पीक जाण्याची चिन्हे आहे.
- श्रीकृष्ण शेलकर, कापूस उत्पादक, मोताळा जि. बुलडाणा

आमच्याकडे कपाशीची वाढ मोठी झाली आहे; परंतु झाडांवर पात्या, बोंडांची संख्या नगण्य आहे. पुन्हा नव्याने माल लागल्यानंतरच पीक उत्पादनाची शक्यता वर्तविता येईल.
- श्रीकृष्ण ढगे, कापूस उत्पादक, वरवट बकाल, जि. बुलडाणा

आमची कपाशी सहा ते सात फुटांपर्यंत वाढली. या झाडांच्या तुलनेत फळधारणा नगण्य आहे. कपाशीची पातेगळ मोठ्या प्रमाणात झाली. आता पाऊस उघडण्याची गरज आहे.  
- विशाल भालतिलक, कापूस उत्पादक, बोर्डी, जि. अकोला

 

इतर ताज्या घडामोडी
नांदुरा तालुक्यात दुधाळ जनावरांमध्ये घटनांदुरा, जि. बुलडाणा  : जिल्ह्यात दुधासाठी...
चिखली तालुक्यात पावसाची जोरदार हजेरीअकोला  ः या मोसमातील मॉन्सून परतला असला, तरी...
आर्द्रतेआड सोयाबीनची कमी दराने खरेदीधामणगावरेल्वे, अमरावती  ः हंगामातील नव्या...
कीड ओळखूनच व्यवस्थापन पद्धती वापरा : डॉ...जालना : ‘‘रासायनिक कीटकनाशकांच्या जास्त...
मागण्यांच्या पूर्ततेसाठी एचएएल...नाशिक  : नाशिककरांनी यशवंतराव चव्हाणांना...
अंतिम टप्प्यातील प्रचारामुळे सांगलीत...सांगली : जिल्ह्यात विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या...
कोल्हापूर, सिंधुदुर्गातील काही भागांत...कोल्हापूर, सिंधुदुर्ग : गेल्या पंधरा दिवसांच्या...
बोराळे येथे शॉर्टसर्किटमुळे ऊस जळून खाकनाशिक : नांदगाव तालुक्यातील बोराळे येथील शेतकरी...
परभणी जिल्ह्यात हरभऱ्याची २ हजार ९००...परभणी : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अभियान (कडधान्य)...
नांदेडमध्ये खरीप पिकांना पावसाचा फटका नांदेड : नांदेड जिल्ह्यातील चार तालुक्यांतील १०...
शेती, शेतकरीप्रश्न हाताळण्यात कुचराईच...शेती व शेतकऱ्यांच्या प्रश्नांना ज्या...
बियाणे उद्योगाच्या विकासासाठी स्थितीत...बियाणे उद्योगात आपले राज्य पूर्वीपासून अग्रेसर...
हमीभावाने कडधान्य विक्रीसाठी ऑनलाइन...जळगाव ः उडीद, मुगाची शासकीय खरेदी केंद्रांत...
ढगाळ हवामानामुळे साताऱ्यातील...सातारा  ः अतिवृष्टी तसेच परतीच्या पावसाचे...
जिल्हा बॅंकांची आर्थिक कोंडी चिंताजनकभूविकास बॅंका मृत्युशय्येवर गेल्यापासून...
प्रशासकीय यंत्रणा निवडणुकीसाठी सज्जमुंबई ः विधानसभेच्या निवडणुकीसाठी सोमवारी (ता. २१...
नगर जिल्ह्यात हमीभावाने शेतीमाल...नगर  ः मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने खरेदी...
शेतकऱ्यांना वाचविण्यासाठी सरसकट...अंबाजोगाई, जि. बीड  : भाजपची मनोवृत्ती...
रोजगारनिर्मितीत सरकार अपयशी :...कोल्हापूर  : गेल्या पाच वर्षांत देशातील दोन...