नागपूर : सोयाबीन दरांत सुधारण्याचे संकेत; आवक मंदावली

Signs of improvement in soybean prices in Nagpur market; Incoming slowdown
Signs of improvement in soybean prices in Nagpur market; Incoming slowdown

नागपूर ः बाजारात सुरुवातीला वाढलेली सोयाबीनची आवक येत्या काळात दरात वाढीच्या अपेक्षेने काहीशी मंदावल्याची स्थिती आहे. गेल्या आठवड्यात सोयाबीन आवक अडीच हजार क्‍विंटलवर होती. आता ही आवक ११०० क्‍विंटलपर्यंत खाली आली आहे. सोयाबीनचे व्यवहार ३७०० ते ४२३६ रुपये क्‍विंटलने होत असल्याची माहिती व्यापारी सूत्रांनी दिली. 

बाजारात नवे सोयाबीन दाखल होण्यास सुरुवात झाली. ओलावा अधिक असल्याने सुरुवातीला सोयाबीनची अवघ्या २८०० ते ३१०० रुपये क्‍विंटलने खरेदी झाली. त्यानंतर मात्र आवक आणि मागणीतील तफावत वाढल्याने दरात सुधारणा झाली. सद्यःस्थितीत ३७०० ते ४२०० रुपयांचा सरासरी दर सोयाबीनला मिळत आहे. यापुढील काळात हे दर आणखी वाढण्याची शक्‍यता आहे. त्यामुळेच शेतकऱ्यांकडून वेट अँड वॉचची भूमिका घेण्यात आली आहे. सोयाबीनचे दर पाच हजार रुपयांपर्यंत जातील, अशी शक्‍यता व्यापारी सूत्र वर्तवितात.  ताज्या बाजार भावासाठी येथे क्लिक करा..

कळमणा बाजार समितीत सध्या सोयाबीनची आवक ११०० क्‍विंटलचीच आहे. बाजारात गहू आवक २०५ क्‍विंटलची, तर दर २००० ते २१२६ रुपये होते. हरभरा आवक गेल्या आठवड्यात १३८ क्‍विंटल आणि दर ३५०० ते ४००० रुपयांचे होते. या आठवड्यात दर ३४७१ ते ३९५० रुपये क्‍विंटल आणि आवक अवघी ७२ क्‍विंटलची झाली. तुरीचे व्यवहार ४८०० ते ५२६४ रुपये दराने होत असून, आवक जेमतेम ३१ क्‍विंटलची आहे. भुईमूग शेंगांची आवक ३० क्‍विंटल आणि दर ४००० ते ५००० रुपयांचे होते. बाजारात संत्रा आवकदेखील नियमित आहे.  ८०० ते ३००० रुपये क्‍विंटलने संत्र्याचे व्यवहार होत आहेत.

मोसंबीचे दर १५०० ते १९०० रुपये क्‍विंटल आणि आवक ३०० क्‍विंटल इतकी होती. केळीची आवक ५२५ क्‍विंटल, तर दर ४५० ते ५५० रुपयांचे होते. केळीचे दर गेल्या महिनाभरापासून स्थिर असल्याचे सांगण्यात आले. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com