Agriculture news in Marathi, Signs of increasing onion cultivation | Agrowon

खानदेशात कांदा लागवडी वाढण्याचे संकेत

टीम अॅग्रोवन
सोमवार, 18 नोव्हेंबर 2019

जळगाव ः रब्बी हंगामातील कांद्याची खानदेशात यंदा किमान एक ते दीड हजार हेक्‍टरने लागवड वाढू शकते, असा अंदाज आहे. कांदा लागवडीसाठी शेतकरी रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करण्याची कार्यवाही करीत आहेत. 

कांदा लागवडीसाठी धुळ्यातील धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, पाचोरा, जळगाव, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार हा भाग आघाडीवर असतो. मागील हंगामात पाणीटंचाईमुळे धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, साक्री, नंदुरबार, जळगावमधील जळगाव, पाचोरा, जामनेर भागात हवी तेवढी कांदा लागवड रब्बी हंगामादरम्यान झाली नव्हती. यंदा सर्वत्र पाऊसमान चांगले राहिले. 

जळगाव ः रब्बी हंगामातील कांद्याची खानदेशात यंदा किमान एक ते दीड हजार हेक्‍टरने लागवड वाढू शकते, असा अंदाज आहे. कांदा लागवडीसाठी शेतकरी रोपवाटिकांमध्ये रोपे तयार करण्याची कार्यवाही करीत आहेत. 

कांदा लागवडीसाठी धुळ्यातील धुळे, साक्री, शिरपूर, शिंदखेडा, जळगावमधील चोपडा, यावल, रावेर, पाचोरा, जळगाव, नंदुरबारमधील शहादा, नंदुरबार हा भाग आघाडीवर असतो. मागील हंगामात पाणीटंचाईमुळे धुळ्यातील शिंदखेडा, धुळे, साक्री, नंदुरबार, जळगावमधील जळगाव, पाचोरा, जामनेर भागात हवी तेवढी कांदा लागवड रब्बी हंगामादरम्यान झाली नव्हती. यंदा सर्वत्र पाऊसमान चांगले राहिले. 

जळगाव जिल्ह्यात १४० टक्के तर धुळे नंदुरबारात पाऊसमान अनुक्रमे १८० व २०० टक्के, असे आहे. नदी, नाल्यांमध्ये पाणी खळखळून वाहत आहे. विहिरींची जलपातळी टिकून राहील. पाणीटंचाई फारशी भासणार नाही, अशी स्थिती तूर्ततरी आहे. कांद्याला सिंचनासाठी पाण्याची शाश्‍वती हवी असते. ही शाश्‍वती यंदा दिसत आहे. 

दुसरीकडे कांद्याचे दर प्रतिक्विंटल किमान तीन हजार रुपयांपर्यंत सध्या आहेत. दर टिकून राहतील, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. यामुळे कांदा लागवडीचे नियोजन अनेक शेतकरी करीत आहेत. ज्यांच्याकडे सिंचनासाठी पाणी आहे, अशा शेतकऱ्यांनी सोयाबीन, कडधान्य, ज्वारी, कापूस आदी पिकांखालील क्षेत्रात कांदा लागवडीचे नियोजन केले आहे. रोपवाटिका तयार केल्या जात आहेत. 

काही शेतकरी रोपांच्या विक्रीसाठी रोपवाटिका तयार करीत आहेत. रोपांना प्रतिवाफे दीड ते दोन हजार रुपये दर मिळू शकतो. एका वाफ्यातील रोपांमध्ये एक ते दीड एकरात लागवड करणे शक्‍य होईल.


इतर ताज्या घडामोडी
मक्यापासून निर्मित जैवप्लॅस्टिकचा...मक्यातील स्टार्च आणि अन्य नैसर्गिक घटकांचा वापर...
जुन्या बागेमध्ये घडाच्या विकासाकडे लक्ष...द्राक्ष बागेमध्ये सध्या वातावरण चांगले असले, तरी...
औरंगाबाद विभागात उसाचे तीन लाख मेट्रिक...औरंगाबाद : या गाळप हंगामात ९ डिसेंबर अखेरपर्यंत...
औरंगाबाद जिल्ह्यात गव्हावर आढळला...औरंगाबाद : जिल्ह्यातील गव्हाच्या पिकावर खोडमाशीचा...
नावातील त्रुटी दुरुस्तीसाठी...वाशीम : पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजनेअंतर्गत...
रत्नागिरी जिल्ह्यात खरिपाच्या विमा...रत्नागिरी : शेतकऱ्यांना नुकसानभरपाई मिळावी,...
शिरोळ, हातकणंगले तालुक्यांत ऊस...कोल्हापूर : ऊस वाहतूकदारांना नऊ टक्के वाढ...
‘नासाका’ सुरू करण्यासाठी शरद पवारांना...नाशिक : ‘नासाका’ पुन्हा सुरू व्हावा यासाठी दिल्ली...
कृषिपंपांना कॅपॅसिटर बसवा, ऑटो स्विचचा...नाशिक : वीजपुरवठा सुरू झाल्यानंतर कृषिपंप तत्काळ...
नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत दोन...नांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांत...
पीकविम्याच्या भरपाईसाठी प्रस्ताव पाठवा...सोलापूर : उत्तर सोलापूर, नरखेड, मार्डी, शेळगी,...
पुणे विभागातील १७०० गावांमधील भूजल...पुणे  ः यंदा मुबलक प्रमाणात पाऊस झाला असला,...
नगर जिल्ह्यातील कारखान्यांकडून पावणेसात...नगर  ः जिल्ह्यात १४ सहकारी व नऊ खासगी असे...
नवीन लाल कांद्याच्या दरात चढ-उतारनाशिक: अतिवृष्टीमुळे अनेक खरीप कांदा लागवडी बाधित...
कांदा दरवाढीनंतर कोबीला आले ‘अच्छे दिन’कोल्हापूर : कांद्याचे दर वाढल्याने हॉटेल...
भंडारा : शेतकऱ्यांना आज होणार विमा...मुंबई : भंडारा जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खरीप २०१९...
...म्हणून सहा एकरांवरील द्राक्षबागेवर...नाशिक  : निफाड तालुक्यातील सोनेवाडी येथे...
राज्याला केंद्राकडून १५ हजार कोटी येणे...मुंबई  :  वस्तू व सेवा कर (जीएसटी)...
शिवनेरीवरून कर्जमाफीची घोषणा होण्याची...पुणे  ः मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आज (गुरुवारी...
पंकजा मुंडे यांच्या स्वाभिमान...बीड  : लोकनेते गोपीनाथ मुंडे यांच्या...