agriculture news in marathi, Silam Park will be going on in Solapur | Agrowon

सोलापुरात हिरजला होणार रेशीम पार्क
टीम अॅग्रोवन
रविवार, 5 ऑगस्ट 2018

सोलापूर : हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे रेशीम पार्क उभारणीसाठी ६ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. यामुळे सोलापुरात रेशीम पार्कअंतर्गत कोष बाजारपेठ उभारण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सोलापूर : हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे रेशीम पार्क उभारणीसाठी ६ कोटी ४५ लाख रुपयांचा निधी मंजूर झाला असून, पुढील महिन्यात प्रत्यक्ष कामाला सुरवात होणार आहे. यामुळे सोलापुरात रेशीम पार्कअंतर्गत कोष बाजारपेठ उभारण्याच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.

सहकार व पणनमंत्री सुभाष देशमुख हे गेल्या काही वर्षांपासून यासाठी प्रयत्नशील होते. पश्‍चिम महाराष्ट्रातील उसाप्रमाणे मराठवाड्यात तुतीच्या शेतीला अनन्यसाधारण महत्त्व आहे. यामुळे जालना व बीड जिल्ह्यांनंतर संपूर्ण मराठवाडा या शेतीकडे वळला आहे. सध्या पश्‍चिम महाराष्ट्रातील शेतकरीही या शेतीकडे वळत असून, त्यांच्या शेतात इतर पिकांची जागा तुतीच्या शेतीने घेतली आहे. याचे क्षेत्र सांगली, पुणे व सोलापूर जिल्ह्यांतही वाढत आहे. याशिवाय मोठ्या प्रमाणावर कर्नाटकात ही शेती करण्यात येते. मराठवाडा, सांगली, पुणे, सोलापूर आणि कर्नाटकासाठी मध्यवर्ती बाजारपेठ सोलापुरात व्हावी, यासाठी हिरज (ता. उत्तर सोलापूर) येथे रेशीम पार्क उभारणीसाठी १० एकर जमीन घेण्यात आली आहे.

पार्कच्या उभारणीसाठी देशमुख यांनी नागपूर रेशीम संचनालयामार्फत शासनाकडे प्रस्ताव पाठविला होता. त्यातून रेशीम पार्कसाठी इमारत व अन्य सुविधासाठी सहा कोटी ४५ लाख रुपये मंजूर झाले आहेत. मराठवाड्यातही रेशीम पार्क उभारणीसाठी गत वर्षी सहा कोटी १९ लाख रुपये मंजूर झाले आहेत.

निधीतून होणारी कामे
जमीन सपाटीकरण, संरक्षण भिंत, वीज, पाणी, शेतकऱ्यांसाठी प्रशिक्षण केंद्र, संशोधन, खरेदी, प्रक्रिया केंद्र, कार्यालयासाठी इमारत व अन्य सुविधा या निधीतून उभारण्यात येणार आहेत. कमी पाण्यावर अधिक उत्पन्न मिळवून देणारे हे पीक असल्याने दुष्काळामुळे शेतकरी या पिकाकडे वळत आहेत. वर्षभर उत्पादन घेण्यात येणार असल्याने व हिरज येथे संशोधन, खरेदी केंद्र होणार असल्याने याची माहिती व मार्गदर्शनही उत्पादकांना मिळणार आहे.

इतर अॅग्रो विशेष
शेतकऱ्यांच्याच कपाळावर पुन्हा ‘मिऱ्या’दिनांक ३ जुलै २०१९ रोजी केरळचे खासदार डीन...
आश्वासनांचा पाऊसराज्यात विधानसभा निवडणुकीचा प्रचार आता अंतिम...
आबासाहेब झाले ग्लॅडिओलस पिकातील मास्टरअभ्यासू, तंत्रशुद्ध व प्रयोगशील शेतीचे उत्तम...
दूध पावडर निर्यात अनुदान नाकारल्याने...पुणे : निर्यात केलेल्या दूध पावडरला प्रोत्साहन...
उर्वरित विमा रक्‍कम द्या देण्याचे...जामखेड, जि. जालना  : विमासंरक्षित रकमेनुसार...
सरपंच, उपसरपंचांचे  मानधन आता ऑनलाइन पुणे : राज्यातील सर्व सरपंच, उपसरपंचांचे मानधन...
राजापुरात भातावर लष्करी अळीरत्नागिरी : राजापूर तालुक्यात परिपक्व झालेल्या...
मॉन्सून आज घेणार महाराष्ट्राचा निरोपपुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी आचारसंहितेची...सोलापूर : सांगली, सातारा, कोल्हापूर, सोलापूरसह २५...
‘ऑक्टोबर हीट’ने महाराष्ट्र तापला पुणे : पावसाच्या उघडिपीनंतर राज्यात ‘ऑक्टोबर हीट’...
फळबागा, मिश्रपिके, सिंचनासह शेती केली...मौजे रेवगाव (ता. जि. जालना) येथील अनिल व विनोद या...
गैरकृत्यांवर नियंत्रण गरजेचेचनिवडणुकीच्या रणधुमाळीत काही विषय मागे पडतात. कारण...
प्रयोगशील, प्रगतिशील शेतीत रमलेले जाधव...नाशिक जिल्ह्यातील कसबे सुकेणे (ता. निफाड) येथे...
आर्थिक प्रगती युवकाने निवडला फूलशेतीचा...बी.कॉम, एमबीए पदवी घेतल्यानंतर नोकरीच्या पाठी न...
शेतकऱ्यांना न्याय मिळण्याची आशा धूसर :...‘लोकांच्या डोळ्यांवर धर्मांधतेची झापड चढविण्यात...
कर्जफेडीची क्षमता देणाऱ्या धोरणांची गरजविधानसभा निवडणुकीच्या प्रचारामध्ये राजकीय...
महामंडळाने ‘उद्योग’ बंद केले तरच विकासराज्यातील कृषी उद्योगाला चालना देण्यासाठी ‘...
नाशिक जिल्ह्यात ओला दुष्काळ जाहीर...नाशिक : जिल्ह्यासह बागलाण तालुक्यात अतिवृष्टीमुळे...
दूध पावडर अनुदानाचा प्रस्ताव फेटाळलापुणे : राज्यातील दूध पावडर (भुकटी) प्रकल्पांना...
विदर्भातून मॉन्सून परतला  पुणे : नैर्ऋत्य मोसमी वाऱ्यांनी (मॉन्सून)...