Agriculture news in marathi The silence in the market committees because of the closure | Agrowon

नाशिक : माथाडींच्या संपामुळे बाजार समित्यांमध्ये शुकशुकाट

टीम अॅग्रोवन
गुरुवार, 27 फेब्रुवारी 2020

नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व शासन व संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील एकूण १७ बाजार समित्यांसह उपबाजार आवार, शासकीय गोदाम, मालधका व विविध आस्थापनांमधील हजारो माथाडी कामगारांनी बुधवारी (ता.२६) लाक्षणिक एकदिवसीय संप पुकारला होता. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कामगार नसल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा व धान्य बाजार नाइलाजाने बंद ठेवण्यात आले होते. 

नाशिक  : राज्यातील माथाडी कामगारांच्या प्रलंबित असलेल्या प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी व शासन व संबंधितांचे लक्ष वेधण्यासाठी नाशिक जिल्ह्यातील एकूण १७ बाजार समित्यांसह उपबाजार आवार, शासकीय गोदाम, मालधका व विविध आस्थापनांमधील हजारो माथाडी कामगारांनी बुधवारी (ता.२६) लाक्षणिक एकदिवसीय संप पुकारला होता. त्यामुळे जिल्ह्यातील बाजार समित्यांमध्ये कामगार नसल्याने शुकशुकाट पाहायला मिळाला. त्यामुळे जिल्ह्यातील प्रमुख बाजार समित्यांमध्ये कांदा व धान्य बाजार नाइलाजाने बंद ठेवण्यात आले होते. 

माथाडी कामगारांचे अनेक प्रश्न महाराष्ट्र शासनाच्या कामगार, पणन, सहकार, गृह व नगरविकास यांसह अन्य खात्यांकडे प्रलंबित आहेत. अशा प्रश्नांची सोडवणूक करण्यासाठी सरकार व संबंधितांकडे अनेकदा पाठपुरावा केला, निवेदने सादर केली; मात्र प्रलंबित प्रश्नांकडे कुणीही लक्ष दिलेले नाही. माथाडी कामगारांच्या न्याय्य प्रश्नांची तातडीने सोडवणूक करावी; अन्यथा पुढील तीव्र आंदोलनात्मक भूमिका घ्यावी लागेल, असा इशाराही देण्यात आला; तसेच इतर प्रलंबित मागण्यांची सोडवणूक शासनाकडून तात्काळ व्हावी, असे संघटनेचे नाशिक जिल्हा चिटणीस सुनील यादव यांनी सांगितले. 

या आहेत प्रमुख मागण्या

  • माथाडी सल्लागार समितीची पुनर्रचना करणे व त्या समितीवर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात अनुभवी कामगार नेत्यांची सदस्य म्हणून नेमणूक करणे.
  • माथाडी मंडळाची पुनर्रचना करणे व पुनर्रचित माथाडी मंडळावर युनियनच्या सभासद संख्येच्या प्रमाणात मंडळ सदस्यांच्या नेमणुका करणे.
  • विविध माथाडी मंडळांतील कार्यालयीन सेवेत माथाडी कामगारांच्या मुलांना प्राधान्य देण्याबाबत कामगार विभागाने दिलेल्या परिपत्रकानुसार कामगार आयुक्त व माथाडी मंडळाकडून कार्यवाही होणे.
  • माथाडी मंडळात पूर्णवेळ चेअरमन व सेक्रेटरी यांच्या नेमणुका करणे.
  • नाशिक जिल्ह्यातील बाजार समितीमधील माथाडी कामगारांच्या लेव्हीचा प्रश्नाची सोडवणूक करणे.
  • विविध रेल्वे यार्डात माथाडी कामगारांसाठी सुविधा उपलब्ध करून देणे

     


इतर बातम्या
नगरला भाजी खरेदीसाठी पुन्हा लोकांची...नगर ः भाजी खरेदीसाठी लोक गर्दी करीत असल्यामुळे...
घनसावंगी तालुक्यात गारपीटीचा पुन्हा...घनसावंगी, जि.जालना : कोरोना संसर्गामुळे बंदने...
अकोला : शेतमालाची नोंदणी कृषी विभागाकडे...अकोला  ः ‘कोरोना’मुळे सर्वत्र संचारबंदी लागू...
पंढरपूर भागात ऐन बहरातील शेवग्याला कोयताकरकंब, जि. सोलापूर ः ‘कोरोना’मुळे सर्वच...
वाहतूक बंद असल्याने संत्रा उत्पादकांचे ...अमरावती  ः कोरोना विषाणू प्रादुर्भावाच्या...
हिंगोलीत वाहन परवान्यासाठी स्वतंत्र कक्षहिंगोली ः राज्यात कोरोना विषाणूचा प्रसार होऊ नये...
नगर : काही ठिकाणी 'खासगी'कडून दूध...नगर  ः कोरोना विषाणू संसर्गाच्या...
सोलापुरात `फोन करा अन किराणा माल,...सोलापूर : कोरोना विषाणूचा संसर्ग होऊ नये, यासाठी...
अकोल्यात भाजीपाला विक्रीसाठी...अकोला ः गेल्या काही दिवसांपासून ‘कोरोना’...
विदर्भ, मराठवाड्यातील शेतकऱ्यांना...मुंबई : राष्ट्रीय अन्नसुरक्षा अधिनियम २०१३...
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या १५९ वरमुंबई: महाराष्ट्रातील कोरोना बाधितांची...
परभणी शासकीय दुग्धशाळेत दूध संकलनात वाढपरभणी ः ‘कोरोना’ विषाणू संसर्गाच्या पार्श्वभूमीवर...
जळगावातून उत्तर भारताकरिता केळीची...जळगाव  ः जिल्ह्यातून केळीची उत्तर भारतासह...
कऱ्हाडमध्ये मिळतोय घरपोच भाजीपाला  कऱ्हाड, जि.सातारा  :  कऱ्हाड शहरातील...
जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा सुरळीत ठेवा...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूंच्या प्रार्दुभावाला...
सोलापूरात ‘कोरोना’बाबत माहितीसाठी...सोलापूर : ‘कोरोना’ विषाणूच्या प्रतिबंधासाठी...
देशातील कोरोनाबाधीतांची संख्या ८७३ वरनवी दिल्ली: देशात कोरोनाबाधीतांची संख्या...
सोशल मीडियाच्या मदतीने ढोबळी मिरचीची...जळगाव ः कोरोना विषाणूच्या संकटामुळे परराज्यातील...
खुद्द पंतप्रधानांनी साधला नायडू...पुणे : ‘‘तुम्ही स्वतःची नीट काळजी घेत आहात ना,...
निफाडमध्ये पावसाच्या तडाख्यात...नाशिक : चालू वर्षी निसर्गाच्या लहरीपणामुळे...