agriculture news in Marathi, The silence of the sugar factories is a one-time FRP | Agrowon

एकरकमी एफआरपीबाबत साखर कारखान्यांचे मौन
टीम अॅग्रोवन
बुधवार, 20 मार्च 2019

सातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस गाळप अंतिम टप्प्यात आला आहे. गाळप सुरू असलेल्या कारखान्यांनी एफआरपीची ८० ते ८५ टक्के रक्कम देत शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. साखेरच्या किमान विक्री मूल्यात वाढ करून एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी दिली नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

सातारा ः जिल्ह्यातील बहुतांशी कारखान्यांचा ऊस गाळप अंतिम टप्प्यात आला आहे. गाळप सुरू असलेल्या कारखान्यांनी एफआरपीची ८० ते ८५ टक्के रक्कम देत शेतकऱ्यांची बोळवण केली आहे. साखेरच्या किमान विक्री मूल्यात वाढ करून एकाही कारखान्याने एकरकमी एफआरपी दिली नसल्याने शेतकरी अडचणीत आले आहेत.

ऊस गाळप हंगाम सुरू होताना शेतकरी संघटना प्रतिनिधी व साखर कारखाने प्रतिनिधी यांच्यामध्ये प्रशासनाने घेतलेल्या बैठकीत एकरकमी एफआरपी निर्णय मान्य करण्यात आला होता. मात्र, त्यानंतर साखरेच्या दरात घसरण झाल्यामुळे शेतकऱ्यांना एकरकमी एफआरपी देणे शक्य नसल्याचे कारण देत जिल्ह्यातील सर्वच कारखान्यांनी एफआरपीच्या ८० ते ८५ टक्के म्हणजेच प्रतिटन २२०० ते २६०० रुपयांपर्यंत पहिली उचल दिली आहे.

यानंतर केंद्र सरकारने प्रतिक्विंटल २९०० रुपयांवरून ३१०० रुपये करण्यात आले आहे. या दरम्यान स्वाभिमानी शेतकरी संघटनेने साखर आयुक्त कार्यालयावर आंदोलन केल्यावर आयुक्तांनी कारवाई करण्याचे आदेश दिले होते. यामुळे उर्वरित एफआरपी मिळण्याची शेतकऱ्यांना आशा निर्माण झाली होती. सांगलीतील दोन व कोल्हापूर जिल्ह्यातील एक अशा तीन कारखान्यांकडून एकरकमी एफआरपी दिली असतानाही इतर साखर कारखान्यांनी याबाबत मौन पाळले आहे. 

यामुळे एकरकमी एफआरपीबाबत शेतकऱ्यांची निराशा झाली आहे. साखरेची किमान विक्री मूल्यात वाढ होऊन उर्वरित एफआरपीबाबत कारखान्यांकडून कोणत्याही प्रकारच्या हालचाली होत नसल्यामुळे शेतकऱ्यांत आश्चर्य व्यक्त करत केले जात. मार्च अखेर सुरू असल्याने पीक कर्ज जुने-नवे करण्यासाठी शेतकऱ्यांना पैशांची गरज भासत आहे. एफआरपीमधील २० ते २५ टक्के रक्कम कारखान्यांकडे अडकून पडल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत. सर्व कारखान्यांनी मौन धारण केल्यामुळे उर्वरित एफआरपीबाबत संभ्रावस्था निर्माण झाली आहे.

जिल्ह्यात ७८ लाख टन गाळप
जिल्ह्यात १४ साखर कारखान्यांद्वारे ७८ लाख ८० हजार ८१३ टन उसाचे गाळप केले आहे. यातून ९३ लाख ३४ हजार ३२५ क्विंटल साखर निर्मिती केली आहे. गाळपाचा अंतिम टप्पा सुरू असल्याने साखर उताऱ्यात सुधारणा झाली असून सध्या सरासरी ११.८४ टक्के उतारा मिळत आहे.

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...