Agriculture news in marathi; Silent Movement of Hope Employees to Increase Honor | Agrowon

मानधनवाढीसाठी आशा कर्मचाऱ्यांचे मूक आंदोलन

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 17 सप्टेंबर 2019

नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट करण्याच्या शासनाच्या आश्वासनाची पूर्ती करावी, या मागणीसाठी शनिवार (ता.१४) आशा कर्मचाऱ्यांनी शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन केले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

नाशिक : आशा व गटप्रवर्तकांचे मानधन तिप्पट करण्याच्या शासनाच्या आश्वासनाची पूर्ती करावी, या मागणीसाठी शनिवार (ता.१४) आशा कर्मचाऱ्यांनी शिवाजी रोडवरील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ बसून मूक आंदोलन केले. या वेळी जिल्हाधिकाऱ्यांना मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

विविध प्रलंबित मागण्यांच्या पूर्तीसाठी आरोग्य विभागातील आशा व गटप्रवर्तक यांनी ४ सप्टेंबरपासून राज्यात काम बंद आंदोलन पुकारले आहे. महाराष्ट्र शासनाने मानधन तिप्पट करण्याच्या दिलेल्या आश्वासनाची पूर्तता करावी, या मागणीसाठी आंदोलन सुरू केले आहे. या आंदोलनाचा भाग म्हणून शनिवारी दुपारी बारा वाजता डॉ. आंबेडकर पुतळ्यासमोर आशा कर्मचाऱ्यांनी एकत्र येत मूक आंदोलन केले.

शासनाने आशा कर्मचाऱ्यांना तिप्पट मानधन करण्याचे दिलेले आश्वासन निवडणुकीची आचारसंहिता जारी होण्यापूर्वी पूर्ण करावे, अशी मागणी या वेळी करण्यात येऊन सोमवारी (दि. १६) संपूर्ण महाराष्ट्रात आशा व गटप्रवर्तक कृती समितीच्या वतीने ते ज्या ज्या तालुका व जिल्ह्याच्या ठिकाणी असतील त्यांनी त्या ठिकाणी असलेल्या महापुरुषांच्या पुतळ्याजवळ बसून, काळी पट्टी तोंडाला लावून आंदोलन करण्याचा निर्णय कृती समितीने घेतला आहे.

या आंदोलनात विजय दराडे, अर्चना गडाख, सायली महाले, ज्योती गोडसे, अरुणा आव्हाड, शीतल रहाडे, माधुरी रिकामे, कविता काळे यांच्यासह आदी कर्मचारी सहभागी झाले होते.


इतर ताज्या घडामोडी
कोल्हापूर : साखर उताऱ्यात खासगी कारखाने...कोल्हापूर : यंदाच्या गळीत हंगामात फेब्रुवारीच्या...
वाईत हळदीला दहा हजारांवर दर वाई, जि. सातारा : वाई शेती उत्पन्न बाजार...
वाशीम जिल्ह्यातील महिला बचतगट डिजिटल...वाशीम : राष्ट्रीय  कृषी व ग्रामीण विकास बँक...
जुने वाण राज्यातील शेतकऱ्यांपर्यंत...नगर : राहीबाई यांनी जुनी परंपरा पुनर्जीवित केली...
जातीय सलोख्याला ठेच लागते की काय अशी...जुन्नर, जि. पुणे : सर्वसामान्यांना भेडसावणाऱ्या...
राज्यातील आजारी यंत्रमाग उद्योग...कडेगाव, जि. सांगली ः राज्यातील आजारी यंत्रमाग...
संत्रा, मोसंबी पिकातील फळगळीची कारणेसंत्रा, मोसंबी फळबागांमध्ये नैसर्गिक परिस्थिती,...
लक्षात घ्या चुनखडीयुक्त जमिनीचे गुणधर्मजमिनीत मुक्त चुना वेड्यावाकड्या खड्यांच्या आणि...
नाशिकमध्ये गवार ३००० ते ५५००...नाशिक : येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
सीताफळातील बहार व्यवस्थापनफेब्रुवारी-मार्च महिन्यांत पाण्याची उपलब्धता...
शेतकरीभिमुख संशोधनावर भर : कुलगुरू डॉ....अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठ...
लेखी आश्वासनानंतर बाजार समिती...नाशिक : शासनाने जाहीर केलेला महाभाई भत्ता मिळावा...
लातूर विभागात सूक्ष्म सिंचनातील ११...नांदेड : पंतप्रधान कृषी सिंचन योजनेंतर्गत यंदा...
खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यातजळगाव ः खानदेशात पपईचा हंगाम अंतिम टप्प्यात आहे....
सातारा : अधिकृत विक्रेत्यांकडून...सातारा : बाजार समितीच्या आवारातील...
ग्रामीण पर्यटन विकासाचा ‘शिवनेरी...पुणे ः गड किल्ल्यांच्या पर्यटनाच्या माध्यमातून...
‘एफएसएसएआय’च्या नव्या ‘सीईओ’विषयी...पुणे: भारतीय अन्न सुरक्षितता व मानके...
‘म्हैसाळ’मधून पाणी सोडण्याच्या हालचालीसांगली : म्हैसाळ उपसा सिंचन योजनेतून पाणी...
पीकविमा र‍कमेसाठी शेतकऱ्यांचा रास्ता...अमरावती  ः पीकविम्याची रक्‍कम कर्ज खात्यात...
बिबट्या दिसल्याने ग्रामस्थांत दहशतअमरावती  ः गावशिवारात एकाच आठवड्यात दोनदा...