पाचोडमध्ये शनिवारपासून सुरू होणार रेशीम कोष खरेदी बाजारपेठ

Silk Cell Shopping Market to start on Saturday in Pachod
Silk Cell Shopping Market to start on Saturday in Pachod

पाचोड ता. पैठण : ‘‘येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या पुढाकारातून पाचोड येथील उपबाजारात शनिवारपासून (ता.१) रेशीम कोष खरेदी बाजारपेठ सुरू करणयात येणार आहे. या निमित्ताने रेशीम कोष उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्याचेही आयोजन करण्यात आले आहे’’, अशी माहिती पैठण बाजार समितीचे सचिव नितीन विखे यांनी दिली. 

विखे म्हणाले, ‘‘औरंगाबाद जिल्ह्यात जवळपास तीन हजार शेतकऱ्यांची रेशीम कोष उत्पादनासाठी नोंद आहे. जवळपास ६०० शेतकरी सातत्याने रेशीम कोषाचे उत्पादन करून त्याची रामनगरम व जालना येथील रेशीम कोष खरेदी बाजारात विक्री करतात. पैठण तालुक्‍यासह अंबड व गेवराई तालुक्‍यांतील तसेच इतरही भागांतील रेशीम कोष उत्पादकांची कोष विक्रीची अडचण दूर व्हावी, त्यांना जवळच उत्पादित कोष विक्रीची सोय व्हावी, या उद्‌देशाने पाचोड येथे रेशीम कोष खुली बाजारपेठ सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी रेशीम संचालनालयाची परवानगी घेतली.’’  

शनिवारी (ता.१) या रेशीम कोष खुल्या बाजारपेठेचा रोजगार हमी व फलोत्पादनमंत्री संदीपान पाटील भूमरे यांच्या हस्ते व आरोग्य कुटुंब कल्याणमंत्री राजेश टोपे यांच्या उपस्थितीत प्रारंभ करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाला वस्त्रोद्योग तथा आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील यड्रावकर यांच्यासह जिल्हाधिकारी, रेशीम विभागाचे अधिकारी, कृषी विभागाचे अधिकारी व बाजार समितीचे सभापती राजू (नाना) पाटील भूमरे आदी उपस्थिती राहतील. 

खरेदीसाठी व्यापारी येणार

रेशीम कोष उत्पादकांच्या कोषांची खरेदी व्हावी, यासाठी एजन्सीच्या माध्यमातून इतर ठिकाणच्या व्यापाऱ्यांना कोष खरेदीसाठी पाचारण करण्यात आले आहे. तूर्त केवळ कोष खरेदीची सोय उपलब्ध करून देण्यासाठी अडीच हजार स्क्‍वेअर फूटचा गोडावून उपलब्ध करून देण्यात आला आहे. व्यापाऱ्यांकडून चांगला दर व खरेदीसाठी अपेक्षित प्रतिसाद मिळाल्यास रेशीम कोषासाठी आवश्‍यक सुविधा उपलबध करून देण्यासाठी बाजार समिती काम करेल, असे विखे यांनी सांगितले.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com