जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१ हजारांचा दर

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरू असलेल्या रेशीम कोष खरेदी बाजारात नुकताच (ता.२) यंदाच्या रेशीम कोषास खरेदी हंगामातील उच्चांकी ५१ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१ हजारांचा दर
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१ हजारांचा दर

जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरू असलेल्या रेशीम कोष खरेदी बाजारात नुकताच (ता.२) यंदाच्या रेशीम कोषास खरेदी हंगामातील उच्चांकी ५१ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. याआधी २०१९ मध्ये याच बाजारात कोषाला ५५ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला होता. 

सभापती अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने बाजार समितीत २०१८ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू केले गेले. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेशीम कोष उत्पादकांना येथे रेशीम कोष विक्रीसाठी आणण्याची सोय झाली. 

यंदाच्या आर्थिक वर्षात रेशीम कोष खरेदी १ एप्रिलला सुरू झाली असली, तरी प्रत्यक्षात कोरोना संकटामुळे खरेदी १२ जुलैला सुरू झाली. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास १४७१ शेतकऱ्यांनी १४३ टन रेशीम कोष विक्री केली. जवळपास ४ कोटी ९७ लाखाची उलाढाल झाली. खरेदीत गुरुवारी (ता.२) धामणगाव (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील शेतकरी सोमीनाथ कणसे यांच्या कोषास विक्रमी असा ५१ हजार रुपये प्रती क्विंटलचा भाव मिळाला. 

प्रतिक्रिया... वस्त्रोद्योग मंत्री असताना जालन बाजार समिती परिसरात रेशीम कोष खरेदी मार्केट कार्यान्वित केले. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा वाढत्या प्रतिसादामुळे देशात रामनगरनंतर (कर्नाटक) दुसऱ्या क्रमांकाची बाजार पेठ म्हणून जालना नावारूपास येत आहे. चांगला दर शेतकऱ्यांना मिळत असल्याने आपल्या प्रयत्नांचे फलित होत असल्याच समाधान आहे.  - अर्जुन खोतकर,  सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती जालना  यंदा चीनमध्ये पूरग्रस्त परिस्थिती उद्भवल्याने तेथील रेशीमचे उत्पादन घटले तर भारतात झालेले अनलॉक यामुळे प्रक्रिया उद्योग सुरु झाल्यानंतर एकदमच रेशीमच्या मागणीत मोठी वाढ झाली. १०० अंडी कोषात शेतकरी सरासरी ८० ते ९० किलो उत्पादन घेत आहेत. रेशीम कोष हे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे.  - अजय मोहिते,  जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जालना   

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com