agriculture news in marathi Silk cocoon get highest fiftyone thousand Rate per quintal in Jalna | Page 2 ||| Agrowon

जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१ हजारांचा दर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरू असलेल्या रेशीम कोष खरेदी बाजारात नुकताच (ता.२) यंदाच्या रेशीम कोषास खरेदी हंगामातील उच्चांकी ५१ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला

जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरू असलेल्या रेशीम कोष खरेदी बाजारात नुकताच (ता.२) यंदाच्या रेशीम कोषास खरेदी हंगामातील उच्चांकी ५१ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. याआधी २०१९ मध्ये याच बाजारात कोषाला ५५ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला होता. 

सभापती अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने बाजार समितीत २०१८ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू केले गेले. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेशीम कोष उत्पादकांना येथे रेशीम कोष विक्रीसाठी आणण्याची सोय झाली. 

यंदाच्या आर्थिक वर्षात रेशीम कोष खरेदी १ एप्रिलला सुरू झाली असली, तरी प्रत्यक्षात कोरोना संकटामुळे खरेदी १२ जुलैला सुरू झाली. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास १४७१ शेतकऱ्यांनी १४३ टन रेशीम कोष विक्री केली. जवळपास ४ कोटी ९७ लाखाची उलाढाल झाली. खरेदीत गुरुवारी (ता.२) धामणगाव (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील शेतकरी सोमीनाथ कणसे यांच्या कोषास विक्रमी असा ५१ हजार रुपये प्रती क्विंटलचा भाव मिळाला. 

प्रतिक्रिया...
वस्त्रोद्योग मंत्री असताना जालन बाजार समिती परिसरात रेशीम कोष खरेदी मार्केट कार्यान्वित केले. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा वाढत्या प्रतिसादामुळे देशात रामनगरनंतर (कर्नाटक) दुसऱ्या क्रमांकाची बाजार पेठ म्हणून जालना नावारूपास येत आहे. चांगला दर शेतकऱ्यांना मिळत असल्याने आपल्या प्रयत्नांचे फलित होत असल्याच समाधान आहे. 
- अर्जुन खोतकर, 
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती जालना 

यंदा चीनमध्ये पूरग्रस्त परिस्थिती उद्भवल्याने तेथील रेशीमचे उत्पादन घटले तर भारतात झालेले अनलॉक यामुळे प्रक्रिया उद्योग सुरु झाल्यानंतर एकदमच रेशीमच्या मागणीत मोठी वाढ झाली. १०० अंडी कोषात शेतकरी सरासरी ८० ते ९० किलो उत्पादन घेत आहेत. रेशीम कोष हे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. 
- अजय मोहिते, 
जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जालना 
 


इतर ताज्या घडामोडी
शेतकऱ्यांना बियाण्यांबाबत स्वावलंबी...औरंगाबाद : ‘‘शेतकऱ्यांना बियाण्यांच्या बाबतीत...
परभणी, हिंगोली जिल्ह्यात पंधरा...परभणी  : परभणी, हिंगोली जिल्ह्यातील १५...
परभणी जिल्ह्यात अतिवृष्टिग्रस्तांसाठी...परभणी ः जिल्ह्यात जुलै महिन्यात झालेल्या...
लखीमपूर हिंसाचार : आशिष मिश्राला ‘नोटीस...लखीमपूर, उत्तरप्रदेश ः येथील हिंसाचारप्रकरणी...
सत्तेचा दुरुपयोग सगळ्यांनाच दिसतो आहे...सोलापूर : ‘‘निवडणुकी आधी मला ईडीची नोटीस पाठवली,...
बुलडाण्यात खरीप हंगामात ९५० कोटी...बुलडाणा : अतिवृष्टी, पूर परिस्थितीने यंदाच्या...
साडेचार हजार रुपयांचा पहिला हप्ता उसाला...कुडित्रे, जि. कोल्हापूर : यंदा उसाला उत्पादन...
वादळी पावसामुळे ऊस उत्पादकांचे लाखोंचे...आर्णी, जि. यवतमाळ : संततार पाऊस, वादळाचा...
सांगली जिल्ह्यात रब्बीच्या पेरण्या सुरू सांगली : जिल्ह्यात रब्बी हंगामातील पेरण्यांना...
पुणे बाजार समिती सेस प्रवेशद्वारावर ...पुणे : गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समिती सह...
आंबा, काजू विमा परतावा मंडलनिहाय जाहीर सिंधुदुर्गनगरी : फळपीक विमा योजनेचा परतावा...
कंबोडियाची शाही नांगरणीशेती व्यवसायावर भर देणाऱ्या कंबोडियामध्ये...
कोरडवाहूमध्ये चिंचेची वनशेतीऔषधी गुणांमुळे चिंचेला भारतीय खजूर असे म्हणतात....
छापेमारीच्या हेतूबाबत आयकर विभागच सांगू...मुंबई ः राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांशी...
मराठवाड्यातील २३१ मंडलांत पाऊसपरभणी ः मराठवाड्यातील २३१ मंडलांत बुधवारी (ता. ६...
पुणे जिल्हा बँकेतर्फे रब्बी पीककर्ज...पुणे : खरीप हंगामात सप्टेंबरमध्ये चांगला पाऊस...
रत्नागिरी : आंबा, काजू विमा परतावा ५३...रत्नागिरी ः वातावरणातील बदलामुळे नुकसान झालेल्या...
शेतकऱ्यांची वीज कापली; लोकप्रतिनिधी...जळगाव ः जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत...
आंबा प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी...रत्नागिरी ः पंतप्रधान सूक्ष्म अन्नप्रक्रिया...
सोलापूर जिल्हा परिषद अध्यक्षांवर...सोलापूर : नराळे (ता. सांगोला) येथील आरोग्य...