agriculture news in marathi Silk cocoon get highest fiftyone thousand Rate per quintal in Jalna | Page 2 ||| Agrowon

जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१ हजारांचा दर

टीम अॅग्रोवन
मंगळवार, 7 सप्टेंबर 2021

जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरू असलेल्या रेशीम कोष खरेदी बाजारात नुकताच (ता.२) यंदाच्या रेशीम कोषास खरेदी हंगामातील उच्चांकी ५१ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला

जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत सुरू असलेल्या रेशीम कोष खरेदी बाजारात नुकताच (ता.२) यंदाच्या रेशीम कोषास खरेदी हंगामातील उच्चांकी ५१ हजार रुपये प्रतिक्विंटल भाव मिळाला. याआधी २०१९ मध्ये याच बाजारात कोषाला ५५ हजार रुपये प्रतिक्विंटलपर्यंत दर मिळाला होता. 

सभापती अर्जुन खोतकर यांच्या पुढाकाराने बाजार समितीत २०१८ मध्ये प्रायोगिक तत्त्वावर रेशीम कोष खरेदी केंद्र सुरू केले गेले. त्यामुळे मराठवाड्यासह विदर्भ, खानदेश आणि पश्चिम महाराष्ट्रातील रेशीम कोष उत्पादकांना येथे रेशीम कोष विक्रीसाठी आणण्याची सोय झाली. 

यंदाच्या आर्थिक वर्षात रेशीम कोष खरेदी १ एप्रिलला सुरू झाली असली, तरी प्रत्यक्षात कोरोना संकटामुळे खरेदी १२ जुलैला सुरू झाली. तेव्हापासून आजपर्यंत जवळपास १४७१ शेतकऱ्यांनी १४३ टन रेशीम कोष विक्री केली. जवळपास ४ कोटी ९७ लाखाची उलाढाल झाली. खरेदीत गुरुवारी (ता.२) धामणगाव (ता. फुलंब्री, जि. औरंगाबाद) येथील शेतकरी सोमीनाथ कणसे यांच्या कोषास विक्रमी असा ५१ हजार रुपये प्रती क्विंटलचा भाव मिळाला. 

प्रतिक्रिया...
वस्त्रोद्योग मंत्री असताना जालन बाजार समिती परिसरात रेशीम कोष खरेदी मार्केट कार्यान्वित केले. रेशीम उत्पादक शेतकऱ्यांचा वाढत्या प्रतिसादामुळे देशात रामनगरनंतर (कर्नाटक) दुसऱ्या क्रमांकाची बाजार पेठ म्हणून जालना नावारूपास येत आहे. चांगला दर शेतकऱ्यांना मिळत असल्याने आपल्या प्रयत्नांचे फलित होत असल्याच समाधान आहे. 
- अर्जुन खोतकर, 
सभापती, कृषी उत्पन्न बाजार समिती जालना 

यंदा चीनमध्ये पूरग्रस्त परिस्थिती उद्भवल्याने तेथील रेशीमचे उत्पादन घटले तर भारतात झालेले अनलॉक यामुळे प्रक्रिया उद्योग सुरु झाल्यानंतर एकदमच रेशीमच्या मागणीत मोठी वाढ झाली. १०० अंडी कोषात शेतकरी सरासरी ८० ते ९० किलो उत्पादन घेत आहेत. रेशीम कोष हे शेतकऱ्यांना फायदेशीर ठरत आहे. 
- अजय मोहिते, 
जिल्हा रेशीम विकास अधिकारी, जालना 
 


इतर अॅग्रोमनी
‘महानंद’ला बदनाम करण्याचे प्रयत्न : ...मुंबई : कोरोनाची भयंकर परिस्थिती असताना ‘महानंद’...
‘एम’ अध्यक्षपदी राजकुमार धुरगुडे पाटील...पुणे ः देशपातळीवर कृषी निविष्ठा निर्मिती...
भारतात होणारी सोयापेंड निर्यात...पुणे : भारत सरकारने जणुकीय सुधारित सोयापेंड...
बेदाण्याला उठाव असल्याने दर स्थिरसांगली ः सणांमुळे बेदाण्याला चांगली मागणी आहे....
खरिपात तेलबिया उत्पादनात घट होणारपुणे : खरीप हंगाम २०२१-२२ मध्ये तेलबिया...
साखरनिर्यातीचे १८०० कोटींचे अनुदान मंजूरकोल्हापूर : केंद्राने २०२०-२१ या हंगामात निर्यात...
देशभरात सोयाबीन ५५०० ते ७३००च्या दरम्यानपुणे : सध्या बाजारात येणाऱ्या सोयाबीनपैकी ज्या...
खाद्यतेल आयात शुल्क  कपातीचा ग्राहकांना...पुणे : केंद्र सरकारने देशांतर्गत वाढत्या...
तूर, उडीद आयात कालावधी वाढविल्याचा होईल...पुणे : केंद्र सरकारने तूर आणि उडीद आयातीसाठीचा...
हळद निर्यात ऑगस्टमध्ये ११ टक्क्यांनी...पुणे : देशात निर्यातयोग्य हळदीचा साठा उपलब्ध आहे...
राज्यात तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...नाशिक : राज्यातील तीन अन्न प्रक्रिया प्रकल्पांचे...
केंद्राच्या निर्य़ातीनंतर सोयाबीनच्या...पुणे : केंद्र सरकारने खाद्यतेल आयात शुल्कात कपात...
केंद्र सरकारकडून खाद्यतेल आयात शुल्कात...नवी दिल्ली ः देशात खाद्यतेलाच्या वाढत्या किमतीवर...
वाढत्या मागणीने हरभरा दरात सुधारणापुणे : साठेबाज, व्यापारी आणि मिलर्सवर असलेली...
तूर, मूग, उडीद आयातीची प्रक्रिया सुरू;...पुणे : केंद्र सरकारने पंचवार्षिक करार करून...
रब्बीचे हमीभाव जाहीर : गव्हात ४०; हरभरा...नवी दिल्ली : केंद्र सरकारने रबी हंगामासाठी...
उडीद दरात सुधारणेची चिन्हेपुणे ः गेल्या हंगामात देशात उडदाचे उत्पादन कमी...
बेदाणा दरात प्रतिकिलो २५ ते ३० रुपयांची...सांगली : अफगाणिस्तानात तालिबानी राजवट आल्यामुळे...
जालन्यात रेशीम कोषाला उच्चांकी ५१...जालना : जालना कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत...
साखरेच्या किमान विक्री दरात वाढ करावी...नागपूर : एफआरपीत वाढ झाली असतानाच साखरेच्या...