agriculture news in marathi, Silk cultivation planning is clear till November | Agrowon

तुती लागवडीचे नियोजन नोव्हेंबरपर्यंत स्पष्ट
टीम अॅग्रोवन
बुधवार, 29 ऑगस्ट 2018

औरंगाबाद : मराठवाड्यात पुढील वर्षाच्या तुती लागवडीच्या नियोजनाची प्रक्रिया रेशीम विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत ठराव घेण्याचे स्पष्ट सूचित केलेले होते. येत्या नोव्हेंबरमध्ये तुती लागवडी विषयीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

औरंगाबाद : मराठवाड्यात पुढील वर्षाच्या तुती लागवडीच्या नियोजनाची प्रक्रिया रेशीम विभागाने सुरू केली आहे. त्यासाठी १५ ऑगस्टच्या ग्रामसभेत ठराव घेण्याचे स्पष्ट सूचित केलेले होते. येत्या नोव्हेंबरमध्ये तुती लागवडी विषयीचे चित्र स्पष्ट होणार आहे.

यंदा मराठवाड्याला तुती लागवडीचे ३७०० एकरांचे उद्दिष्ट मिळाले होते. त्याच्या पूर्वतयारीसाठी राबविल्या गेलेल्या महारेशीम अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. मराठवाड्यात जवळपास १० हजार ८८५ एकरांची नोंदणी झाली. त्यादृष्टीने नियोजन करताना रेशीम विभागाने तुतीच्या ४ कोटी ८६ लाख ८२ हजार रोपांची निर्मिती केली. त्यानंतर पावसाच्या खंडाने तुती लागवडीच्या कामात खोडा घातला होता.

संपूर्ण मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांतील ७६८ गावातील प्रति शेतकरी एक एकर प्रमाणे १० हजार ८८५ एकर क्षेत्र तुती लागवडीसाठी नोंदल्या गेले. जानेवारी- फेब्रुवारीमध्ये रोपनिर्मिती व जून, जुलैमध्ये त्याच रोपांनी लागवडीचे सूत्र महारेशीम अभियानाच्या यशस्वीतेसाठी हाती घेतले होते. उद्दिष्टाच्या पूर्तीसाठी २ कोटी ३ लाख ५० हजार रोपांची आवश्‍यकता असताना तुतीची ४ कोटी ८६ लाख ८२ हजार रोपे शेतकऱ्यांनी तयार केली.

रेशीम विभागाने केलेल्या नियोजनबद्ध कार्यामुळे हे शक्‍य झाले आहे. गतवर्षी केलेल्या नियोजनाचा कित्ता गिरवितांनाच यंदाही रेशीम विभागाने पुढील वर्षी किमान ३० हजार शेतकरी तुती लागवडीसाठी प्रेरित होतील असे नियोजन केले असल्याची माहिती रेशीमचे सहायक संचालक दिलीप हाके यांनी दिली. त्यासाठी जिल्ह्यातील प्रत्येक ग्रामपंचायतींना जिल्हाधिकारी व पंचायत विभागाच्या माध्यमातून ग्रामसभेतून ठराव घेण्याविषयीचे सूचित करण्यात आले होते.

येत्या नोव्हेंबरमध्ये ठराव घेणाऱ्या ग्रामपंचायतमध्ये मोहीम राबविण्याची प्रक्रिया सुरू करण्यात येणार आहे. मनरेगांतर्गत लेबर बजेटची प्रक्रिया नोव्हेंबमध्ये सुरू करण्यात येईल. त्यामुळे त्या वेळी नेमक्‍या किती ग्रामपंचायतींनी ग्रामसभेतून रेशीम उद्योगामध्ये सहभागी होण्यासाठी ठराव घेतला हे स्पष्ट होईल. जानेवारी, फेब्रुवारीमध्ये तुती लागवडीसाठीच्या नर्सरीची, रोपनिर्मितीची प्रक्रिया करण्यात येणार आहे.

गतवर्षी प्रमाणेच पुढील वर्षीही नियोजनातून रेशीम उद्योगाला शेतकऱ्यांमध्ये रूजविण्याचा प्रयत्न राहील. त्यासाठी प्रशासनाचीही साथ मिळते आहे. शिवाय शेतकरी रेशीमला मोठ्या प्रमाणात पसंती देत आहेत.
- दिलीप हाके, सहायक संचालक रेशीम, औरंगाबाद विभाग

इतर ताज्या घडामोडी
मराठवाड्यातील चार जिल्ह्यांत पाऊसऔरंगाबाद / जालना : औरंगाबाद, जालना या दोन...
सोलापुरातील कांदा उत्पादकांच्या...सोलापूर : राज्यातील कांदा उत्पादक...
कोयना धरणात ४४.७० टीएमसी उपयुक्त...सातारा  ः कोयना धरणाच्या पाणलोट क्षेत्रात...
पुणे जिल्ह्यातील पूर्व भागात पावसाची...पुणे  : जवळपास आठवडाभराच्या विश्रांतीनंतर...
`कुकडी`तून घोड धरणात पाणी सोडण्याची...न्हावरे, जि. पुणे   ः पावसाळा सुरू होऊन...
विद्राव्य खतांना अनुदान देण्याची मागणीकापडणे, जि. धुळे   ः विद्राव्य खतांना...
नगर जिल्ह्यात पाचशे वैयक्तिक पाणीयोजना...नगर  ः पावसाळा सुरू होऊन दीड महिना उलटला;...
सोलापुरात कृषी विभाग शेतकऱ्यांना देणार...सोलापूर : जिल्हा परिषदेच्या कृषी समितीने...
जळगाव बाजार समितीत ज्वारी, बाजरी,...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत...
नाणार रिफायनरी प्रकल्पाच्या समर्थनासाठी...रत्नागिरी  ः नाणार येथे ग्रीन रिफायनरी...
मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल ः...नाशिक  : मुख्यमंत्री कोण होणार हे जनता ठरवेल...
द्राक्ष शेतीत संघटनात्मक कार्यपद्धती...नाशिक : जागतिक द्राक्ष निर्यातीत नाशिक जिल्ह्याचा...
बुलडाणा जिल्ह्यात दुष्काळी स्थितीचा...नांदुरा, जि. बुलडाणा   ः तालुक्यात...
नांदेड, परभणी, हिंगोलीत पाऊसनांदेड : नांदेड, परभणी, हिंगोली जिल्ह्यांतील २८...
सांगली जिल्ह्यातील ४६८ गावांमधील...सांगली  : जिल्ह्यात ४६८ गावांमधील गावठाणांचा...
लातूर, उस्मानाबाद, जालना, बीड...लातूर : लातूर, उस्मानाबाद, जालना आणि बीड...
अकोला जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकटअकोला ः पावसाचा खंड आणि त्यातच दिवसाचे...
जलसंधारण कामासाठी जलशक्ती योजना :...वाल्हे, जि. पुणे  : राज्यात जलयुक्त...
अनधिकृत बंधारे काढण्यासाठी ‘स्वाभिमानी’...नगर  : भंडारदरा धरणापासून ते ओझर...
बचत गटांना प्रोत्साहनासाठी ‘हिरकणी...सोलापूर  : राज्याच्या औद्योगिक आणि आर्थिक...