बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम विकास प्रकल्प

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात २८२ शेतकऱ्यांकडे रेशीम विकास प्रकल्प कार्यान्वित असून यंदाच्या वर्षात या प्रकल्पात सहभागी होण्याबाबत रेशीम विकास कार्यालयाने आवाहन केले आहे.
Silk development project implemented by 282 farmers in Buldana
Silk development project implemented by 282 farmers in Buldana

बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत रेशीम संचालनालयामार्फत रेशीम विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात २८२ शेतकऱ्यांकडे रेशीम विकास प्रकल्प कार्यान्वित असून यंदाच्या वर्षात या प्रकल्पात सहभागी होण्याबाबत रेशीम विकास कार्यालयाने आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून चालू आर्थिक वर्षात रेशीम विकास प्रकल्पाअंतर्गत शेतकरी तुती लागवड क्षेत्रात रेशीम कीटक संगोपन घेत आहेत. रेशीम शेतीतून हे शेतकरी चांगले उत्पन्न मिळवत आहेत. सध्याचा कमीत कमी दर १८० रुपये प्रति किलो गृहीत धरला तर २७ हजार ते ३१ हजार ५०० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. वर्षभराच्या हंगामात ४ ते ५ वेळा बॅच लावता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी एक लाखांवर उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता रेशीम शेतीत आहे.

यंदा ज्या शेतकऱ्यांना मनरेगाअंतर्गत रेशीम विकास प्रकल्प राबवायचा आहे त्यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज देऊन ग्राम सभेमध्ये ठराव पारीत करून घेणे गरजेचे आहे. सन २०२१-२२ चा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कृती आराखडा पुढील महिन्यात सादर केला जाणार आहे. यासाठी लाभार्थी यादीसह कृती आराखड्यात ग्रामस्तरावरील, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी रेशीम विकास प्रकल्पासाठी ठराव घेऊन त्याची प्रत रेशीम विकास अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे द्यावी. रेशीम शेतीबाबत उत्सूक असलेल्या शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन रेशीम विकास प्रकल्पाच्या वतीने करण्यात आले आहे.

मनरेगाअंतर्गत असे मिळते अनुदान तुती लागवड जोपासन्यासाठी पहिल्या वर्षी ६७,११६ रुपये, दुसऱ्या वर्षात ४७,६०० रुपये, तिसऱ्या वर्षाकरिता ४७,६०० रुपये, असे एकूण १ लाख ६२ हजार ३१६ रुपये मिळतात. संगोपन साहित्यासाठी पहिल्या वर्षात ४१ हजार १६० रुपये, दुसऱ्या वर्षी १० हजार २८५ रुपये, तिसऱ्या वर्षी १०,२८५ रुपये असे एकूण  ६१ हजार ७३० रुपये मिळतात. रेशीम कीटक संगोपन गृह साहित्यासाठी ४९,०५० रुपये मिळतात. रेशीम कीटक संगोपन गृह बांधकामासाठी ५०,६९४  रुपये मिळतात. एकूण विचार केल्यास पहिल्यावर्षात संपूर्ण रक्कम २ लाख ८०२०, दुसऱ्या वर्षात ५७,८८५ रुपये, तिसऱ्या वर्षात ५७,८८५ रुपये असे एकूण ३ लाख २३ हजार ७९० रुपये अनुदान स्वरूपात मिळतात.

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com