Agriculture news in Marathi Silk development project implemented by 282 farmers in Buldana | Agrowon

बुलडाण्यात २८२ शेतकऱ्यांनी राबवला रेशीम विकास प्रकल्प

टीम अॅग्रोवन
सोमवार, 10 ऑगस्ट 2020

महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात २८२ शेतकऱ्यांकडे रेशीम विकास प्रकल्प कार्यान्वित असून यंदाच्या वर्षात या प्रकल्पात सहभागी होण्याबाबत रेशीम विकास कार्यालयाने आवाहन केले आहे.

बुलडाणा : जिल्ह्यात सन २०१५-१६ पासून सहकार व वस्त्रोद्योग विभागाअंतर्गत रेशीम संचालनालयामार्फत रेशीम विकास प्रकल्प राबविण्यात येत आहे. महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेतून जिल्ह्यात २८२ शेतकऱ्यांकडे रेशीम विकास प्रकल्प कार्यान्वित असून यंदाच्या वर्षात या प्रकल्पात सहभागी होण्याबाबत रेशीम विकास कार्यालयाने आवाहन केले आहे.

शेतकऱ्यांना पूरक व्यवसाय म्हणून चालू आर्थिक वर्षात रेशीम विकास प्रकल्पाअंतर्गत शेतकरी तुती लागवड क्षेत्रात रेशीम कीटक संगोपन घेत आहेत. रेशीम शेतीतून हे शेतकरी चांगले उत्पन्न मिळवत आहेत. सध्याचा कमीत कमी दर १८० रुपये प्रति किलो गृहीत धरला तर २७ हजार ते ३१ हजार ५०० रुपयांपर्यंत उत्पन्न मिळत आहे. वर्षभराच्या हंगामात ४ ते ५ वेळा बॅच लावता येते. त्यामुळे शेतकऱ्यांना एकरी एक लाखांवर उत्पन्न मिळवून देण्याची क्षमता रेशीम शेतीत आहे.

यंदा ज्या शेतकऱ्यांना मनरेगाअंतर्गत रेशीम विकास प्रकल्प राबवायचा आहे त्यांनी ग्रामपंचायतीकडे अर्ज देऊन ग्राम सभेमध्ये ठराव पारीत करून घेणे गरजेचे आहे. सन २०२१-२२ चा महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेचा कृती आराखडा पुढील महिन्यात सादर केला जाणार आहे. यासाठी लाभार्थी यादीसह कृती आराखड्यात ग्रामस्तरावरील, ग्रामसेवक, ग्रामविकास अधिकारी यांनी रेशीम विकास प्रकल्पासाठी ठराव घेऊन त्याची प्रत रेशीम विकास अधिकारी व गटविकास अधिकारी यांच्याकडे द्यावी. रेशीम शेतीबाबत उत्सूक असलेल्या शेतकऱ्यांनी योजनेत सहभागी होण्याचे आवाहन रेशीम विकास प्रकल्पाच्या वतीने करण्यात आले आहे.

मनरेगाअंतर्गत असे मिळते अनुदान
तुती लागवड जोपासन्यासाठी पहिल्या वर्षी ६७,११६ रुपये, दुसऱ्या वर्षात ४७,६०० रुपये, तिसऱ्या वर्षाकरिता ४७,६०० रुपये, असे एकूण १ लाख ६२ हजार ३१६ रुपये मिळतात. संगोपन साहित्यासाठी पहिल्या वर्षात ४१ हजार १६० रुपये, दुसऱ्या वर्षी १० हजार २८५ रुपये, तिसऱ्या वर्षी १०,२८५ रुपये असे एकूण  ६१ हजार ७३० रुपये मिळतात. रेशीम कीटक संगोपन गृह साहित्यासाठी ४९,०५० रुपये मिळतात. रेशीम कीटक संगोपन गृह बांधकामासाठी ५०,६९४  रुपये मिळतात. एकूण विचार केल्यास पहिल्यावर्षात संपूर्ण रक्कम २ लाख ८०२०, दुसऱ्या वर्षात ५७,८८५ रुपये, तिसऱ्या वर्षात ५७,८८५ रुपये असे एकूण ३ लाख २३ हजार ७९० रुपये अनुदान स्वरूपात मिळतात.


इतर बातम्या
बार्शी बाजार समितीत उडीद, मूग हमीभाव...सोलापूर : बार्शी कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये...
नाशिक जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे दाणादाणनाशिक : पावसाळा सुरू झाल्यानंतर अनेक ठिकाणी...
नाशिकमध्ये कांदा निर्यातबंदीमुळे कामकाज...नाशिक : केंद्राच्या वाणिज्य मंत्रालयाने कांदा...
पीक कर्जासाठी बँकेत मुक्कामाची वेळ येऊ...बुलडाणा ः खरीप हंगामातील पिकांच्या काढणीची वेळ...
पाथरूड परिसरातील प्रकल्प तुडुंबपाथरूड, जि. उस्मानाबाद : पाथरूडसह परिसरात...
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील ९० टक्के...सिंधुदुर्ग ः जिल्ह्यातील ९० टक्के भातपिकांना...
परभणी, हिंगोलीत अतिवृष्टीमुळे पिकांवर...परभणी : खरीप हंगामातील सोयाबीन काढणीच्या, कापूस...
हिंगोली जिल्ह्यात सोयाबीनच्या शेंगांना...हिंगोली : गतवर्षी प्रमाणे यंदाही सोयाबीनचे पीक ऐन...
मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूचऔरंगाबाद : मराठवाड्यात पावसाचा धुमाकूळ सुरूच आहे...
‘जायकवाडी’तील विसर्गात घटऔरंगाबाद : जिल्ह्यातील जायकवाडी प्रकल्पातून...
निम्न दुधनातून ७१९० क्युसेकने विसर्गपरभणी : सेलु तालुक्यातील ब्रम्हवाकडी येथील दुधना...
अनुदानाअभावी मर्यादित लाभार्थ्यांना...सिंधुदुर्ग ः कोरोनामुळे शासनाने जिल्हा परिषदेच्या...
ऊसतोडणीच्या तिढ्यावर आज चर्चापुणे : दहा लाख ऊस तोडणी कामगारांच्या मागण्यांबाबत...
यवतमाळ जिल्ह्यात सोयाबीन शेंगांना फुटले...यवतमाळ : खोडकीड, चक्रीभुंगा त्यानंतर आता परिपक्व...
बुलडाणा : नवीन सोयाबीनला चिखलीत ३८८१...बुलडाणा ः या हंगामात लागवड केलेल्या सोयाबीनची...
संत्रा उत्पादकांना हेक्टरी लाखाची भरपाई...नागपूर : विदर्भात नैसर्गिक आपत्तीमुळे संत्रा,...
पुण्यात विशिष्ट ठिकाणीच लिंबे विक्रीला...पुणे ः गुलटेकडी येथील कृषी उत्पन्न बाजार समितीने...
पावसाने पुन्हा दाणादाणपुणेः मराठवाड्यासह नाशिक, नगर, पुणे आणि...
फवारणी विषबाधाप्रकरण स्वित्झर्लंडच्या...यवतमाळ: यवतमाळ जिल्ह्यातील तीन शेतकऱ्यांनी २०१७...
अभूतपूर्व गदारोळात कृषी विधेयके मंजूरनवी दिल्ली: गगनभेदी घोषणा, धक्काबुक्की,...