Agriculture news in marathi silk directors interact with growers at Nishti | Agrowon

रेशीम संचालकांनी साधला उत्पादकांशी संवाद

टीम अॅग्रोवन
शनिवार, 23 नोव्हेंबर 2019

भंडारा : जिल्ह्यातील टसर रेशीम उत्पादक गाव असलेल्या निष्टी येथे रेशीम संचालक भाग्यश्री बानायत यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी टसर रेशीम उत्पादनाशी निगडित अडचणींबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधत त्या अडचणींच्या सोडवणुकीचे आश्‍वासन दिले. 

भंडारा : जिल्ह्यातील टसर रेशीम उत्पादक गाव असलेल्या निष्टी येथे रेशीम संचालक भाग्यश्री बानायत यांनी भेट दिली. या वेळी त्यांनी टसर रेशीम उत्पादनाशी निगडित अडचणींबाबत शेतकऱ्यांशी संवाद साधत त्या अडचणींच्या सोडवणुकीचे आश्‍वासन दिले. 

निष्टी येथे नावीन्यपूर्ण योजनेअंतर्गत टसर रेशीमकोष उत्पादकांकरिता टसर कोष, टसर धागानिर्मिती ते कापडनिर्मिती प्रकल्प राबविण्यात येत आहे. सदर प्रकल्पाअंतर्गत निष्टी येथे एक एकर शासकीय जागा उपलब्ध झाली असून, तेथे टसर रेशीम मूलभूत सुविधा केंद्राचे बांधकाम सुरू आहे. सदर बांधकामाची पाहणीसुद्धा भाग्यश्री बानायत यांच्याकडून करण्यात आली. या वेळी टसर रेशीम अळीचे खाद्यवृक्ष अर्जुनचे वृक्षारोपण करण्यात आले.

उपस्थित टसर रेशीमकोष उत्पादक लाभार्थ्यांशी संचालकांनी संवाद साधला. टसर कोष उत्पादक लाभार्थींच्या वनक्षेत्राविषयी अडचणी, अंडीपुंज दराचे अनुदान व रिलींग कोष दराबाबतचे सकारात्मक निर्णय घेण्यात येतील, असे संचालकांनी सांगितले.

नावीन्यपूर्ण योजनेचा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणात टसर कोषापासून धागानिर्मिती करावी आणि गावातच रोजगार उपलब्ध करावा, त्याकरिता रेशीम संचालनालय सहकार्य करेल, असे भाग्यश्री बानायत यांनी या वेळी सांगितले. टसर अंडीपुंज उत्पादक चंद्रकांत डहारे व वामन सदाशिव डहारे यांच्या अंडीपुंज निर्मितीगृह केंद्राला या वेळी भेट देण्यात आली. या वेळी रेशीम उपसंचालक डी. ए. हाके, आर. टी. जोगदंड, पी. जी. मदने, अनिलकुमार ढोले यांची या वेळी उपस्थिती होती.

या वेळी नैसर्गिक टसर किट संगोपन कार्यक्रमाचे औपचारिक उद्‍घाटन निष्टी येथील नैसर्गिक ऐन वनक्षेत्रात रेशीम संचालकांच्या हस्ते करण्यात आले. २०१९-२० मध्ये भंडारा जिल्ह्यात ९० ते ९५ हजार अंडीपुंजाचे वाटप करून ३० ते ३५ लक्ष टसर कोषाचे उत्पादन करण्याचे नियोजन असल्याची माहिती प्रभारी रेशीम विकास अधिकारी अनिलकुमार ढोले यांनी दिली.


इतर बातम्या
कळवण येथे शेतकरी संघटनेचे निर्बंधमुक्ती...नाशिक  : शेतकरी संघटनेचे संस्थापक शरद जोशी...
नुकसानीमुळे पीककर्जाकडे शेतकऱ्यांचा कल पुणे ः अतिपावसामुळे खरीप पिकांचे नुकसान...
सटाणा शहरात कचऱ्यापासून होणार...नाशिक : सटाणा शहराने स्वच्छतेच्या बाबतीत...
म्हणे शेतात, पीक असल्याने वीज जोडणीस...अमरावती  ः शेतात पीक असल्यामुळे शेतकरी वीज...
पुणे जिल्हा परिषद अध्यक्ष पदासाठी आज...पुणे ः पुणे जिल्हा परिषदेच्या अध्यक्ष पदासाठी...
औरंगाबाद, जालना, बीड जिल्ह्यांत कापूस...औरंगाबाद : आधी दुष्काळाचा ताण, त्यानंतर...
पुणे जिल्ह्यात ग्रामपंचायतींच्या...पुणे ः जिल्ह्यात पुढील वर्षी जुलै ते डिसेंबर २०२०...
काळ्या ज्वारीमुळे शासकीय खरेदीला ब्रेकअमरावती  ः अचलपूर खरेदी विक्री संघाला ज्वारी...
मराठवाड्यातील १४ लाख ५५ हजार हेक्‍टरवर...उस्मानाबाद : मराठवाड्यातील आठही जिल्ह्यांत १४ लाख...
माकडांच्या उच्छादामुळे बोराच्या बागेचे...मानोरा जि. वाशीम ः तालुक्यातील  कारखेडा...
नगर झेडपी चारा उत्पादनावर करणार १ कोटी...नगर ः नगर जिल्ह्यामध्ये यंदा पाण्याची उपलब्धता...
वाळवा तालुक्‍यात द्राक्ष उलाढालीत सात...वाळवा, जि. सांगली : अतिवृष्टीने द्राक्षशेतीचे...
कोल्हापूर जिल्ह्यात बँकांना २५००...कोल्हापूर : ‘‘जिल्ह्यात सर्वच बॅंकांना २ हजार ४३०...
कांदा साठवणूक निर्बंधाचा फेरविचार करानाशिक : गेल्या आठवड्याच्या तुलनेत या आठवड्यात...
नांदेड विभागातील १ लाख ८५ हजार टन उसाचे...नांदेड : चार जिल्ह्यांतील ८ कारखान्यांनी यंदाच्या...
रेशीम विभागास पुरेसे मनुष्यबळ देण्याची...परभणी ः महिन्याकाठी शाश्वत उत्पन्नाच्या दृष्टीने...
दर्गनहळ्ळी येथे वाढलाय पक्ष्यांचा...सोलापूर : पूर्वी सूर्यकिरणांसोबतच पक्ष्यांचा...
चुकीच्या तापमान नोंदीमुळे रत्नागिरीतील...रत्नागिरी  : जिल्ह्यात आंबा, काजू पिकांसाठी...
जागते रहो... कांदाचोरांचा अजून सुळसुळाट...फलटण शहर, जि. सातारा   ः सध्या...
सांगली जिल्ह्यात हळद पिकावर कंदकुज,...सांगली  ः महापूर आणि अतिवृष्टीमुळे कंदकुज...