agriculture news in marathi In the silk farming industry Great opportunity: Gujute | Agrowon

रेशीम शेती उद्योगात मोठी संधी ः गुजुटे

टीम अॅग्रोवन
बुधवार, 17 मार्च 2021

येरोळ, जि. लातूर : ‘‘तरुणांनी रेशम शेतीकडे वळावे. या योजेनेमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन शेती केली, तर कमी मेहनत व वेळेत एकरी चार लाख रुपये उत्पादन वर्षाकाठी मिळणारा हा शेती व्यवसाय आहे.’’

येरोळ, जि. लातूर : ‘‘तरुणांनी रेशम शेतीकडे वळावे. या योजेनेमध्ये व्यावसायिक दृष्टिकोन ठेऊन शेती केली, तर कमी मेहनत व वेळेत एकरी चार लाख रुपये उत्पादन वर्षाकाठी मिळणारा हा शेती व्यवसाय आहे. तरुण शेतकऱ्यांसाठी या उद्योगात मोठी संधी आहे,’’ असे मत कृषी सहायक बी. एल. गुजुटे यांनी व्यक्त केले.

जांभळवाडी (ता. शिरुर अनंतपाळ) येथे तालुका कृषी विभागातर्फे नानाजी कृषी संजीवनी प्रकल्पाअंतर्गत रेशीम शेती उद्योग करण्यासाठी शेतकरी बचतगटाची बैठक झाली.  गुजुटे म्हणाले, ‘‘ शेतकऱ्यांनी लातूर जिल्हा रेशिम कार्यालयाकडे सातबारा, आठ अ, बँक पासबुक झेरॉक्स, आधार कार्ड व सभासद नोंदणी शुल्क पाचशे रुपये भरुन २१ मार्च २०२१ पर्यंत सभासदं व्हावे. या योजनेचा लाभ घ्यावा.’’

‘‘या योजेनेमध्ये शेतकऱ्यांनी शेतावर तुती लागवड करावी. त्यांना या योजेनेतून २ लाख २६ हजारांचे अनुदान तीन टप्प्यामध्ये मिळेल. यात शेतकऱ्यांनी तुती लागवड करणे, शेड उभारणी, संगोपण साहित्य आदीसाठी सबसीडी देण्यात येईल,’’ अशी माहिती कृषी सहायक डी. बी. शिंदे यांनी दिली.

राम बालवाड, गुडेराव चौसष्टे, दिनेश नरहरी, रामराव साकोळकर, चंद्रकांत सारसेकर, बालाजी बेबंडे, भरत नामदे, नामदेव भुसागरे, पांडुरंग शिरुळे, रमेश पिचारे आदी उपस्थित होते.
 


इतर ताज्या घडामोडी
पशुवैद्यक करणार घरपोच सेवा बंदनागपूर : पशुवैद्यकांना फ्रंटलाइन वर्कर्स व कोरोना...
सोयाबीन बियाणे निर्बंध मध्य प्रदेशकडून...पुणे ः परराज्यांत सोयाबीन बियाणे विक्रीवर निर्बंध...
‘महाबीज’चे सोयाबीन बियाणे दर ‘जैसे थे’अकोला : खरीप हंगामासाठी ‘महाबीज’ने सोयाबीन...
देशाच्या तुलनेत निम्मी साखर एकट्या...कोल्हापूर : देशाच्या साखरनिर्यात कोट्यापैकी जवळ...
‘गोकुळ’चा कल सत्तांतराकडेकोल्हापूर : अत्यंत चुरशीने झालेल्या कोल्हापूर...
‘सह्याद्री’च्या पर्वतरांगेमधून...नाशिक : सह्याद्रीच्या पर्वतरांगेत पश्‍चिम घाट...
राज्यात आंब्याचा हंगाम ऐन बहरातअकोल्यात बदाम आंबा ४००० ते ४५०० रुपये क्विंटल...
सोशल मीडियाद्वारे ६५ टन कलिंगड विक्रीपुणे : कोरोनामुळे सलग दुसऱ्या वर्षी एप्रिल...
मध्य प्रदेश सरकारकडून बियाणे विक्रीवर...पुणे ः सोयाबीन बीजोत्पादनात देशात सर्वात मोठा...
पशुखाद्य निर्मितीचा कच्चा माल दुपटीने...सांगली : पशुखाद्य तयार करण्यासाठी लागणाऱ्या...
दक्षिण भागात गारपिटीची शक्यतापुणे :  गेल्या काही दिवसांपासून उन्हाचा चटका...
परभणी जिल्ह्यात कडक निर्बंध लागूपरभणी ः  कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी...
परभणी जिल्ह्यात लघु तलावांत सरासरी १९...परभणी ः वाढते तापमान, बाष्पीभवनाचा वाढलेला वेग,...
नाशिक जिल्ह्यात बाजार समित्यांमध्ये...नाशिक : पणन विभागाच्या परिपत्रकात सलग ३...
नाशिक : 'ऑक्सिजन एक्स्प्रेस'द्वारे २७....नाशिक : ‘‘जिल्ह्यातील प्राणवायूची तूट भरून...
सांगलीत केळीच्या क्षेत्रात घट होण्याची...सांगली ः जिल्ह्यात गेल्या दोन वर्षात झालेल्या...
रत्नागिरीत ३७ टन काजू बी तारणरत्नागिरी ः काजूचे बाजारातील दर घसरल्यानंतर...
आदिवासी विकास मंडळ करणार गव्हाची खरेदीयवतमाळ : आदिवासी विकास महामंडळाकडून राज्यात...
परभणीत सोयाबीनचे दीड हजार क्विंटल...परभणी ः परभणी तालुक्यात यंदा ११० हेक्टरवर उन्हाळी...
भुईमुगाचे वाण निकृष्ट, कंपन्यांवर...यवतमाळ : जिल्ह्यात भुईमुगाच्या शेंगा न धरण्याचे...