`केव्हीके`त रेशीम कोष हस्तकला प्रशिक्षण
`केव्हीके`त रेशीम कोष हस्तकला प्रशिक्षण

`केव्हीके`त रेशीम कोष हस्तकला प्रशिक्षण

अकोला : कृषी विज्ञान केंद्राच्या (सिसा उदेगाव) प्रक्षेत्रावर ‘रेशीम कोष हस्तकला’ या विषयावर दोनदिवसीय प्रशिक्षण घेण्यात आले. 

अध्यक्षस्थानी सुहासिनी धोत्रे होत्या. जिल्हा रेशीम अधिकारी डॉ. संजय शिंदे, मराठा महिला मंडळाच्या अध्यक्ष भारती घारपळकर, कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे प्रा. डॉ. ए. डी. जाधव, आतरराष्ट्रीय रेशीम कोष प्रशिक्षक प्रियंका जाधव, विषय विशेषज्ज्ञ कुलदीप देशमुख, डॉ. चारुदत्त ठिपसे, कीर्ती देशमुख उपस्थित होते. 

धोत्रे म्हणाल्या, ``आपल्या जिल्ह्यातील बरेच शेतकरी रेशीम शेतीतून रेशीम कोष तयार करतात. अशा शेतकऱ्यांकडून महिलांनी कमी दर्जाचे रेशीम कोष विकत घ्यावे. हस्तकला निर्मित वस्तू विक्रीतून रोजगार उपलब्घ होऊ शकतो. त्यामुळे कृषी विज्ञान केंद्राकडून प्रशिक्षण घेऊन मोठ्या संख्येने या नावीन्यपूर्ण व्यवसायाकडे वळावे.``

``जिल्ह्यातील शेतकऱ्यांचा रेशीम शेतीकडे कल वाढत आहे. रेशीम हस्तकला उद्योग अंगीकारला तर वाया जाणारा रेशीम कोष वापरण्यात मदत होईल. महिला बचत गटास स्वयंरोजगार मिळून कुटुंबास आर्थिक हातभार लागेल``, असे डॉ. संजय शिंदे यांनी सांगितले.

प्रमुख मार्गदर्शक डॉ. जाधव यांनी तुती लागवड ते रेशीम कोषनिर्मातीवर मार्गदर्शन केले. प्रियंका जाधव यांनी रेशीम कोषापासून विविध हस्तकला निर्मित वस्तू हार, फुले, बुके, दागदागिने इत्यादी तयार करण्याचे प्रात्यक्षिक करून दाखवले. 

देशमुख म्हणाल्या, ``रेशीम कोष हस्तकला निर्मित वस्तूंना बाजारात मागणी आहे. बचत गटातील महिलांनी, युवक, युवतींनी वस्तू तयार करून त्यावर लेबलिंग, पॅकेजिंग करून बाजारात आणावेत.``

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com