Agriculture news in Marathi, silk grant not sufficient | Agrowon

रेशीम अनुदान म्हणजे राजा उदार झाला...
टीम अॅग्रोवन
गुरुवार, 5 सप्टेंबर 2019

नागपूर ः रेशीम कोषाला किलोमागे ५० रुपये अनुदान देण्याची घोषणा ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’, अशा पठडीतील ठरण्याची शक्‍यता उत्पादकांकडून वर्तविली जात आहे. सध्या राज्यात कोष खरेदीच होत नसल्याने महाराष्ट्रात विकलेल्या कोषालाच हे अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यासोबतच १०० अंडीपुंजापासून ५० किलो कोष उत्पादकता असेल तितक्‍याच कोष विक्रीला अनुदान मिळणार असल्याने संभ्रम आणखीच वाढला आहे. 

नागपूर ः रेशीम कोषाला किलोमागे ५० रुपये अनुदान देण्याची घोषणा ‘राजा उदार झाला आणि हाती भोपळा दिला’, अशा पठडीतील ठरण्याची शक्‍यता उत्पादकांकडून वर्तविली जात आहे. सध्या राज्यात कोष खरेदीच होत नसल्याने महाराष्ट्रात विकलेल्या कोषालाच हे अनुदान देण्याचे जाहीर करण्यात आले आहे. त्यासोबतच १०० अंडीपुंजापासून ५० किलो कोष उत्पादकता असेल तितक्‍याच कोष विक्रीला अनुदान मिळणार असल्याने संभ्रम आणखीच वाढला आहे. 

शासनाने एक सप्टेंबरला रेशीम दिनाचे औचित्य साधत महाराष्ट्रात कोष विक्रीपोटी किलोमागे ५० रुपयांचे अनुदान जाहीर केले. त्याकरिता रेशीम शेतकऱ्यांना संगणकीकृत बारकोड असलेले पासबुक देण्यात येऊन त्या पासबुकमध्ये बॅंचवाइज अंडीपुंज व चॉकी व त्याच्या कोष उत्पादनाची नोंद ठेवण्यात येणार आहे. १०० अंडीपुंजाला ५५ किलो कोष अशी मर्यादा अनुदानाकरिता निश्‍चित करण्यात आली आहे. 

राज्यातील शेतकरी १०० अंडीपुंजापासून ८० ते ९० किलो कोष उत्पादन घेतात. त्यामुळे उर्वरित कोषाचे काय करावे, असा प्रश्‍न त्यांच्यासमोर निर्माण झाला आहे. जिल्हा वार्षिक योजनेमध्ये उत्पादनावर आधारित कोष अनुदानाची आवश्‍यक तरतूद करून घेण्याची जबाबदारी संबंधित जिल्हा रेशीम अधिकाऱ्याची असणार आहे. राज्यातील शासकीय किंवा शासनमान्य खरेदी विक्री बाजारपेठेतच कोष विक्री यात बंधनकारक आहे. परंतु जालना येथील कोष विक्रीचे केवळ भूमिपूजन एक सप्टेंबरला झाले. त्यामुळे ही बाजारपेठ केव्हा उपलब्ध होणार आणि अनुदान कधी मिळणार, असा प्रश्‍न शेतकरी उपस्थित करीत आहेत.

शासनमान्य कोष विक्रीचे मोजकेच पर्याय आहेत. जालना येथे असल्याचे सध्या सांगितले जाते. परंतु विदर्भातील शेतकऱ्यांसाठी जालनापर्यंतचे अंतर अधिक असणार आहे. त्याऐवजी कर्नाटकातील रामनगर बाजारपेठेचा पर्याय विदर्भातील कोष उत्पादकांसाठी चांगला आहे. त्यामुळे शासनाने आधी बाजारपेठेचा पर्याय त्याप्रमाणात उपलब्ध करून द्यावा. 
त्यानंतरच अनुदानाकरिता अटी, शर्तींची 
गरज आहे.   
- महेश्‍वर बिचेवार, विडूळ, उमरखेड, जि. यवतमाळ

बारामती, जालना बाजार समितीत रेशीम कोष खरेदी सुरू आहे. येथे कोष विकल्यास शेतकऱ्यांना अनुदान मिळेल. लवकरच पुर्णा (जि. परभणी) येथे करेदी सुरू होत आहे. तसा करार बाजार समितीसोबत करण्यात आला आहे.
- अर्जुन गोरे, उपसंचालक, रेशीम संचलनालय, नागपूर

इतर ताज्या घडामोडी
हमीभाव खरेदी केंद्राकडे शेतकऱ्यांची पाठसोलापूर  : मूग, उडीद, सोयाबीनची हमीभावाने...
भोर तालुक्यात रात्रभर मुसळधार पाऊसपुणे : जिल्ह्यात सोमवारी (ता. २१) दिवसभराच्या...
सोलापूर जिल्ह्यात पावसामुळे टॅंकरच्या...सोलापूर  : गेल्या वर्षीच्या दुष्काळानंतर...
सातारा जिल्ह्यात सोयाबीन काढणीत पावसाचा...सातारा ः जिल्ह्यात अतिवृष्टी आणि सध्या सुरू...
मराठवाडी धरणावर पुन्हा यंत्रणा सज्जढेबेवाडी, जि. सातारा ः पावसाळ्यात थांबविलेले...
परभणीत अतिवृष्टीमुळे बाधित पिकांची...परभणी ः जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे बाधित झालेल्या...
स्वाभिमानीच्या विदर्भ अध्यक्षांवरील...अमरावती ः स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विदर्भ...
सततच्या पावसाने नगर जिल्ह्यात पिकांचे...नगर ः जिल्ह्यात गेल्या चार दिवसांपासून पडत...
सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पाऊस; भात...सिंधुदुर्ग  ः जिल्ह्यात मुसळधार पाऊस सुरूच...
खाद्यउद्योगासाठी जंगली बुरशींचे...क्विण्वनयुक्त पदार्थांच्या चवीमध्ये त्यामध्ये...
पावसामुळे नाशिक जिल्ह्यातील...नाशिक   : जिल्ह्यात द्राक्ष हंगामाला...
डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाचा...अकोला  ः डॉ. पंजाबराव देशमुख कृषी...
फलटण तालुक्यात द्राक्षांचे घट फुटले;...सातारा  : फलटण तालुक्यातील निरगुडी, गिरवी,...
रसायनांच्या परिणामकारकतेसाठी नोझल,...तणनाशकाचे गुणधर्म असलेला एखादा क्रियाशील घटक...
जळगावात आले २८०० ते ५२०० रुपये...जळगाव  : कृषी उत्पन्न बाजार समितीत मंगळवारी...
वऱ्हाडात सरासरी ६१.५९ टक्के मतदानअकोला ः गेल्या १५ दिवसांपासून सुरू असलेल्या...
सोलापूर जिल्ह्यात मतदान शांततेतसोलापूर ः सोलापूर जिल्ह्यात रात्रभर पडत असलेल्या...
एकात्मिक कीड नियंत्रणासाठी स्वयंचलित...किडीच्या एकात्मिक नियंत्रणासाठी विविध प्रकारच्या...
दिंडोरी, नाशिक भागांत डाऊनीचा...नाशिक   : जिल्ह्यात दिंडोरी, नाशिक...
इंदापुरात १२०० एकर द्राक्ष बागा उद्‌...भवानीनगर, जि. पुणे  : इंदापूर तालुक्‍यातील...