रेशीम उत्पादकांचा सरकारदरबारी मागण्यांचा पाठपुरावा सुरूच

रेशीम उत्पादकांचा सरकारदरबारी मागण्यांचा पाठपुरावा सुरूच
रेशीम उत्पादकांचा सरकारदरबारी मागण्यांचा पाठपुरावा सुरूच

औरंगाबाद : मंत्रिबदलामुळे रेशीम उत्पादकांना शासन स्तरावर रेशीम व्यवसाय विकास, विस्तार व अडचणी दूर करण्यासाठी पुन्हा पहिले पाढे पाच म्हणण्याची वेळ आली. परंतु शाश्‍वततेमुळे शेतकऱ्यांच्या पसंतीस उतरलेल्या रेशीम उद्योगाविषयीच्या प्रलंबित मागण्यांसाठी रेशीम उत्पादकांवर शासनदरबारी आपल्या मागण्यांचा पाठपुरावा सुरूच ठेवण्याची वेळ आली आहे. 

दुष्काळातही मराठवाड्यातील शेतकऱ्यांसाठी रेशीम उद्योग तारणहार ठरला आहे. त्यामुळेच  मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा कल रेशीमकडे वाढला. महारेशीम अभियानाला मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांनी प्रतिसाद दिला. मराठवाडा लागवडीच्या, उत्पादनाच्या बाबतीत राज्यात आघाडीवर आहे. मराठवाड्याचा रेशीम कोष आणि रामनगरमच्या मार्केटमधील चांगला दर हे जणू काही समीकरण बनले. परंतु अलीकडे रेशीम कोष उत्पादकांनाही अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.

तत्कालीन सहकार, पणन व वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांना रेशीम कोष उत्पादकांनी येणाऱ्या अडचणींबाबत अवगत केले. रेशीम व्यवसाय विकास, विस्तारासाठी अकरा मागण्या जूनमध्ये त्यांच्यासमोर ठेवल्या. वस्त्रोद्योग खाते राम शिंदे यांच्याकडे आल्याने पुन्हा शेतकऱ्यांना आपल्या मागण्यांविषयीचे संदर्भ त्यांना समजावून देण्याची वेळ आली. परंतु उद्योगातील शाश्‍वती व दुष्काळातही आधार देऊ शकणाऱ्या या उद्योगातील शेतकऱ्यांनी आपल्या मागण्यांचा पाठपुरावा सुरूच ठेवला आहे.

मंत्री राम शिंदे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन त्यांना शंभर अंडीपुंजीच्या चॉकीवर शेतकऱ्याला १ हजार रुपये अनुदान द्या, १ किलो कोष उत्पादनावर ५० ते १०० रुपये अनुदान देण्याची मागणी करण्यात आली. ग्रामविकासमंत्री पंकजा मुंडे यांनाही निवेदन देण्यात आले. दुष्काळाच्या झळा यंदा रेशीमसाठीच्या तुती लागवडीलाही बसल्या आहेत. नेहमी लक्ष्यांकाच्या पुढे जाऊन तुती लागवड करणाऱ्या मराठवाड्यात पावसाने दगा दिला. त्यामुळे तुतीची लागवड संकटात आहे. मंगळवारी (ता. २०) रेशीम कोष उत्पादकांच्या मागण्यांवर चर्चा करण्यासाठी मंत्री शिंदे यांनी रेशीम उत्पादकांच्या प्रतिनिधींना बोलावले आहे.

शिवाय राज्यमंत्री अर्जुन खोतकर यांच्याकडेही रेशीम उत्पादकांनी प्रलंबित मागण्यांविषयी पाठपुरावा सुरूच ठेवला आहे. त्यामुळे त्या वेळी काय चर्चा होते व प्रलंबित मागण्यांविषयी काय निर्णय होतात, याकडे रेशीम कोष उत्पादकांचे लक्ष लागले आहे. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com