रेशीम बाजारपेठेच्या स्वतंत्र इमारतीचे उद्या जालन्यात भुमिपूजन; आजपासून प्रदर्शन

रेशीम कोष
रेशीम कोष

जालना : रेशीम कोष उत्पादनात राज्यात आघाडीवर असलेल्या मराठवाड्यात स्वतंत्र रेशीम कोष बाजारपेठ निर्माण करण्याच्या स्वप्नांची उद्या (ता. १) रेशीमदिनी पूर्णत्वाच्या दिशेने वाटचाल सुरू होणार आहे. रेशीम बाजारपेठेच्या ६ कोटी १३  लाख रुपये खर्चून बांधण्यात येणाऱ्या स्वतंत्र इमारत बांधकामाचे भूमिपूजन उद्या होणार आहे. रेशीम दिनानिमित्त दोन दिवस चालणाऱ्या महारेशीम महोत्सवात आज (ता. ३१) प्रदर्शनाचेही आयोजन करण्यात आले आहे. रेशीमदिनी उद्या रेशीम कोष बाजारपेठेच्या इमारतीचे भूमिपूजन केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे पाटील, विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे, वस्त्रोद्योग मंत्री प्रा. राम शिंदे यांच्या हस्ते होईल. या वेळी प्रमुख पाहुणे म्हणून पालकमंत्री बबनराव लोणीकर, तर कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर असतील.  या वेळी हातमाग महामंडळाचे अध्यक्ष प्रकाश पाटील, महिला आर्थिक विकास महामंडळाच्या अध्यक्षा ज्योती ठाकरे, जिल्हा परिषद अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर, गोदावरी पाटबंधारे मंडळाचे उपाध्यक्ष भास्कर आंबेकर, माजी मंत्री राजेश टोपे, आमदार नारायण कुचे, आमदार संतोष दानवे, नगर पालिका उपाध्यक्ष राजेश राऊत, सहकार पणन व वस्त्रोद्योग सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, वस्त्रोद्योग आयुक्‍त डॉ. माधवी खोडे, जालना जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जि. मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा व आयोजक रेशीम विभागाच्या संचालक भाग्यश्री बानायत, प्रभारी सहायक संचालक बी. के. सातदिवे, रेशीम विकास अधिकारी जी. एम. मिसाळ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता ओ. आर. चांडक, उपअभियंता चंद्रशेखर नागरे, बाजार समितीचे सचिव गणेश चौगुले यांची उपस्थिती राहणार आहे.  रेशीम दिनानिमित्त शनिवारी (ता. ३१) जुना मोंढा येथे रेशीम वस्त्र प्रदर्शन व रेशीम शेतकरी मेळावा होणार आहे. या प्रदर्शनाचे उद्‍घाटन वस्त्रोद्योग राज्यमंत्री अर्जुनराव खोतकर यांच्या हस्ते होणार आहे. या वेळी युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांची विशेष उपस्थिती राहणार आहे. या कार्यक्रमाला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठ परभणीचे कुलगुरू डॉ. अशोक ढवण, सहकार पणन व वस्त्रोद्योग सचिव डॉ. के. एच. गोविंदराज, वस्त्रोद्योग आयुक्‍त डॉ. माधवी खोडे, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, जि. मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, रेशीम विभागाच्या संचालक भाग्यश्री बानायत आदींची उपस्थिती राहणार आहे. राज्यभरातील शेतकरी या कार्यक्रमात सहभागी होणार असल्याची माहिती रेशीम संचालनालय व जिल्हा रेशीम कार्यालय जालनाच्या वतीने देण्यात आली. सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून महाराष्ट्राने अपारंपरिक रेशीम उत्पादक राज्यात प्रथम क्रमांक मिळविला आहे. केंद्र शासनाने २०१९ मध्ये महाराष्‌ट्राला उदयोन्मुख रेशीम राज्याचा पुरस्कार प्रदान केला आहे. सद्यःस्थितीत राज्यात १७९२१ शेतकऱ्यांकडे १९६९८ एकरवर तुती लागवड आहे. २०१७-१८ च्या तुलनेत यामध्ये दुप्पट वाढ झाली आहे. महारेशीम अभियान २०१९ मध्ये १५०९४ शेतकऱ्यांनी तुती लागवडीकरिता नोंदणी केली असून, त्यांची लागवड सुरू असल्याचे रेशीम विभागाने स्पष्ट केले आहे. ...असे असेल बाजारपेठेचे स्वरूप  जालन्यातील गट नं. ४८८, सिरसवाडी रोड, इन्कमटॅक्‍स ऑफिस समोरील १३८९.५१४ चौरस मीटर जागेत रेशीम कोष बाजारपेठेची दुमजली इमारत उभी केली जाणार आहे. निर्मितीसाठी ६ कोटी १३ लाखांचा निधी असणाऱ्या या इमारतीत कोष खरेदी विक्रीसाठी लिलाव हॉल, कोष वाळविणे, साठवणूक करण्यासाठी सुविधा, कोषांची प्रतवारी ठरविण्यासाठी कोष तपासणी यंत्रणा, शेतकरी प्रशिक्षणासाठी प्रशिक्षण हॉल, कार्यालयाची प्रशासकीय इमारत, मीटिंग हॉल, ई-नाम कार्यप्रणाली आदी सुविधा राहणार असल्याची माहिती रेशीम विभागाच्या वतीने देण्यात आली.  असे असेल प्रदर्शनाचे स्वरूप रेशीम दिन कार्यक्रमांतर्गत ३१ ऑगस्टला जालना येथील जुन्या मोंढा येथे रेशीम कृषी उद्योगाचे विविध स्टॉल लावण्यात येणार आहेत. त्यामध्ये काश्मीरच्या पश्मीना साडीपासून तमिळनाडूची कांजीवरम, आसामचे मुंगा सिल्क, आंध्र प्रदेशचे धर्मावरम सिल्क, पैठणची पैठणी व इतर सर्व प्रकारचे रेशीम वस्त्र पाहण्याची व खरेदीची संधी असणार आहे. रेशीम साहित्य खरेदी व रेशीम उद्योगाविषयी संपूर्ण माहिती शेतकऱ्यांना मिळणार आहे. केंद्रीय रेशीम मंडळ तसेच रेशीम संचालनालयांतर्गत विविध कार्यालयाचे स्टॉल लावण्यात येणार आहेत. कृषी विभाग, वन विभाग, विमा कंपनी, महिला आर्थिक विकास महामंडळांतर्गत बचत गटांचे स्टॉल प्रदर्शनात असणार आहेत. 

Read the Latest Agriculture News in Marathi & Watch Agriculture videos on Agrowon. Get the Latest Farming Updates on Market Intelligence, Market updates, Bazar Bhav, Animal Care, Weather Updates and Farmer Success Stories in Marathi.

ताज्या कृषी घडामोडींसाठी फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम टेलिग्रामवर आणि व्हॉट्सॲप आम्हाला फॉलो करा. तसेच, ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Agrowon
agrowon.esakal.com