agriculture news in Marathi, silk will get 50 rupees subsidy, Maharashtra | Page 2 ||| Agrowon

महाराष्ट्राच्या कोषालाही किलोमागे ५० रुपये अनुदान?

विनोद इंगोले
रविवार, 1 सप्टेंबर 2019

कोषाला ५० रुपये किलोमागे प्रोत्साहनपर देण्याचे प्रस्तावित आहे. त्यासंदर्भातील निर्णय एक सप्टेंबरला रेशीम दिनी जाहीर होण्याची शक्‍यता आहे. रेशीम सल्लागार समितीने त्यासाठी पाठपुरावा केला होता. 
- डॉ. संतोष हरिभाऊ थिटे, तज्ज्ञ सदस्य, महाराष्ट्र राज्य रेशीम सल्लागार समिती.

नागपूर ः कर्नाटकच्या धर्तीवर महाराष्ट्रातील रेशीम कोषाला देखील किलोमागे ५० रुपये अनुदान देण्याचा निर्णय १ सप्टेंबर रोजी रेशीम दिनाला जाहीर होण्याची शक्‍यता वर्तविली जात आहे. यामुळे रेशीम उत्पादकांची गेल्या अनेक वर्षांची मागणी पूर्णत्वास जाणार असल्याने रेशीम कोश उत्पादकांनी देखील या प्रस्तावाचे स्वागत होत आहे. 

रेशीम शेतीला प्रोत्साहन मिळावे याकरिता कर्नाटकमध्ये किलोमागे ५० रुपये अनुदान देण्याची योजना गेल्या अनेक वर्षांपासून राबविली जात आहे. त्या राज्यातील शेतकऱ्यांनाच याचा लाभ मिळतो. रामनगर (कर्नाटक) येथील बाजारपेठेत कोष विकल्यानंतर त्याची पावती, आधारकार्ड, बॅंक पासबुक रेशीम विभागाच्या अधिकाऱ्यांना दाखविले जाते. रामनगर बाजारपेठेतच रेशीम विभागाचे कार्यालय आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना इतरत्र भटकावे लागत नाही. विक्री पावतीवरील नोंदीच्या आधारे संबंधित शेतकऱ्याने किती क्‍विंटल माल विकला हे कळत असल्याने त्याआधारे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात प्रोत्साहन रक्‍कम प्रती किलोला ५० रुपये याप्रमाणे जमा केली जाते. 

महाराष्ट्रासह इतर राज्यांतील शेतकऱ्यांना मात्र याचा लाभ मिळत नव्हता. त्यामुळे राज्यात देखील रेशीम उत्पादकांसाठी अशी योजना असावी, अशी मागणी बऱ्याच वर्षांची होती. शेतकऱ्यांसह रेशीम संचलनालयाच्या वतीने देखील यासाठी पाठपुरावा करण्यात आला. खात्याच्या संचालक भाग्यश्री बानायत यांनी देखील यास दुजोरा दिला आहे. 

तरीही दर कमी
तापमान जास्त असल्याच्या परिणामी महाराष्ट्राच्या कोषामध्ये आर्दता कमी राहते. प्रक्रियेत एक क्‍विंटल कोषापासून १२ ते १४ किलो धागा मिळतो. तरीसुद्धा कर्नाटकाच्या तुलनेत कोषाला किलोमागे ९० ते १०० रुपये कमी दर दिला जातो. ३१० ते ३५० रुपये किलोचा दर महाराष्ट्राच्या कोषाला मिळतो, असे विडूळ (यवतमाळ) येथील महेश्‍वर बिचेवार यांनी सांगितले. राज्यात जालना येथे कोश खरेदीची सुविधा होत ५० रुपये अनुदानदेखील मिळणार असल्याने हे निश्‍चितच स्वागतार्ह आहे असेही ते म्हणाले.


इतर अॅग्रो विशेष
वैद्यांनी जपला यांत्रिकीकरणाचा वारसागरज ही शोधाचा जननी असते. त्यातूनच निंभोरा बोडखा (...
प्रतिकूल हवामानात घडवली बीबीएफ’...जालना कृषी विज्ञान केंद्र, खरपुडी-जालना (केव्हीके...
बदलत्या व्यापार समिकरणांचा अन्वयार्थशेती क्षेत्रात नुकत्याच आम्ही काही सुधारणा केल्या...
शरद जोशींचे शिक्षण स्वातंत्र्यशरद जोशींचे तत्वज्ञान एका शब्दात सांगायचे म्हटले...
अभियान नको, योजना हवीकेंद्र सरकारने आत्मनिर्भर योजनेंतर्गत शेतमाल...
इर्व्हिनिया रॉट रोगाची केळी पिकात समस्या जळगाव ः जिल्ह्यात केळी पिकात...
`पोकरा`मधून शेतमजुरांना प्रशिक्षण द्याऔरंगाबाद: नानाजी देशमुख कृषी संजीवनी...
ऑगस्टमध्ये प्रथमच भरले सीना धरण नगर: दुष्काळी कर्जत, श्रीगोंदा आणि आष्टी...
कोल्हापूर : जनावरे बाजारातील...कोल्हापूर: `कोरोना’च्या पार्श्वभूमीवर लॉकडाउनमुळे...
साखर निर्यातवाढीसाठी केंद्राची ‘रॅपिड अ...कोल्हापूर: देशातून जास्तीत जास्त साखर निर्यात...
परभणीत सोळा हजार शेतकऱ्यांचे आधार...परभणी ः महात्मा जोतिराव फुले शेतकरी कर्जमुक्ती...
सोयाबीन बियाणेप्रकरणात शेतकऱ्यांना एक...अमरावती : विभागातील पाच जिल्ह्यांत सोयाबीन बियाणे...
‘ई-नाम’, शीतसाखळी बळकट करण्याची गरज;...पुणे: चीनशी व्यापारी संबंध डळमळीत झाल्यानंतर...
‘सिट्रस नेट’वर केवळ दोनशे शेतकऱ्यांची...नागपूर : प्रशासकीय यंत्रणांच्या उदासीनतेमुळे ‘...
मका खरेदी केंद्रांवर शेतकरी ठाण मांडून औरंगाबाद: हमीभावाने खरेदीसाठी ३१ जुलैपर्यंत...
पावसाचा जोर वाढण्याची शक्यता  पुणे ः  बंगालच्या उपसागरात कमी दाबाचे...
भाजीपाला शेतीतून अर्थकारणाला गतीडोंगरगाव (ता.जि.अकोला) शिवारातील योगेश नागापुरे...
राज्यात धरणांमध्ये ३८ टक्के साठापुणे : मॉन्सूनचा पाऊस सुरू झाल्यानंतर जून...
जुलैअखेर पावसाने सरासरी गाठलीपुणे : नैर्ऋत्य मोसमी वारे (मॉन्सून) हंगामाची...
सांगली जिल्ह्यात २६ हजार हेक्टरने ऊस...सांगली : जिल्ह्यातील दुष्काळी पट्ट्यासह अन्य...